Join us  

रश्मिका मंदानाचा काळा शर्ट आणि गोल्ड ब्रोकेड ट्राऊजर, फॅशनचा बदलता एथनिक ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 3:45 PM

Rashmika Mandanna's Viral Look: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा सूपर कूल एथनिक लूक सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. या लूकद्वारे तिने एक नवं फॅशन स्टेटमेंट (Rashmika Mandanna's fashion statement) तिच्या चाहत्यांसमोर ठेवलं आहे.

ठळक मुद्देतिचा शर्ट १२, ८०० रुपयांचा असून ट्राऊझरची किंमत तब्बल ३६,५०० रुपये आहे. 

'पुष्पा' चित्रपटाद्वारे घराघरांत पोहोचलेली रश्मिका ('Pushpa' movie actress Rashmika Mandanna) आता पुन्हा एकदा तिच्या 'सीता रामम' या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या एका प्रमोशन कार्यक्रमात रश्मिकाने घातलेला ड्रेस अनेकांसाठी आयकॅची (Rashmika's eye catchy look) ठरला. कारण खरोखरंच तिच्या ड्रेसची स्टाईल अतिशय वेगळी, हटके होती. सिल्कचा शर्ट आणि ब्रॉकेड कपड्याची सैलसर ट्राऊझर ( Black silk shirt with golden brocade trouser) आणि त्यावर सूट होणाऱ्या ॲक्सेसरीज तिला एथनिक विथ वेस्टर्न अशा पद्धतीचा अनोखा लूक देणाऱ्या ठरल्या. तिचा शर्ट १२, ८०० रुपयांचा असून ट्राऊझरची किंमत तब्बल ३६,५०० रुपये आहे. 

 

बघा रश्मिकाचा खास लूकरश्मिकाचा हा ड्रेस डिझायनर पायल खांडवाला (Payal Khandwala) यांच्या सिल्क ब्रॉकेड कलेक्शनमधला होता.

फक्त १० रुपयांत आणि १० मिनिटांत मिळेल उजळ- चमकदार त्वचा, करा शुगर स्क्रबचा जादुई उपाय

याविषयी एका मुलाखतीदरम्यान बोलताना त्या म्हणाल्या की तिची ट्राऊझर ब्लॅक ॲण्ड विंटेज गोल्ड या प्रकारातली असून ती पुर्णपणे हाताने विणलेली आहे. हे कापड विणण्यासाठी कारागिरांनी सलग ७ तास मेहनत घेतली आणि त्यानंतर ती शिवण्यात आली. सामान्यपणे असा कपडा  एखाद्या लेहेंग्यासाठी आपण वापरतो. पण तशा कपड्याची ट्राऊजर शिवून त्याला एकदम हटके लूक देण्याचा प्रयत्न  करण्यात आला आहे. यावर मॅच करायला रश्मिकाने काळ्या रंगाचा सिल्कचा शर्ट घातला होता. 

 

आपल्या कलेक्शनमध्येही अशी एखादी ट्राऊझर ठेवायला हरकत नाही. कारण डिझायनर पायल यांचं असं म्हणणं आहे की हे तिचे कपडे एथनिक आणि वेस्टर्नवेअर अशा दोन्ही बाबतीत परफेक्ट फिट होऊ शकतात.

मृणाल ठाकूरची ६० हजारांची साडी, त्यावर पाहा सुंदर जास्मिन एम्ब्रॉयडरी! नजकतीची बघा खासियत

काळ्या रंगाचं गळ्यातलं आणि सोनेरी रंगाच्या बांगड्या आणि कानातले रश्मिकाने घातले असून तिने त्याला जास्तीतजास्त एथनिक टच देण्याचा प्रयत्न केला आहे. असे दागिने न घालता फॉर्मल काळा शर्ट, अशा पद्धतीची एखादी ब्रॉकेड ट्राऊझर आणि मोजके साधे दागिने घातले, तर हा लूक एखाद्या फॉर्मल मीटसाठीही योग्य ठरू शकतो. असा लूक केल्यास तो निश्चितच सगळ्यांपेक्षा वेगळा आणि उठून दिसेल. त्यामुळे एकदा अशा सिल्कच्या ट्राऊझरचा विचार करायलाच हवा. 

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्सरश्मिका मंदाना