बॉलीवूड सेलिब्रिटींनीसुद्धा राखी पौर्णिमेचा सण (Raksha Bandhan 2023) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या सेलिब्रिटींपैकी एक आहे करीना कपूर (Kareena Kapoor). करीनाने नवरा सैफ अली खान, सैफची इब्राहिम आणि सारा अली खान ही मुले, तसेच तैमूर आणि जेह, सोहा अली खान अशा तिच्या कुटुंबियांसोबत नुकताच रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी तिने घातलेला मोतिया रंगाचा सलवार कुर्ता तब्बल २१ हजारांचा होता. पानपट्टी सलवार कुर्ता असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता तो नेमका काय प्रकार असतो ते पाहूया....(ivory salwar kurta worth Rs.21k is having paan patti motif)
करिनाने घातलेल्या मोतीया रंगाच्या सलवार सूटच्या बाह्यांचे काठ सोनेरी रंगाचे होते. बाकी पुर्ण ड्रेस मोतिया रंगाचाच होता. या ड्रेसवर करिनाने नो ज्वेलरी लूक केला होता. म्हणजेच कोणतेही दागिने घातले नव्हते. पायात पांढऱ्या रंगाची मोजडी, कपाळावर मोठे टिकली, केसांचा अंबाडा आणि त्यावर मेकअप अगदी साधा... असा एकंदरीत करिनाचा लूक होता.
पानपट्टी कुर्ता म्हणजे काय?पानपट्टी कुर्ता नक्षी म्हणजे खूप काही वेगळं नाही. यामध्ये कपड्यावर पिंपळाच्या पानासारखा आकार असतो. आणि त्या पानावर विणकाम केलेलं असतं. पानाच्या आतमध्ये फुलं किंवा इतर कुठलीही नक्षी असतात. फक्त दुरून पाहिल्यावर आपल्याला तो आकार एखाद्या पानाप्रमाणे दिसतो. असं पानपट्टीचे डिझाईन करीनाचा बाह्यांच्या काठावर आणि सलवारवर दिसून आलं.