Lokmat Sakhi >Fashion > शिल्पा शेट्टीच्या शिफॉन साडीवरचं सुंदर कलमकारी वर्क! बघा कशी करतात कलमकारी- काय त्याची खासियत

शिल्पा शेट्टीच्या शिफॉन साडीवरचं सुंदर कलमकारी वर्क! बघा कशी करतात कलमकारी- काय त्याची खासियत

Shilpa Shetty's Beautiful Kalamkari Saree: एका पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टीने सुंदर कलमकारी साडी नेसली होती. तिचे त्या साडीवरचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2024 05:22 PM2024-02-05T17:22:49+5:302024-02-05T17:23:50+5:30

Shilpa Shetty's Beautiful Kalamkari Saree: एका पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टीने सुंदर कलमकारी साडी नेसली होती. तिचे त्या साडीवरचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत...

Shilpa Shetty's beautiful kalamkari saree, what is kalamkari work? How to do kalamkari work? | शिल्पा शेट्टीच्या शिफॉन साडीवरचं सुंदर कलमकारी वर्क! बघा कशी करतात कलमकारी- काय त्याची खासियत

शिल्पा शेट्टीच्या शिफॉन साडीवरचं सुंदर कलमकारी वर्क! बघा कशी करतात कलमकारी- काय त्याची खासियत

Highlightsशिल्पाने जी साडी नेसली होती ती साडी टिश्यू सिल्क शिफॉन या प्रकारातली असून ती फॅशन डिझायनर निधी तांबी केजरीवाल यांच्या कलेक्शनमधली होती.

बाॅलीवूडची देखणी आणि अतिशय फिट अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. योगा- व्यायाम ही शिल्पा शेट्टीची दुसरी ओळख आहे. त्यामुळेच तर पन्नाशीतही शिल्पा तिचं सौंदर्य आणि फिटनेस टिकवून आहे. शिल्पा शेट्टीने मनोरंजन क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी तिला नुकतंच 'Champion of Change 2023' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी शिल्पा शेट्टीने ऑलिव्ह ग्रीन रंगाची सुंदर कलमकारी साडी नेसली होती. यावेळी तिची साडी आणि त्या कलमकारी वर्कच्या साडीत (kalamkari work) खुलून आलेलं शिल्पाचं सौंदर्य यांची बरीच चर्चा झाली. (Shilpa Shetty's Beautiful Kalamkari Saree)

 

शिल्पाने जी साडी नेसली होती ती साडी टिश्यू सिल्क शिफॉन या प्रकारातली असून ती फॅशन डिझायनर निधी तांबी केजरीवाल यांच्या कलेक्शनमधली होती.

वडापाव- मसाला पाव नेहमीचाच, आता घ्या आईस्क्रिम पाव, गरमागरम पावमध्ये थंडगार आईस्क्रिम- रेसिपी व्हायरल

या साडीवर कलमकारी वर्क तर होतेच, पण त्याशिवाय साडीच्या काठांवर भरगच्च जरीकाम आणि सेक्विन वर्क करण्यात आलं होतं. त्यामुळे साडीचे मोठे काठ खुलून आले हाेते.

भुवया विरळ आहेत? ४ टिप्स- आयब्रोज होतील काळ्याभोर- दाट

कलमकारी प्रकारातले हत्तीचे प्रिंट तिच्या संपूर्ण साडीवर असून साडीचे काठ प्लेन आणि मोठे आहेत. या साडीवर तिने गोल्डन रंगाचं प्लेन ब्लाऊज घातलं होतं. 

कलमकारी वर्क म्हणजे काय?

 

कलम म्हणजे पेन. पेनने जी काही कलाकुसर केली जाते, त्याला कलमकारी वर्क म्हणतात (what is kalamkari work?). कलमकारी वर्क हा मुळचा इराणच्या इस्फहान प्रांतातला कला प्रकार.

केस खूप राठ- कोरडे झाले? ५ आयुर्वेदिक उपाय- केसांवर येईल चमक आणि वाढतील भराभर

भारतामध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगना या दोन राज्यांमध्येची ही कला दिसून येते. यामध्ये कपड्यावर जे रंग वापरण्यात येतात ते पुर्णपणे नैसर्गिक असतात. यामध्ये जवळपास २३ वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडून कपड्यावर टाय- डाय किंवा पेटिंग पद्धतीने वर्क करण्यात येतात. मचिलीपटणम आणि श्रीकलाहस्ती हे दोन कलमकारी वर्कचे प्रकार आहेत. श्रीकलाहस्ती प्रकारात फ्री हॅण्ड ड्रॉईंग केलं जातं तर मचिलीपटणम या प्रकारात ब्लॉक प्रिंटिंग केलं जातं. (How to do kalamkari work?)

 

Web Title: Shilpa Shetty's beautiful kalamkari saree, what is kalamkari work? How to do kalamkari work?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.