स्त्री म्हटलं की तिला नटण्या- मुरडण्याची हौस असतेच. स्त्री सगळ्याच प्रकारचे कपडे परिधान करू शकते. साडी, ड्रेस, पॅन्ट शर्ट, घागरा चोली असें अनेक कपड्यांचे प्रकार आणि व्हरायटी आपल्याला घालायला आवडतात. काही जाड महिलांना आपल्या शरीराबाबत किंवा शरीराच्या आकाराबद्दल मनात थोडा न्यूनगंड असतोच. मी जाड आहे... मला हा आऊटफिट चांगला दिसेल का?, मी या कपड्यात जाड तर दिसणार नाही ना...? या ड्रेसमधून माझे पोट फारच दिसत आहे...अशा नानाविध शंका या महिलांच्या मनात असतात. अशावेळी एखादा आऊटफिट मनातून कितीही आवडलेला असला तरी आपण तो परिधान करताना थोडं घाबरतोच. आजकाल घागरा- चोली, वेस्टर्न लॉंग स्कर्ट्सची परत फॅशन आली आहे. हे घागरा चोली घातल्या नंतर त्यातून आपले थोडे पोट हे दिसतेच. त्याचबरोबर जर तुमच्या कमरेभोवती जास्त फॅट्स असेल किंवा तुम्ही कमरेतून जाड असाल तर अश्यावेळी घागरा परिधान केल्यास कमरेच्या दोन्ही बाजूंनी आपले साईड फॅट्स बाहेर येऊन आपण घागरा घातल्यावर कमरेतून जाड दिसतो. परंतु यावर आपण घरच्या घरी एक सोपा उपाय करू शकतो. घागरा घातल्यानंतर कमरेभोवती असणारे साईड फॅट्स घागऱ्यातून दिसू नये म्हणून ही एक सोपी ट्रिक घरी नक्की करून पाहा(Fashion Tip : 1 Smart Solution To Hide Side Fats or Tummy Hack After Wearing Ghagra).
नक्की काय करता येऊ शकत?
आजकाल लग्नाला किंवा घरातील कोणत्याही फंक्शनला किंवा सणांना घागरा - चोली घालण्याचा एक ट्रेंड सुरु झाला आहे. जर आपली कंबर कमनीय असेल तर हा घागरा आपल्याला उत्तम दिसतोच. परंतु घागरा घातल्यानंतर कमरेतून मी जाड दिसते, कमरेभोवती असणारे साईड फॅट्स घागऱ्यातून बाहेर डोकावताना दिसते, अशी काही महिलांची समस्या असते. अशावेळी घागरा - चोली घालण्याची कितीही आवड असली तरी आपण ते घालणे टाळतो. परंतु आता काळजी करू नका. घरच्या घरी एक सोपा उपाय करून आपण हे साईड फॅट्स लपवू शकतो.
घागरा घातल्यानंतर कमरेभोवती असणारे साईड फॅट्स घागऱ्यातून दिसू नये म्हणून एक सोपी ट्रिक simran_nikky या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे.
नक्की उपाय काय आहे ?
१. घागरा चोली मधील चोली किंवा ब्लाऊज यांना मॅच होणारा एक लांब बेल्ट तयार करून घ्या.
२. चोली, ब्लाऊज किंवा घागरा शिवताना त्यातील जास्तीचे कापड उरले असेल तर त्यातून तुम्ही हा बेल्ट शिवू शकता.
३. या बेल्टच्या बरोबर मध्यभागी एक सेफ्टी पिनलावून घ्या. सेफ्टी पिन बरोबर मध्यभागी अशी लावा की, त्या बेल्टचे दोन्ही बाजूस समांतर भाग तयार होतील.
४. त्यानंतर तुमच्या ब्लाऊजच्या मध्यभागी (पोटाच्या वर) हा बेल्ट ब्लाऊजला अटॅच करून घ्या.
५. समोरून हा बेल्ट ब्लाऊजला अटॅच केल्यानंतर दोन्ही बाजूस दोन सामान भाग उरतील.
६. हे दोन्ही सामान भाग तुमच्या कमरेभोवती जिथे फॅट्स आहेत त्यावरून घेऊन पाठीमागे पट्ट्या सारखे बांधा. (व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे)
७. बेल्ट्सचे हे दोन्ही भाग तुमच्या कमरेवरून आल्यामुळे तुमच्या कमरेभोवती असणारे एक्स्ट्रा फॅट्स या बेल्टमुळे लपून जाईल.
८. या बेल्स्टमुळे कमरेभोवती असणारे फॅट्स लपल्यामुळे आपण घागरा घातल्यावर देखील जाड दिसत नाही.
घागरा घातल्यानंतर कमरेभोवती असणारे साईड फॅट्स घागऱ्यातून दिसू नये म्हणून हा एक सोपा उपाय नक्की ट्राय करून पाहा.