Join us  

Republic Day Special : झेंडावंदनासाठी फॉर्मल आणि स्टायलिश लूक, ५ आयडिया - दिसाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 8:24 PM

Republic Day Special : Formal and Stylish Look for Flag Saluting सुंदर - शालीन आणि आदर व्यक्त करणारी आपली वेशभूषा हवी!

 २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन.   प्रत्येक व्यक्ती प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करते. या दिवशी शाळा, कॉलेज, ऑफिस आणि सोसायटीमध्ये ध्वजवंदन पार पडते. त्या कार्यक्रमासाठी वेशभूषेच्या या ५ आयडिया.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या उत्तम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचा प्रत्येक लूक घायाळ करणारा ठरतो. आपण या प्रजासत्ताक दिनानिमित्त जान्हवीने परिधान केलेला व्हाईट कुर्ता परिधान करू शकता. ओपन केस त्यात लाईट मेकअप उठून दिसेल.

चुलबुली अभिनेत्री सारा अली खान प्रमाणे आपण कुर्ता ऐवजी ड्रेस परिधान करू शकता. यावरील कॉटन ओढणी तुमच्या सौंदर्याला चारचांद लावेल यात शंका नाही. सिल्वर झुमके यासह लाईट मेकअपवर आपण सिंपल आणि क्युट दिसाल.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मिनिमल ग्रीन - स्काई ब्लू प्रिंटचा ड्रेस परिधान केला आहे. यावर तिने ओढणी देखील कॅरी केली आहे. आपण हा लूक कॅरी करू शकता.

सोशल मिडीयावर चर्चेत असणारी अभिनेत्री कियारा आडवाणीने लाईट ग्रीन कलरची साडी परिधान केली आहे. ग्रीन साडीवर वाइट एम्ब्रोइडरी उठून दिसत आहे. या साडीवर तिने फ्लोरल प्रिंट ब्लाउज परिधान केला आहे. आपण देखील ट्रेडीशनल लूक फॉलो करू शकता.

क्युट गर्ल आलीया भट्ट आपल्या ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखली जाते. तिचा प्रत्येक लूक हा हटके असतो. तिने या फोटोमध्ये डार्क ग्रीन कलरचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. तिने केसांवर गजरा माळला आहे. ब्लू कलरच्या ओढणी ड्रेसवर शोभून दिसत आहे.

टॅग्स :फॅशनसेलिब्रिटीप्रजासत्ताक दिन