Lokmat Sakhi >Fashion > डोक्यावरून घेतलेला पदर-ओढणी सारखी सटकते? पदर डोक्यावर घेताना लक्षात ठेवा १ सोपा उपाय

डोक्यावरून घेतलेला पदर-ओढणी सारखी सटकते? पदर डोक्यावर घेताना लक्षात ठेवा १ सोपा उपाय

Saree Pallu or Dupatta Hack: सणावाराला डोक्यावरून पदर घ्यावाच लागतो आणि मग तो वारंवार सटकतो.... असे होऊ नये म्हणूनच हा एक सोपा उपाय पाहा (simple trick to fix saree pallu on head).

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2023 02:18 PM2023-10-28T14:18:12+5:302023-10-28T14:19:24+5:30

Saree Pallu or Dupatta Hack: सणावाराला डोक्यावरून पदर घ्यावाच लागतो आणि मग तो वारंवार सटकतो.... असे होऊ नये म्हणूनच हा एक सोपा उपाय पाहा (simple trick to fix saree pallu on head).

Saree pallu or dupatta hack, How to fix saree pallu or dupatta on head?  | डोक्यावरून घेतलेला पदर-ओढणी सारखी सटकते? पदर डोक्यावर घेताना लक्षात ठेवा १ सोपा उपाय

डोक्यावरून घेतलेला पदर-ओढणी सारखी सटकते? पदर डोक्यावर घेताना लक्षात ठेवा १ सोपा उपाय

Highlightsसारखा पदर किंवा ओढणी सावरण्यात वेळ जातो. त्यामुळे मग काम भराभर उरकताही येत नाही...

दिवाळी, पाडवा, भाऊबीज आणि नंतर लग्नसराई असे आता एकामागे एक सणसमारंभ असणारच आहेत. सणवार- लग्नकार्य म्हटलं की अनेक घरांमध्ये सगळे कुटूंब एकत्र जमते. यात ३ पिढ्या काही वेळा तर ४ पिढ्या एकत्र येतात. मग बऱ्याच कुटूंबात अशी परंपरा असते की घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींसमोर कुटूंबातल्या स्त्रियांना डोक्यावर पदर घेऊनच वावरावे लागते. एरवी अशी डोक्यावर पदर घेण्याची सवय नसते. त्यामुळे मग असा खास प्रसंगीच डोक्यावर पदर किंवा ओढणी असेल तर काम सुचत नाही. सारखा पदर किंवा ओढणी सावरण्यात वेळ जातो. त्यामुळे मग काम भराभर उरकताही येत नाही (How to fix saree pallu or dupatta on head?).

 

तुमचीही अशीच अडचण होत असेल तर डोक्यावर घेतलेली ओढणी किंवा पदर कसा पक्का बसवायचा याची ही एक अगदी सोपी ट्रिक पाहून घ्या.

उगवली शुक्राची चांदणी! पाहा पांढऱ्या साडीतले ‘क्लासी’ लूक!

एकदा या पद्धतीनुसार पदर डोक्यावर घट्ट बसवला की मग कितीही भराभर तुम्ही कामं उरकू शकता. अगदी लग्नकार्यात मस्त डान्स केला तरी डोक्यावरचा पदर किंवा ओढणी खाली घसरणार नाही. ही सोपी युक्ती इन्स्टाग्रामच्या karishma_dheeraj3 या पेजवर शेअर करण्यात आली आहे. 

 

डोक्यावरून घेतलेला पदर- ओढणी सटकू नये म्हणून....

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक हेअर बॅण्ड आणि २ साडीपिन लागणार आहेत.

सगळ्यात आधी पदराचा किंवा ओढणीचा जो भाग तुमच्या डोक्यावर येतो, त्या ठिकाणी थोडे थोडे अंतर ठेवून दोन पिना लावून घ्या.

कोजागरी स्पेशल : नेहमीची पावभाजी नकोच, पाहा ५ सोपे पर्यायी पदार्थ- मसाला दुधासह पार्टी रंगेल मस्त

आता या पिनांमध्ये बेल्ट अडकवा. म्हणजे तो बेल्ट तुमच्या साडीच्या उलट्या बाजुने अडकविलेला असावा. आता हा बेल्ट डोक्याला लावून घ्या. पदर बरोबर बेल्टमध्ये अडकून डोक्यावर बसेल. यानंतर तुम्हीही कितीही हालचाल केली तरी पदर- ओढणी डोक्यावरून खाली येऊन कामात अडथळा येणार नाही. 

 

Web Title: Saree pallu or dupatta hack, How to fix saree pallu or dupatta on head? 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.