Join us  

दीर्घकाळ स्पोर्ट्स ब्रा वापरल्याने पाठदुखीची समस्या होऊ शकते का ? एक्स्पर्ट सांगतात खरे कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2023 11:44 AM

Is it OK to wear sports bra as everyday bra? : चुकीच्या आकाराची किंवा घट्ट स्पोर्ट्स ब्रा घातल्याने तुमचे बॉडी पोश्चर बदलू शकते, ज्यामुळे पाठदुखी होऊ शकते.... हे खरं आहे का ?

'ब्रेसियर' हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच आहे. घरातून बाहेर पाऊल टाकायचे म्हटले की महिलांना सर्वातआधी 'ब्रेसियर' घालावी लागते. दिवसभर स्त्रियांना या 'ब्रा' चा वापर करावा लागतोच. आपलं शरीर सुडौल आणि सुव्यवस्थित ठेवण्यासाठी ब्रा वापरणं अतिशय गरजेचं असत. स्त्रियांच्या या ब्रेसियरचे एक सोडून अनेक प्रकार असतात. आपल्या बाहेरील कपड्यांप्रमाणे ब्रा चा प्रकार हा कायम बदलत असतो. त्यामुळे स्त्रियांना प्रत्येक वेगळ्या कपड्यांसाठी वेगळी ब्रा घालावी लागते(Is It Bad to Wear a Sports Bra All Day, Every Day? We Asked the Experts).

स्त्रियांच्या नेहमीच्या या ब्रेसियरमध्ये टीशर्ट ब्रा, स्ट्रेपलेस ब्रा, पुशअप ब्रा, फुल कव्हरेज ब्रा, स्टायलिश बॅक ब्रा, स्पोर्ट्स ब्रा असे असंख्य प्रकार पाहायला मिळतात. ब्रेसियर रोज वापरत असल्याने ती कम्फर्टेबल असणे गरजेचेच असते. त्यामुळे आपण ब्रेसियरचा रंग, कापड याकडे पाहतो पण त्याचा साइजच व्यवस्थित नसला तर, आपल्या स्तनांचा आकार विचित्र दिसतो आणि कालांतराने आपल्याला आरोग्याच्याही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अनेकदा चुकीच्या साइजमुळे, तर कधी ब्रेसियर  खूप घट्ट झाल्याने आपण अनकम्फर्टेबल होतो. एवढेच नव्हे तर अनेकवेळा चुकीच्या साईजची तसेच ब्रेसियरचा चुकीचा प्रकार वापरल्याने पाठ किंवा खांदे दुखू लागतात, ही समस्या दीर्घकाळ टिकून राहू शकते. आपल्यापैकी काही महिला या रोज स्पोर्ट्स ब्रा (Sports Bra Pressure: Effect on Body Skin Temperature and Wear Comfort) वापरणे पसंत करतात, परंतु रोज स्पोर्ट्स ब्रा वापरणे योग्य (Sports Bra- Is it Causing My Back Pain?) आहे की अयोग्य याबद्दल तज्ज्ञ सल्ला देतात. नवी दिल्ली स्थित मदर्स लॅप IVF सेंटरच्या वैद्यकीय संचालक, स्त्रीरोग डॉ. शोभा गुप्ता यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे(Is it normal to wear a sports bra Everyday?).

स्पोर्ट्स ब्रा कोणी वापरावी ? 

फिट राहण्यासाठी आपण बऱ्याचदा जिम आणि योगा क्लासला जातो. यासोबतच मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंगदेखील करतो. या अशा अ‍ॅक्टिव्हिटीज करण्यासाठी आपलं शरीर रिलॅक्स राहणं अत्यंत गरजेच असत. अशावेळी स्पोर्ट्स ब्रा स्तनांना योग्य आधार देऊन अत्यंत रिलॅक्स करण्याचे काम करते. जर आपण अशा तऱ्हेच्या कोणत्याही अ‍ॅक्टिव्हिटीजशी संबंधित असाल किंवा तुम्ही खेळाडू असाल तर तुमच्यासाठी 'स्पोर्ट्स ब्रा' हा चांगला पर्याय आहे.

ब्रा विकत घेताना महिला हमखास करतात ६ चुका, योग्य साईजची ब्रा कशी निवडाल ?

‘बाईपण’ अवघड ? - जया आणि साधनासारखाच संकोच वाटतो ? योग्य मापाची ब्रेसियर कशी निवडायची हेच माहिती नाही ?

