Join us  

हेवी ब्रेस्टसाईज म्हणून खूप घट्ट ब्रेसियर घालणं धोक्याचं, तब्येतीवर होतात ४ गंभीर परिणाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 8:51 PM

Side Effects of Tight Bra For Heavy Breast : Health impact of wearing a very tight bra : वाईट दिसतं म्हणून किंवा नाईलाज म्हणून खूप घट्ट ब्रेसियर घालणं बंद करायला हवं कारण...

आपला ब्रेस्ट शेप व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी ब्रेसियर घालणे गरजेचे असते. ब्रेसियर हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. ब्रेसियर खरेदी करताना सर्वप्रथम त्याचे फिटिंग हे योग्य असले पाहिजे. योग्य फिटिंगची ब्रेसियर घेतल्यास ती आपल्या स्तनांना योग्य पद्धतीने आधार देते. ब्रेसियर विकत घेताना त्याचे कप्स, बँड, स्ट्रिप्स या तीन महत्वाच्या गोष्टींची खास काळजी घ्यायला हवी. ब्रेसियर योग्य आकार आणि फिटिंगची निवडणे खूप महत्वाचे असते. ज्याप्रमाणे लूज ब्रा घातल्याने योग्य फिटिंग मिळत नाही, त्याचप्रमाणे अतिशय घट्ट ब्रा घातल्यानेही आपल्या शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते(Side Effects of Tight Bra For Heavy Breast).

विशेषत: हेव्ही ब्रेस्ट असलेल्या महिलांना या समस्येला अधिक सामोरे जावे लागू शकते. काही महिला हेव्ही ब्रेस्ट असल्यामुळे स्तनांचा आकार कमी दिसावा म्हणून अतिशय घट्ट ब्रेसियर घालतात. परंतु अशी एकदम घट्ट फिटिंगची ब्रेसियर घालून स्तनांचा आकार कमी दिसण्याऐवजी तो बिघडण्याची अधिक जास्त शक्यता असते. हेव्ही ब्रेस्टसाठी खूप घट्ट ब्रा शरीराला कोणकोणत्या प्रकारची हानी पोहोचवू शकते याबद्दल स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. अदिती बेदी यांनी अधिक माहिती दिली आहे(Health impact of wearing a very tight bra).

खूप घट्ट ब्रेसियर घातल्याने शरीराचे कोणते नुकसान होते ? 

१. रक्ताभिसरण खराब होते :- जर तुम्ही हेव्ही ब्रेस्टसाठी खूप घट्ट ब्रेसियर घातली तर त्याने खूप नुकसान होऊ शकते. यामुळे ब्रा लाईनच्या आसपासच्या भागातील रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होऊ शकतो. ब्रा च्या टाईट पट्ट्यांमुळे त्वचेला इजा होऊ शकते. स्तनांजवळील त्वचेला मोकळी हवा लागणे देखील तितकेच गरजेचे असते. अशी घट्ट ब्रा घातल्याने त्या भागांतील घाम बाहेर येण्यास अटकाव केला जातो. यामुळे अनेक स्किन प्रॉब्लेम्स होऊन तिथली त्वचा खराब होऊ शकते. रक्ताभिसरणावर परिणाम झाल्याने खांदे आणि पाठदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. 

रात्री झोपताना कोणत्या प्रकारच्या ब्रेसियर घालू नयेत? नको त्या आजारपणाचा वाढतो धोका...

२. त्वचेवर पुरळ येऊ शकते :- खूप घट्ट ब्रा घातल्याने त्वचेवर पुरळ येऊ शकते. वास्तविक, खूप घट्ट ब्रा त्वचेला जास्त चिकटून राहते, ज्यामुळे त्वचेला इरिटेशन होऊन पुरळ येऊ शकते. खूप घट्ट ब्रा घातल्याने ब्राच्या पट्ट्याभोवतालच्या स्किनवर पुरळ आणि मुरुम येऊ शकतात.

३. ॲसिडिटीची समस्या वाढू शकते :- खूप घट्ट ब्रा घातल्याने छातीत जळजळ आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते. खूप घट्ट वायर ब्रा घातल्यामुळे छातीवरील दबाव  वाढतो आणि नंतर अ‍ॅसिड रिफ्लक्स छातीकडे वाढू लागतो. म्हणून, नेहमी योग्यरित्या फिटिंग असणारीच ब्रा घालावी.

मासिक पाळीत कपड्यांवर डाग पडले? ७ सोपे उपाय - डाग आणि दुर्गंधी गायब...

टॅग्स :फॅशनआरोग्य