एरवी आपण कितीही वेस्टर्न कपड्यांमध्ये वावरत असलो तरी सणावाराला, लग्नकार्यात हमखास साडी नेसावीशी वाटतेच. अनेक जणी साडीचा फ्लोटिंग पदर घेतात आणि तो व्यवस्थित कॅरीही करतात. पण बऱ्याच जणींना मात्र असा हातावर पदर घेतला की काही काम सुचतच नाही. म्हणून त्या पदर पिनअप करतात (Saree hacks). पण त्यातही असं होतं की पदराचे समाेरच्या बाजुचे वरचे आणि खालचे काठ नीट दिसतच नाहीत (How to pin up saree pallu properly?). पदराच्या सगळ्या प्लेट्स गोळा होऊन जातात. असं होऊ नये आणि पदराचे काठ व्यवस्थित उठून दिसावेत म्हणून पदर घेताना या काही गोष्टी लक्षात ठेवा... ( How to fix saree pallu?)
साडीचा पदर कसा पिनअप करावा?
पदराचे समोरच्या बाजुचे दोन्ही काठ व्यवस्थित दिसतील आणि पदर छान चापून चोपून बसेल, यासाठी तो कसा पिनअप करावा, याविषयीचा व्हिडिओ sapnaprabhat.official या पेजवर शेअर करण्यात आला आहे.
लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र घ्यायचंय? बघा मॉडर्न तरुणींसाठी मंगळसूत्रांचे ६ फॅशनेबल डिझाईन्स
या व्हिडिओनुसार सुरुवातीला पदराच्या लहान- लहान प्लेट्स घालून घ्या. यानंतर जो वरचा काठ आहे तो सोडून इतर सगळ्या प्लेट्स पिनअप करून घ्या.
आता तो वरचा काठ खांद्याच्या थोडं समोरच्या बाजुने पिनअप करा. त्यानंतर आपण बाकीच्या पदराला जिथे पिन लावली आहे, तो भाग खांद्याच्या मागे नेऊन पिनअप करा.
असं करताना पदराचा काठाचा जो भाग थोडा बाहेर येतो, तो पुढच्या बाजुने वळवून तिथे त्याची एक छोटी प्लेट घाला आणि मग पिनअप करा.
मखंडी हलवा नावाचा पदार्थ खाल्ला आहे कधी? सीमापार पाकिस्तानातही त्याची चर्चा, पाहा रेसिपी
अशा पद्धतीने दोन पिना लावून जर पदर पिनअप केला तर तो गोळा होणार नाही तसेच पदराचा वरचा काठ आणि खालचा काठ दोन्हीही छान उठून दिसतील.