Lokmat Sakhi >Fashion > 'घरचोला' साडी नेसून मैत्रिणीच्या लग्नाला गेली साेनम कपूर, बघा या गुजराथी साडीचं वैशिष्ट्य काय....

'घरचोला' साडी नेसून मैत्रिणीच्या लग्नाला गेली साेनम कपूर, बघा या गुजराथी साडीचं वैशिष्ट्य काय....

Sonam Kapoor In Bright Red Gharchola Saree: गुजराथी पद्धतीने नेसलेली चमकदार लाल रंगाची घरचोला साडी आणि हातात सोनेरी रंगाची पोटली घेऊन मैत्रिणीच्या लग्नात गेलेली सोनम कपूर अतिशय लक्षवेधी ठरली. (What is gharchola saree?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2024 05:02 PM2024-02-06T17:02:25+5:302024-02-06T17:03:21+5:30

Sonam Kapoor In Bright Red Gharchola Saree: गुजराथी पद्धतीने नेसलेली चमकदार लाल रंगाची घरचोला साडी आणि हातात सोनेरी रंगाची पोटली घेऊन मैत्रिणीच्या लग्नात गेलेली सोनम कपूर अतिशय लक्षवेधी ठरली. (What is gharchola saree?)

Sonam Kapoor in bright red Gharchola saree, What is gharchola saree? Importance of gharchols saree in Gujarathi tradition | 'घरचोला' साडी नेसून मैत्रिणीच्या लग्नाला गेली साेनम कपूर, बघा या गुजराथी साडीचं वैशिष्ट्य काय....

'घरचोला' साडी नेसून मैत्रिणीच्या लग्नाला गेली साेनम कपूर, बघा या गुजराथी साडीचं वैशिष्ट्य काय....

Highlightsसोनमच्या त्या लूकची आणि तिच्या घरचोला साडीची सध्या सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा होत आहे.

आपल्याला माहितीच आहे की सोनम कपूरला बॉलीवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखलं जातं. तिची अशी ओळख झाली आहे, ती काही उगाच नाही. सोनमचा फॅशनसेन्स जबरदस्त असून भारतीय तसेच पाश्चिमात्य असे दोन्ही कपडे कॅरी करण्याची तिची स्टाईल अफलातून आहे. आता हेच बघा ना एका मैत्रिणीच्या लग्नाला सोनम कपूर घरचोला साडी खास गुजराथी पद्धतीने नेसून गेली. त्याला साजेसा मेकअप आणि दागदागिने घातले आणि हातात सुंदर पोटली घेतली... तिचा हा लूक वरवर पाहता अगदी साधा होता (Sonam Kapoor in bright red Gharchola saree). पण तिने ती साडी, दागिने, पोटली ज्या पद्धतीने कॅरी केली, ती स्टाईल खूपच खास होती. त्यामुळेच तर सोनमच्या त्या लूकची आणि तिच्या घरचोला साडीची (What is gharchola saree?) सध्या सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा होत आहे. (Importance of gharchols saree in Gujarathi tradition)

 

घरचोला साडी कशी असते?

सोनम कपूरने नेसलेली घरचोला साडी ही चमकदार लाल रंगाची होती. घरचोला या प्रकारात लाल आणि हिरवा हे दोनच रंग दिसून येतात. या रंगातल्या वेगवेगळ्या शेड्समध्ये ही साडी मिळू शकते.

स्टायलिश लूक देणारे लेटेस्ट फॅशनचे लांब बाह्यांचे ब्लाऊज, ७ सुंदर डिझाईन्स- ट्राय करून पाहा

घरचोला हा प्रकार मुळचा गुजरातचा. यालाच घाटचोला किंवा घरचोलू अशा नावानीही ओळखलं जातं. घरचोला साड्या या सिल्क आणि सुती या दोन प्रकारातच असतात. त्यांच्यावर बांधणी आणि टाय- डाय पद्धतीने काम करण्यात येतं. या साडीवर प्रामुख्याने चेक्स प्रिंट असतं. आणि त्या चेक्सच्या चौकटीमध्ये कमळ, फुलं, मोर, पोपट अशी नक्षी असते.

 

घरचोला साडीचे वैशिष्ट्य 

गुजरातमध्ये लग्नकार्याप्रसंगी घरचोला साडीला अतिशय महत्त्व आहे. लग्न झाल्यानंतर जेव्हा नववधू तिच्या सासरच्या घरी पहिल्यांदा येते, तेव्हा तिची सासू तिला घरचोला साडी किंवा ओढणी देऊन तिचं स्वागत करते.

डायमंड फेशियलसारखा ग्लो मिळेल घरीच, फेशियलवर भरमसाठ पैसे खर्च करण्यापेक्षा हा उपाय करा...

नवरीच्या या घरचोला साडीची किंवा ओढणीची गाठ नवरदेवाच्या शालीला बांधली जाते. गुजरात आणि राजस्थान दोन्ही ठिकाणी ही परंपरा दिसून येते. त्यामुळेच तर गुजराथमध्ये लग्न ठरलेल्या नवरीसाठी घरचोला साडी किंवा ओढणी अगदी आवर्जून घेतलीच जाते. 
 

Web Title: Sonam Kapoor in bright red Gharchola saree, What is gharchola saree? Importance of gharchols saree in Gujarathi tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.