लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. सोनाली नेहमीच तिचे हटके फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या फोटोंवर चाहतेही भरभरून प्रतिक्रिया देत असतात. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक सोनाली प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. सोनालीने केलेल्या या हटके फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोनालीने या फोटोशूटमधील काही मोजके फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. सोनालीने या फोटोशूट दरम्यान सतरंगी चिक्की खणाची साडी त्यावर वेस्टर्न पद्धतीचा ब्लाऊज त्याबरोबरच सतरंगी चिक्की खणाची पॅन्ट आणि क्रॉप टॉप असा मॉडर्न लूक केला आहे(Sonali Kulkarni's 'Khan' Fashion : Attractive Modern Dress).
सतरंगी चिक्की खण काय असते?
सोनालीने सतरंगी चिक्की खण या प्रकारच्या खणाचा आगळावेगळा आऊटफिट परिधान केलेला लुक तुफान व्हायरल होताना दिसत आहे. सतरंगी चिक्की खण हा खणाच्याच कापडाचा एक प्रकार आहे. फक्त या खणाच्या कापडात केवळ एकच रंग नसून हे कापड सतरंगी रंगात येते. मल्टीकलरमध्ये असणारा हा चिक्की खणाचा प्रकार फार लोकप्रिय होताना दिसत आहे.
पारंपरिक खणाला आधुनिक टच...
गेल्या काही वर्षांमध्ये खणाच्या साडीचा ट्रेंड वाढताना दिसून येतोय. पण अजूनही तरूण मुलींना साडी नीट सांभाळता येतेच असं नाही. मग ज्यांना पारंपरिकता आणि आधुनिकता दोन्ही एकत्र जपण्याची इच्छा आहे अशांसाठी ही स्टाईल नक्कीच उपयोगी पडू शकते. क्रॉपटॉप आणि पँटमध्ये मुली अत्यंत कम्फर्टेबल असतात आणि त्यामुळेच खणाच्या कपड्यांधील ही स्टाईल तरूणाईला आकर्षित करेल असं दिसून येतंय.
कॅप्शनमध्ये सोनाली काय म्हणतेय...
या लूक मधील फोटो शेअर करताना सोनालीने ''कोणं म्हणतं खण साडी फक्त पारंपारिक पद्धतीनेच शोभून दिसते'' असे कॅप्शनसुद्धा दिले आहे. यावेळी सोनालीने साध्या सिंपल खणाच्या साडीला वेस्टन टच दिला आहे. या लूकमध्ये सोनालीचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत आहे. त्याबरोबरच हटके पॅन्ट सूट आणि क्रॉप टॉपची कल्पना मीरा-द लूट अफेअर या ब्रॅण्डची असून या लुकमुळे सोनालीचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.
पारंपरिक विणकरांसाठी...
सोनालीने याबद्दल विशेष इन्स्टाग्राम पोस्ट सुद्धा केली आहे. यात ती असं सांगते की, “आपल्या पारंपरिक विणकरांना आत्ताच्या काळातील पद्धतीनुसार पाठिंबा देण्याचा माझा एक प्रयत्न”. सोनालीच्या या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.