काही साड्यांच्या बाबतीत असं होतं की त्या साड्या घडीमध्ये असतात तेव्हा अगदी व्यवस्थित वाटतात. पण जेव्हा आपण त्या नेसतो, तेव्हा मात्र त्या फुगायला लागतात. अशी फुगीर साडी असली की ती नेसल्यावर आपण जास्तच जाड किंवा बेढब वाटू लागतो. अशी साडी सांभाळायलाही खूपच अवघड जाते. त्यामुळे जेव्हा तुमची साडी अशा पद्धतीची असेल तेव्हा ती साडी नेसताना ही एक छोटी ट्रिक लक्षात ठेवा आणि आवर्जून करून पाहा (Saree Draping Tips For Fluffy Saree). कितीही फुगणारी साडी असेल तर ती ही अगदी छान चापूनचोपून बसेल. (How to wear saree perfectly)
साडी जास्त फुगत असेल तर काय करावे?
नेसताना साडी जास्त फुगत असेल तर ती व्यवस्थित बसण्यासाठी काय करावे, याविषयीचा एक छोटासा व्हिडिओ parag_makeover and pavan_artistry_ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
महाशिवरात्रीला करून खा उपवासाचा डोसा, नेहमीच्या साबुदाणा खिचडी- भगरीपेक्षा काहीतरी वेगळं- चवदार
यामध्ये असं सांगितलं आहे की सुरुवातीला आपण साडी नेसतो, तशी नेसून घ्या. यानंतर जेव्हा साडीच्या निऱ्या घालण्याची वेळ येईल तेव्हा एका खुर्चीवर बसून घ्या.
यानंतर साडीच्या खालच्या काठाच्या निऱ्या घाला. आपण साडीच्या वरच्या काठाच्या जशा निऱ्या घालतो, तशाच पद्धतीने घालायच्या पण फक्त साडीच्या खालच्या काठाच्या घालायच्या.
खालच्या काठाच्या निऱ्या घालून झाल्यानंतर त्या खाली काठाजवळच पिनअप करून घ्या. यानंतर मध्यभागी एक पिन लावा. नंतर आता खालच्या निऱ्या जशा आहेत, तशाच पद्धतीने वरच्या निऱ्या घालून घ्या.
यानंतर पुढचे ५ ते १० मिनिटे निऱ्यांना खाली आणि मध्यभागी लावलेली पिन तशीच राहू द्या. यामुळे निऱ्या छान येट होतील.
अशी उलट पद्धतीने साडीच्या निऱ्या घालण्याची ट्रिक एकदा करून पाहा. साडी व्यवस्थित चापूनचोपून बसेल.