Join us  

गरबा खेळताना मोबाइल कुठं ठेवायचा? पाहा ६ सोपे स्टायलिश पर्याय-मोबाइल हरवण्याची-पडण्याची भीती नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2024 4:14 PM

Simple Ways To Carry Your Mobile While Playing Garba : New Ways to Carry Your Mobile While Playing Garba : घागऱ्याला खिसे नसतात आणि पर्स सोबत नेणं बरं दिसत नाही, मग करायचं काय?

सध्याच्या काळात मोबाईल फोन ही सर्वात अत्यावश्यक वस्तू मानली जाते. आपण कुठेही गेलो तरीही आपला मोबाईल कायम आपल्या सोबतच घेऊन जातो. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवट ही मोबाईल फोन हातात घेऊनच होते. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कायम हा मोबाईल आपल्या हातातच असतो. जिथे जाऊ तिथे कायम मोबाईल आपल्या सोबत ठेवणे म्हणजे तो व्यवस्थित कॅरी करणे आलेच. काहीवेळा आपण फोन हातात, बॅगेत, शर्ट - पँटच्या खिशात ठेवतो. सध्या नवरात्र सगळीकडे अतिशय जल्लोषात साजरी केली जात आहे(New Ways to Carry Your Mobile While Playing Garba).

काहीजण अगदी रोज आवडीने गरबा खेळायला जातात. गरबा खेळायला जाताना मोबाईल हातात कसा धरणार असा प्रश्न पडतो. याचबरोबर जर मोबाईल खिशात ठेवला तर नाचताना तो पडण्याची शक्यता असते. गरबा - दांडिया खेळायला जाताना जर आपण मोबाईल घेऊन गेलो तर तो हातातच पकडावा लागतो. यामुळे अवघडल्यासारखे होते तसेच आपल्याला गरबा खेळण्याचा (Now no more worries about keeping mobile , cash , card , car keys and garba passes while playing garba) आनंदही नीट घेता येत नाही. नाचताना मोबाईल हातातून पडला तर तो फुटण्याची भीती मनात कुठे ना कुठे असतेच. या गोष्टीचे टेंन्शन घेऊन आपण हवा तसा गरब्याचा आनंद घेऊ शकत नाही. यासाठीच गरबा खेळायला जाताना मोबाईल जर सोबत नेला असेल तर तो कॅरी करून गरबा कसा खेळावा याच्या काही सोप्या टिप्स पाहुयात. या साध्यासोप्या टिप्स वापरुन आपण गरबा खेळताना मोबाईल सहजपणे कॅरी करु शकता(Simple Ways To Carry Your Mobile While Playing Garba).

गरबा खेळताना मोबाईल असा कॅरी करा... 

१. छोटासा बटवा :- गरबा खेळायला जाताना आपल्या ड्रेसला मॅचिंग होणारा असा एक छोटा बटवा कॅरी करु शकता. या बटव्यात आपण मोबाईल, पाण्याची छोटीशी बॉटल, रुमाल काही पैसे असे अगदी गरजेला लागणारे साहित्य कॅरी करु शकता. याचबरोबर हा छोटासा बटवा आपण आपल्या कमरेला किंवा हातात अडकवून अगदी सहजपणे गरबा खेळू शकता. 

गरबा खेळताना घाला ट्रॅडिशनल पण हटके ‘असे’ स्टायलिश शूज, पायही दुखणारही नाहीत आणि दिसालही ट्रेंडी !

२. स्लिंग बॅग :- सध्या बाजारांत नवरात्र स्पेशल डिझाईन्स असणाऱ्या छोट्या आकाराच्या स्लिंग बॅग विकत मिळतात. या वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या, डिझाईन्सच्या बॅग आपण विकत घेऊ शकता. या बॅगमध्ये आपल्या मोबाईलसोबतच इतर महत्वाच्या वस्तू देखील ठेवता येतील. 

३. वेस्ट पाऊच :- आपण वेस्टर्न कपड्यांवर शक्यतो जसे कमरेला अडकवणारे वेस्ट पाऊच वापरतो, तसेच आपण नवरात्रीत गरबा खेळताना अशा वेस्ट पाऊचचा वापर करु शकतो. सध्या बाजारात मिरर वर्क, रंगीबेरंगी धाग्यांचे वर्क असणारे नवरात्र स्पेशल वेस्ट पाऊच अगदी सहज विकत मिळतात. या वेस्ट पाऊचमध्ये आपण मोबाईल, घराची चावी, रुमाल, पाण्याची बॉटल असे इतर आवश्यक लागणारे साहित्य चटकन सहजपणे कॅरी करु शकता. तसेच या वेस्ट पाऊचमध्ये एकदा का सामान भरून अडकवले की आपण गरबा खेळायला फ्री झालाच म्हणून समजा.      

मिरर वर्कचे चोली पॅटर्न पाहा! गरबा खेळताना घालावे असे डिझाइन-हजारोंच्या गर्दीत चमकाल इतके भारी...

४. बेल्ट पाऊच :- बेल्ट पाऊच हा काहीसा वेस्ट पाऊच सारखाच प्रकार आहे. यात एक बेल्ट असतो आणि त्या बेल्टला एक छोटेसे पाऊच अटॅच केलेले असते. जसे आपण जीन्सला बेल्ट लावतो तसेच हा बेल्ट आपण आपल्या घागऱ्यावर कमरेला लावू शकतो. हा बेल्ट विकत घेताना शक्यतो तो घागरा चोलीला मॅच होईल असाच घ्यावा. जेणेकरून तो कमरेला बांधल्याने ऑड वाटणार नाही, तसेच तो आपल्या आऊटफिटला परफेक्ट मॅच होईल. 

गरबा खेळताना माथापट्टी तिरकी होते-बिंदी पडून जाते? २ सोप्या युक्त्या-फोटोही येतील एकदम परफेक्ट...

५. स्लिंग फोन केस :- जर तुम्हाला इतर कोणत्याही वस्तू कॅरी न करता फक्त फोनच कॅरी करायचा असेल तर स्लिंग फोन केस आपल्याला फायदेशीर ठरेल. यात फक्त मोबाईल फोनच्या आकाराची आडवी स्लिंग केस असते. मोबाईल फोनच्या कव्हरच्या साईझ एवढीच ही स्लिंग केस मिळते. आपण ही स्लिंग केस आपल्या खांद्यावर तिरकी अडकवू शकता आणि अगदी आरामात कोणत्याही अडचणीशिवाय गरबा खेळू शकता.

६. छल्ला पाऊच :- बाजारात विकत मिळणाऱ्या छल्ला पाऊचचा देखील आपण वापर करु शकता. हे पाऊच उभे मोबाईलच्या आकारासारखे आयाताकृती असतात. त्यामुळे यात मोबाईल अगदी सहजपणे व्यवस्थित फिट बसू शकतात. हे पाऊचेस आपण एखाद्या छल्ल्याप्रमाणेच आपल्या कमरेला लावू शकता. हे पाऊच आपण साडी किंवा घागऱ्यावर देखील घालू शकता. या पाऊचला वरच्या बाजूला एक हुक असते जे सहजपणे आपल्या कमरेवर आपण अडकवू शकता.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४फॅशननवरात्रीगरबानवरात्री गरबा २०२४