Join us  

सारा तेंडुलकरचा जरतारी भरजरी गोल्डन वर्कचा घागरा, पाहा ब्रायडल घागऱ्याची नजाकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 5:45 PM

Viral Photos of Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकीचा (daughter of Sachin Tendulkar) जरतारी घागरा सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो आहे. तिच्या त्या ब्रायडल घागऱ्याची नजाकत खरोखरच बघण्यासारखी आहे.

ठळक मुद्देमॉडर्न भारतीय नवरीला कशा पद्धतीने घागरा घालायला आवडेल, त्या संकल्पनेनुसार हा घागरा डिझाईन करण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचं तर नवरीला फ्यूजन लूक देणारा हा घागरा आहे.

क्रिकेटर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिची ओळख आता फक्त सचिनची कन्या एवढीच मर्यादित राहिलेली नाहीये. या स्टारकिडला प्रचंड ग्लॅमर असून तिचा स्वत:चा एक स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण झालेला आहे. त्यामुळे सारा सोशल मिडियावरही (social viral) चांगलीच गाजते आहे. आता सध्या तिचे ब्रायडल घागऱ्यातले (bridal ghagra) फोटो सोशल मिडियावर अतिशय व्हायरल झाले असून यानिमित्ताने साराच्या सौंदर्याचे तसेच तिच्या घागऱ्याच्या सौंदर्याचे कौतूक करण्यात येत आहे.

 

मागे काही महिन्यांपुर्वीही साराने असेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले हेाते. तेंडुलकर कुटूंबातील एका व्यक्तीच्या लग्न सोहळ्यासाठी तिने खास मराठमोळी पारंपरिक वेशभुषा केली होती. नऊवारी, नाकात नथ, चंद्रकोर आणि अंगावर सगळे मराठी संस्कृती दाखविणारे दागदागिने असा साराचा लूक तेव्हाही चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा एकदा ती सोशल मिडियावर आकर्षण ठरली आहे. यावेळचे निमित्त आहे तो तिचा ब्रायडल लेहेंगा. लाल- गुलाबी रंगाचा आकर्षक घागरा आणि त्यावर अतिशय सुंदर काम असा हा घागरा अतिशय नजाकतीने तयार करण्यात आला आहे. 

 

कसा आहे साराचा घागरा?- साराने घातलेला हा घागरा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अलका डोंगरे (Anita Dongre) यांच्या ब्रायडल कलेक्शनमधला आहे. - मॉडर्न भारतीय नवरीला कशा पद्धतीने घागरा घालायला आवडेल, त्या संकल्पनेनुसार हा घागरा डिझाईन करण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचं तर नवरीला फ्यूजन लूक देणारा हा घागरा आहे.- घागऱ्यावर एखाद्या नवरीच्या लेहेंग्याला शोभेल त्याप्रमाणेच अतिशय हेवी वर्क करण्यात आलं आहे. पण तरीही हे हेवी वर्क कुठेही डोळ्यात खुपणार नाही, खूपच झगमग दिसणार नाही, अशा पद्धतीचं अगदी मॉडर्न नवरीला सूट होणारं आणि आवडणारं आहे.- या घागऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे घागऱ्यावर पुर्णपणे सोनेरी धाग्यांनी एम्ब्रॉयडरी करण्यात आली असून त्यावरचं मिरर वर्क अतिशय नाजूक आणि देखणं झालं आहे. - साराच्या या घागऱ्याची नेमकी किंमत किती याची माहिती अनिता डोंगरे यांच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर अजूनतरी उपलब्ध नाही. 

 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्ससारा तेंडुलकरसचिन तेंडुलकर