Join us  

रिसेप्शनसाठी सोनाक्षी सिन्हा नेसली सुंदर चांदबुटी साडी, त्या लालबुंद साडीची किंमत ऐकूनच नेटीझन्स म्हणाले... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 1:03 PM

Sonakshi Sinha- Zahir Iqbal Wedding Reception: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी नुकतंच लग्न केलं असून लग्नाच्या रिसेप्शनप्रसंगी सोनाक्षीने नेसलेली साडी सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे... (Sonakshi Sinha red banarasi chandbuti saree costs 79k)

ठळक मुद्देया महागड्या साडीमध्ये सोनाक्षीचे सौंदर्य खुलून आले होते, असं तिचे चाहते आणि नेटीझन्स म्हणत आहेत.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी यांच्या हिरामंडी मध्येही तिची प्रमुख भूमिका आहे. त्यामध्ये तिने केलेल्या अभिनयाचेही सध्या भरभरून कौतूक होत आहे. त्यातच तिने लग्न करणार असल्याचे जाहीर केले आणि जहीर इक्बालसोबत कोर्ट मॅरेजही केले (Sonakshi Sinha- Zahir Iqbal court marriage). लग्नानिमित्त आयोजित भव्या रिसेप्शन सोहळ्यासाठी सोनाक्षीने लाल रंगाची सुंदर बनारसी साडी नेसली होती (Sonakshi Sinha- Zahir Iqbal Wedding Reception). चांदबुटी डिझाईन असलेल्या या साडीची किंमत तब्बल ७९ हजार ८०० रुपये एवढी असल्याचे सांगितले जाते. या महागड्या साडीमध्ये सोनाक्षीचे सौंदर्य खुलून आले होते, असं तिचे चाहते आणि नेटीझन्स म्हणत आहेत. (Sonakshi Sinha red banarasi chandbuti saree costs 79000)

 

सोनाक्षीने जी लालबुंद रंगाची साडी नेसली होती ती साडी रॉ मँगो या ब्रॅण्ड हाऊसच्या वेडिंग डिझायनर कलेक्शनपैकी होती. रॉ मँगो या ब्रॅण्डच्या साड्या अतिशय तलम आणि वजनाला हलक्या असतात. जेवढी साडी वजनाला हलकी तेवढी तिची किंमत जास्त असं या ब्रॅण्डच्या बाबतीत एक समीकरण आहे.

ॲल्युमिनियम फॉईलने कपड्यांना एकदम कडक इस्त्री करण्याची भन्नाट ट्रिक- कपड्यांवरच्या सुरकुत्या गायब 

साडीवर करण्यात आलेले जरीकाम अतिशय खास होते. सोन्याचांदीची जर वापरून साडीचे काठ आणि पदर डिझाईन करण्यात आला होता. त्यामुळेच या साडीची किंमत एवढी जास्त होती, असं म्हणतात. तिची ही साडी चांदबुटी प्रकारात येते. तो प्रकार म्हणजे नेमके काय ते पाहूया...

 

चांदबुटी साडी म्हणजे काय?

बनारसी साड्यांवर जी बुटी असते ती वेगवेगळ्या आकारात येते. सोनाक्षीने जी साडी नेसली होती त्या साडीवरची बुटी आकाराने मोठी होती आणि बुटीच्या खालच्या बाजुला चंद्रकोरीप्रमाणे आकार होता.

डाएटींग- व्यायाम न करताही वजन कमी करण्याच्या ६ भन्नाट ट्रिक, वाढलेली चरबी झरझर उतरेल

या आकारामुळेच ती साडी चांदबुटी साडी म्हणून ओळखली जाते. या साडीवर साेनाक्षीने चांदबाली प्रकारातले मोठे झुमके घातले होते. तसेच तिने घातलेला नेकलेसही आकर्षक होता. प्लेन लाल रंगाचे आणि बंद गळा असणारे ब्लाऊज, मधोमध भांग पाडून मागच्या बाजुने घातलेला अंबाडा आणि त्यावर माळलेला गजरा, कपाळावर मोठी टिकली, हातभरून लाल बांगड्या यामुळे नव्या नवरीचे सौंदर्य खुलून आले होते.   

टॅग्स :सोनाक्षी सिन्हासाडी नेसणेलग्नफॅशन