Lokmat Sakhi >Fashion > साडीत खूप जाड दिसता? चापून चोपून साडी नेसण्याच्या ५ टिप्स, सुंदर-सुडौल दिसाल 

साडीत खूप जाड दिसता? चापून चोपून साडी नेसण्याच्या ५ टिप्स, सुंदर-सुडौल दिसाल 

Saree draping Ideas : प्रिंडेट साडी नेहमीच लक्ष वेधूम घेते. अशावेळी लोक तुमची फिगर फारशी नोटीस करत नाहीत. जर तुम्ही जास्त लठ्ठ असाल तर प्रिंटेड साडीची निवड करा.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 10:10 AM2023-05-20T10:10:29+5:302023-05-20T10:14:00+5:30

Saree draping Ideas : प्रिंडेट साडी नेहमीच लक्ष वेधूम घेते. अशावेळी लोक तुमची फिगर फारशी नोटीस करत नाहीत. जर तुम्ही जास्त लठ्ठ असाल तर प्रिंटेड साडीची निवड करा.

Saree draping Ideas : Saree draping attractive styles | साडीत खूप जाड दिसता? चापून चोपून साडी नेसण्याच्या ५ टिप्स, सुंदर-सुडौल दिसाल 

साडीत खूप जाड दिसता? चापून चोपून साडी नेसण्याच्या ५ टिप्स, सुंदर-सुडौल दिसाल 

लग्नसराई, फॅमिली फंक्शन किंवा घरात कोणताही कार्यक्रम असेल तर महिला साडी नेसणं पसंत करतात. आपण साडी, सुंदर आकर्षक दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेकदा लठ्ठपणामुळे आपल्या हवातसा लूक मिळत नाही. तुम्हालाही अशाच समस्यांचा सामना करावा लागत असेल तर काही टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट लूक्स मिळवू शकता. (Saree draping Ideas)

प्रिंटेड साडी नेसा

प्रिंडेट साडी नेहमीच लक्ष वेधून घेते. अशावेळी लोक तुमची फिगर फारशी नोटीस करत नाहीत. जर तुम्ही जास्त लठ्ठ असाल तर प्रिंटेड साडीची निवड करा.

डबल शेड साडी ट्राय करा

कॉन्ट्रास्ट शेडची साडी स्लिम लूक देते.  जेव्हाही तुम्हाला कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल तेव्हा डबल शेडची साडी ट्राय करा. यामुळे तुमचा लूक अधिकच खुलून येईल.

पातळ बॉर्डरच्या साड्या

अधिक वजनदार महिलांनी मोठ्या बॉर्डरच्या साड्या नेसण्याऐजवी पातळ बॉर्डरच्या साड्या नेसायला हव्यात. यामध्ये त्या स्लिम दिसून येतील.

लेगिन्ज देईल स्टायलिश लूक

साडीच्या खाली पेटिकोट वापरण्याऐवजी लेगिन्जवर साडी नेसा. यामुळे कंबर जास्त जाड दिसणार नाही आणि साडी चापून चोपून नेसल्यासारखी दिसेल.

हाय हिल्स

अनेकदा महिला साडी नेसल्यानंतर फ्रलॅट स्लिपर्स घालतात. साडीसह हिल्स घालायला हव्यात. हिल्स घातल्यानं तुमची उंची जास्त दिसेल आणि तुम्ही स्लिम दिसाल.

काळी साडी नेसा

जास्तीत जास्त लोकांना काळ्या रंगाचे कपडे फार आवडतात.  काळ्या साडीत तुम्ही आहात त्यापेक्षा स्लिम दिसाल आणि तुमचा मेकअप, रंगही उठून दिसेल.

लॉग्न स्लिव्हजचं ब्लाऊज

लांब बाही असलेले ब्लाउज देखील स्लिम दिसण्यासाठी खूप मदत करतात. विशेषत:  जेव्हा तुमचे आर्म फॅट जास्त असते तेव्हा. लॉग्न स्लिव्हजचं ब्लाऊज  परिपूर्ण लूक देते.

बेल्ट वापरा

आजकाल साडीवर साजेसा बेल्ट घालण्याचा ट्रेंड वाढला आहे ज्यामुळे तुमचा लुक आणखी खास बनतो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एथनिक बेल्टसह एथनिक ड्रेस घालू शकता. तो तुम्हाला पूर्णपणे वेगळा लुक देईल.

 हेअरस्टाईल

जर तुम्हाला साडीत उंच दिसायची असेल तर केस मोकळे ठेवण्याची चूक करू नका. जर तुमची उंची जास्त असेल तर एकदा तुम्ही तुमचे केस उघडे ठेवू शकता, पण कमी उंचीच्या महिलांनी नेहमी पफ किंवा हाय बन हेअरस्टाइल करावी, यामुळे त्यांची उंची अधिक दिसेल.

Web Title: Saree draping Ideas : Saree draping attractive styles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.