बॉलिवूडच्या स्टायलिश अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर सोनम कपूरचे नाव या यादीत नक्कीच येते. सोनम कपूरचा फॅशन सेन्स आणि महागड्या लक्झरी ब्रँडच्या कपड्यांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होते. अलीकडेच, एका आयपीएल सामन्यादरम्यान, ती अॅपलचे सीईओ टीम कुक यांना भेटायला गेली होती. यावेळी तिने सुंदर साडी नेसली होती. या साडी विषयी अधिक माहिती स्वतः सोनम कपूर हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन दिली आहे. सोनम कपूरने सांगितले की तिने सामन्यासाठी विशिष्ट फॅब्रिकची साडी का निवडली, जी खूप आरामदायक आहे.
मिस फॅशनिस्टा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनम कपूरने लिनेन फॅब्रिकच्या साडीतील अतिशय सुंदर फोटोज नुकतेच शेअर केले आहेत. सोनम कपूर ही बॉलीवूडची बेस्ट फॅशनिस्टा आहे. तिने हे नेहमीच तिच्या लूक्समधून दाखवून दिले आहे. लेटेस्ट इंटरनॅशनल ट्रेंड्स असो किंवा स्वतः नवीन ट्रेंड बनवणे असो, सोनम प्रत्येक गोष्टीत आघाडीवर असते. सोनमचा फॅशन सेन्स आणि पर्सनल स्टाईल वेगळी आहेच शिवाय अतिशय सुंदरही आहे. सोनम बी-टाऊनमधील अशा काही अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांच्या स्टाईलपासून अनेकजणी प्रेरणा घेऊ शकतात किंवा ती स्टाईल कॉपी करू शकतात. सोनम ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांना भारतीय आउटफिट्स परिधान करणे आवडते. इंडियन वेअरमध्येही सोनमला सर्वात जास्त साडी आवडते, असेही तिने लूक्समधून दाखवून दिले आहे(Sonam Kapoor's secret to dressing in extreme Indian heat: Simple linen saree with a touch of vintage jewellery).
सोनम कपूरने लिनन फॅब्रिकची साडी नेसली होती...
सोनम कपूरने शेअर केलेल्या इंस्टाग्राम फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे की ती उन्हाळ्यात भारतीय साडीला सर्वात आरामदायक आऊटफिट्स असे मानते. तसेच भर उन्हांत तिला भारतीय पद्धतीची साडी नेसायला आवडते. पिवळ्या आणि मोतिया रंगांच्या छटा असलेल्या या साडीत सोनमचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. तिची साडी लिनेन फॅब्रिकची होती, तसेच या सुंदर रंग छटा असलेल्या साडीला परफेक्ट मॅचिंग असे विंटेज दागिने तिने परिधान केले होते.
भरीव, दाट पापण्या व भुवयांसाठी सोनम सांगते एक राज की बात, १ घरगुती उपाय... भुवया पापण्या होतील दाट..
कॅज्युअल ब्लाउज कॅरी केला....
सोनमने ही साडी सुंदर ड्रेप केली होती आणि त्यामुळेच तिची स्टाइल खूपच हटके दिसत होती. साडीवर छोट्या छोट्या बुट्ट्यांची प्रिंट दिसत होती, ज्यामुळे तिच्या साडीला एक सुंदर लूक येत होता. तिने या साडीसोबत कॅज्युअल फुल स्लीव्हज ब्लाउज घातला होता, जो तिला खूप सुंदररीत्या फिट होत होता. तिचा हा लूक एकदम परफेक्ट दिसत होता. तिने आपला हटके लूक पूर्ण करण्यासाठी पिवळ्या रंगाचा सिल्कचा दुपट्टा परिधान केला होता, त्यावर सोनेरी जरी वर्कने सजवले होते.
सोनमच्या स्टेटमेंट ज्वेलरीचा शाही थाट...
सोनमने आपल्या लुकमध्ये मोहकता आणण्यासाठी गोल्डन विंटेज ज्वेलरी कॅरी केली होती. ज्यामध्ये पारंपारिक झुमके, सुशोभित केसांच्या क्लिप, ब्रेसलेट, स्टेटमेंट रिंग आणि बेज रंगाचा बटवा यांचा समावेश होता. तर मेकअपसाठी, लाइट फाउंडेशन, न्यूड लिपस्टिक शेड, डोळ्यांना लावलेले काजळ,गालांवर हलकासा ब्लश तसेच केसांचा एका बाजूने पार्टेड बन घालून साडीला साजेशी अशी हेअर स्टाईल केली होती.
सनग्लासेस विकत घेताय? ५ गोष्टी चेक कराच, फेक सनग्लासेस खरेदी केले तर होतात गंभीर आजार...
लिनेन फॅब्रिक नेमकं कस असत ?
जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे कॉटन फॅब्रिक. पण त्यापेक्षाही हलके फॅब्रिक लिनेन आहे. हे फॅब्रिक अधिक हवेशीर आणि हलके मानले जाते, जे आजकाल लोकांना खूप आवडते. हे असे फॅब्रिक आहे जे आपल्या शरीरानुसार आकार घेते.त्याच वेळी, हे फॅब्रिक जगातील सर्वात मजबूत नैसर्गिक फायबर म्हणून ओळखले जाते, म्हणूनच त्याचे कपडे खूप काळ टिकतात. तसेच लिनेन फॅब्रिकचे कापड भरपूर महाग असते, कारण ते विणणे फारच कठीण काम असते. त्यामुळे त्याच्या उत्पादनात बराच खर्च येतो. लिनन महागड्या फॅब्रिकपैकी एक आहे. तर कॉटन त्याच्यापेक्षा स्वस्त थोडे आहे. लिनन सर्वांच्या खिशाला परवेडल असे अजिबात नाही. कॉटन आणि लिनन दोन्हीची निर्मिती ही नैसर्गिक फायबरच्या माध्यमातूनच केली जाते. दोन्ही प्लांटमध्ये तयार होत असले तरी त्याचे प्लांट हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. वेगवेगळ्या प्लांटमध्ये तयार होत असल्यामुळे साहजिकच दोन्हीत फरक दिसून येतो.