जास्वंदीचे फुल आणि दुर्वा हे गणपती बाप्पाच्या विशेष आवडीचे. गणपती बाप्पाला लालचुटुक मस्त छान उमललेले जास्वंदीचे फुल फार आवडते. आपण कधीही गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो की जास्वंदीचे फुल वाहतो. गणरायाची पुजा करताना आपण २१ दुर्वांची जुडी, जास्वंदीची फुले आणि २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण करतो. आपल्याकडे सर्वच देवतांना विशिष्ट फुलं, पत्री वाहण्याची प्रथा आहे. जसे विठोबाला तुळस, शंकराला बेल, गणपतीला दूर्वा आणि जास्वंदाची फुले वाहिली जातात. गणपती बाप्पाला जसे मोदक प्रिय आहेत तसेच जास्वंदीची फुले देखील तितकीच प्रिय आहेत(Quick & easy Hibiscus flower garland at home).
आपल्या घरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. या दहा दिवसात आपण बाप्पाला जास्वंदीच्या फुलांपासून तयार केलेला हार, कंठी, फुल दररोज वाहतो. रोजच्या रोज बाप्पाला जास्वंदीची फुले वाहिल्याने आपल्याकडे बरीच जास्वंदीची फुले होतात. ही जास्वंदीची फुले आपण नंतर निर्माल्य म्हणून टाकून देतो. परंतु आपण असे न करता गणपती बाप्पाला वाहिलेली जास्वंदीची फुले फेकून न देता त्याचा वापर करुन सुंदरसा गजरा तयार करु शकतो. आपण गजरा शक्यतो, मोगरा, अबोली, तगर यांसारख्या फुलांपासून तयार करतो. पण कधी जास्वंदीच्या फुलांचा गजरा ऐकले किंवा पाहिले आहे का ? आतापर्यंत आपण गणपती बाप्पाला वाहून झालेली जास्वंदीची फुले निर्माल्य म्हणून फेकून देत होतो. पण याच जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर करुन आपण छानसा गजरा अगदी ५ मिनिटांत घरच्या घरी तयार करु शकतो. यामुळे या सणासुदीच्या दिवशी नटून - थटून बाहेर जाताना आपण हा गजरा केसांत माळू शकतो. त्याचबरोबर, या लालचुटुक पाकळ्यांचा गजरा दिसायला खूप सुंदर, नाजूक आणि आकर्षक असतो. हा गजरा आपण केसांचा आंबाडा, वेणी यांवर माळू शकतो(How to make Hibiscus petals gajra).
जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्यांचा गजरा कसा तयार करावा ?
१. सगळ्यात आधी जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्या एक एक करून वेगळ्या करुन घ्याव्यात. २. त्यानंतर सुई मध्ये एक धागा ओवून घ्याव्या. ३. आता या फुलांच्या पाकळ्या एक एक करून या पाकळ्यांना बरोबर मधोमध एक उभी घडी घालावी. ४. आता घडी घातलेली ही एक पाकळी सुईच्या मदतीने धाग्यात ओवून घ्यावी.
कुंडीत रोपांची वाढ खुंटली? माचिसच्या काड्यांचा करा जादुई उपाय, रोपं होतील पुन्हा हिरवीगार...
कंगना रे.. हातात घाला सुंदर कंगन! पाहा १० नवीन डिजाईन्स, सण समारंभात हातांची वाढेल शोभा...
५. एक पाकळी आडवी एक पाकळी उभी असे अनुक्रमे एक एक पाकळी ओवून गजरा तयार करुन घ्यावा. ६. हा गजरा तयार करताना आपल्या आवडीनुसार आपण त्यात मोगरीच्या कळ्या किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची फुल देखील ओवून सुंदर गजरा तयार करु शकतो.
अशा प्रकारे जास्वंदीच्या फुलांच्या पाकळ्यांचा सुंदर गजरा आपण घरच्या घरी अगदी ५ मिनिटांत तयार करु शकतो.