Join us  

सुहाना खानच्या निळयाशार साडीवर हातानं केलेली सुंदर कशिदाकारी, चमचमती साडी देखणी भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 7:41 PM

Suhana Khan's royal blue saree: अभिनेता शाहरुख खानच्या लेकीने म्हणजेच सुहाना खानने नेसलेल्या साडीची चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगली आहे. बघूया तिच्या साडीची नेमकी खासियत तरी काय...

ठळक मुद्देरॉयल ब्लू रंगाच्या या साडीमध्ये सुहाना अतिशय देखणी दिसत असून तिच्या साडीबद्दल विशेष जाणून घेण्याची इच्छा अनेक जणींमध्ये दिसून येते. 

बॉलीवूड स्टार्सबद्दल जाणून घ्यायला जसं त्यांच्या चाहत्यांना आवडतं, तसंच त्यांच्या मुलांबद्दल म्हणजेच स्टार किड्सबद्दल (star kids) माहिती घेण्याची इच्छाही अनेकांची असते. त्यामुळे स्टार किड्सविषयीच्या पोस्टही सोशल मिडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. या स्टार किड्समध्ये सगळ्यात जास्त चर्चा असते ती शाहरुख खान आणि गौरी खानच्या लेकीची (Daughter of Shah Rukh and Gauri Khan). म्हणजेच सुहाना खान हिची. सुहाना सध्या पुन्हा एकदा चर्चेत असल्याचं कारण म्हणजे तिने नेसलेली साडी (Suhana Khan's royal blue saree look). रॉयल ब्लू रंगाच्या या साडीमध्ये सुहाना अतिशय देखणी दिसत असून तिच्या साडीबद्दल विशेष जाणून घेण्याची इच्छा अनेक जणींमध्ये दिसून येते. 

 

अनुराग कश्यप यांच्या मुलीच्या म्हणजेच आलिया कश्यप हिच्या साखरपुड्यानिमित्त नुकतंच एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं हाेतं. या समारंभासाठी सुहानाने रॉयल ब्लू रंगाची अतिशय सुंदर साडी नेसली होती.

मलायका अरोराची ७५ हजारांची बनारसी साडी!! पोपटी रंगाच्या भरजरी साडीची पाहा खासियत

ही साडी प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर अर्पिता मेहता यांच्या कलेक्शनमधली होती. साडीवर घालण्यासाठी सुहानाने अतिशय ट्रेण्डी दागिन्यांची निवड केली होती. कपाळावर काळ्या रंगाची टिकली, कानामध्ये सोनेरी रंगाचे झुमके आणि एका हातात नाजुकसं ब्रेसलेट असा सुहानाचा थाट होता. साडीवरचं तिचं ब्लाऊज स्लिव्हलेस आणि व्ही नेक होतं. ब्लाऊजवरही सिक्वीन वर्क, मिरर वर्क, हॅण्ड एम्ब्रॉयडरी असं भरगच्च काम करण्यात आलेलं आहे. 

 

कशी होती सुहानाची साडी?सुहानाने नेसलेली साडी शिफॉन प्रकारातली होती. संपूर्ण साडी प्लेन आहे. पण तिचे काठ मात्र अतिशय हेवी वर्क असणारे आहेत. त्या काठांमुळेच आणि भरजरी ब्लाऊज मुळेच साडीचं सौंदर्य वाढलं आहे.

फळं- भाज्या लवकर सडू नयेत म्हणून करा ३ सोपे उपाय, फळं- भाज्या राहतील फ्रेश

साडीच्या काठांवरही सिक्विन, मिरर, कुंदन, मोती वर्क तर आहेच, पण त्यासोबतच भरगच्च विणकामही केलेलं आहे. सुहानाच्या साडीसारखी एखादी साडी आपल्याही कलेक्शनमध्ये असावी, असं साडी लव्हर्स मैत्रिणींना नक्कीच वाटेल. 

 

टॅग्स :फॅशनसुहाना खानशाहरुख खानगौरी खानसाडी नेसणे