दीर्घकाळासाठी स्पोर्ट्स ब्रा वापरल्याने पाठदुखीची समस्या होऊ शकते का ? 

१. होय, दीर्घकाळासाठी स्पोर्ट्स ब्रा वापरल्याने पाठदुखीची समस्या होऊच शकते. तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ ब्रा घालणे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. महिलांनी ८ ते १० तास ब्रा घातल्यानंतर ती काढून टाकावी. दिवसातील काही तास महिलांनी ब्रा न घालता राहणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. 

२. दीर्घकाळासाठी स्पोर्ट्स ब्रा वापरल्याने पाठदुखीची समस्या होऊ शकते, कारण मुळातच स्पोर्ट्स ब्रा दीर्घकाळ परिधान करण्यासाठी डिझाइन केलेले नसते. स्पोर्ट्स ब्रा ही खेळ किंवा व्यायाम करण्याच्या दरम्यान वापरण्यासाठी डिझाइन केले असते. यामुळे व्यायामादरम्यान स्तनांना पूर्ण आधार मिळतो, ज्यामुळे वर्कआऊट करताना येणाऱ्या समस्या कमी होतात. 

३. काही स्त्रिया या स्पोर्ट्स ब्रा ला आपल्या नियमित जीवनशैलीचा भाग बनवून ती रोज वापरतात, तर असे करणे योग्य नाही. 

४. एनसीबीआयच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आपण जास्त वेळ घट्ट ब्रा घालता तेव्हा त्याचा आपल्या त्वचेवर ताण येतो आणि त्यामुळे शरीरही आरामदायी स्थितीत  राहत नाही. चुकीची ब्रा घातल्यानेही शरीराच्या वरच्या भागांवर याचा परिणाम होतो आणि रक्ताभिसरणातही व्यत्यय येतो. जर आपण बराच काळ या अवघडलेल्या वाईट स्थितीत राहिल्यास, आपल्याला पाठ किंवा खांदेदुखीचा त्रास होऊ शकतो. 

५. जर आपण घट्ट ब्रा किंवा स्पोर्ट्स ब्रा घातली असेल तर ती तासाभरात बदलणेच उत्तम राहिल असा सल्ला तज्ज्ञ देतात. मान, कंबर किंवा पाठदुखीसाठी फक्त  'ब्रा' च स्वतः जबाबदार असू शकत नाही तर, घट्ट स्पोर्ट्स ब्रा घातल्यामुळे होणारी अस्वस्थता व अवघडलेपणा आपल्या समस्यांचे खरे कारण बनू शकते. 

योग्य साईज व फिटिंगची 'ब्रेसियर' घालण्याचे फायदे :- 

महिलांनी नेहमी योग्य साईज व फिटिंगची 'ब्रेसियर' घालावी. याचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो. 

१. बॉडी पोश्चर सुधारते :- योग्य फिटिंगची ब्रा घातल्याने बॉडी पोश्चर सुधारते. घट्ट ब्रा घातल्यामुळे खांदे वाकत नाहीत, पाठ सरळ राहते आणि स्तनांनाही पूर्ण आधार मिळतो. त्यामुळे चुकीची ब्रा घातल्याने होणारा त्रासही कमी होतो.  

२. त्वचेवर जळजळ, खाज, रॅशेज होत नाही :- चुकीची ब्रा घातल्यामुळे अनेक वेळा त्वचा सोलवटून निघते. त्याचबरोबर फिटिंग ब्रा घातल्यास त्वचेची जळजळ, छातीत दुखणे आणि रॅशेज, पाठदुखीचा त्रास होत नाही.  

३. स्तनाच्या आकारावर परिणाम :- जेव्हा एखादी महिला चुकीच्या आकाराची किंवा साईजची ब्रा घालते तेव्हा त्याचा स्तनाच्या आकारावरही परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, नेहमी योग्य आकाराची ब्रा घातल्याने स्तनांचा आकार सुधारतो.

४. अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी उपयुक्त :- चुकीच्या फिटिंग ब्रा घातल्यामुळे काही वेळा महिलांना अ‍ॅक्टिव्ह राहणे किंवा दिवसभर वावरणे शक्य होत नाही. जर आपली ब्रा योग्य साईज व आकाराची असेल तर आपल्याला अ‍ॅक्टिव्ह राहण्यात मदत होते.

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्स