उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा म्हणजेच अनंत अंबानी. अनंत आणि राधिका मर्चंट यांचा बहुचर्चित विवाहसोहळा नुकताच मोठ्या थाटात पार पडला (Anant Ambani- Radhika Merchant Wedding). या साेहळ्यासाठी देशाेदेशीचे मान्यवर आले होते. भारतातल्याही जवळपास सगळ्याच दिग्गज मंडळींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. त्यामध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीही होतेच. खरंतर सोहळ्यासाठी आलेल्या सगळ्याच मंडळींनी वेशभुषा आकर्षक होती. पण त्यातल्या त्यात रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा या मराठी जोडप्याने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते (Ritesh Deshmukh And Genelia D'souza's stunning marathi look). महाराष्ट्राची पारंपरिक वेशभुषा म्हणजेच नऊवारी साडी आणि धोतर अशा मराठी थाटात ते दोघे लग्नमंडपात गेले होते...
या लग्नसोहळ्यासाठी जेनेलियाने टिपिकल महाराष्ट्रीयन वेशभुषा केली होती आणि त्यावर ट्रेण्डी दागिने घालून तिच्या पारंपरिक लूकला मॉडर्न टच दिला होता. तिने मोतिया रंगाची सुंदर नऊवार नेसली होती आणि त्या नऊवारीवर मॅच होईल असा मोतिया रंगाचा शेला उजव्या खांद्यावरून घेतला होता.
पावसाळ्यात काजळ पसरून डोळ्यांखालचा भाग काळवंडतो? २ टिप्स- काजळ दिवसभर राहील जशास तसं
तिची साडी आणि शेला या दोन्ही गोष्टी हिमरू प्रकारातल्या होत्या. याशिवाय गळ्यात मोत्यांचं अतिशय आकर्षक चोकर, कानात मोत्याचे कानातले घातलेली जेनेलिया ठसठशीत नथ घालून अतिशय देखणी दिसत होती. कपाळावरच्या चंद्रकोरीने तिच्या या मराठी लूकला पुर्णत्व दिले. तिचे ते सगळे दागिने राजवाडा ज्वेलर्सचे होते.
तिच्या या वेशभुषेला मॅच करत रितेश देशमुखनेही आकर्षक पारंपरिक मराठी लूक केला होता.
सोनचाफा नुसताच वाढला- फुलं येतच नाहीत? ३ सोप्या टिप्स- काही दिवसांतच भरभरून येतील कळ्या...
स्वच्छ पांढऱ्या रंगाचा चमचमता झब्बा, त्यावर राजबिंडा लूक देणारे आकर्षक जॅकेट आणि त्यासोबत मराठी ओळख सांगणारे धोतर अशा थाटात रितेश दिसताच सगळ्यांच्याच नजरा रितेश आणि जेनेलियाकडे वळाल्या. अंबानींकडच्या शाही लग्नात अशा पद्धतीच्या देशमुखी थाटात गेलेल्या रितेश- जेनेलियाने त्यांच्या मराठी चाहत्यांना पार सुखावून टाकले आहे.