Lokmat Sakhi >Fashion > थंडीच्या दिवसांत स्वेटरला हटके पर्याय, शाल कॅरी करण्याची एक खास पद्धत.. दिसा फॅशनेबल 

थंडीच्या दिवसांत स्वेटरला हटके पर्याय, शाल कॅरी करण्याची एक खास पद्धत.. दिसा फॅशनेबल 

Fashion Tips For Winter: हिवाळ्यात नेहमीच जॅकेट, स्वेटशर्ट घालून कंटाळा येतो.. म्हणूनच कधी कधी वेगळा लूक येण्यासाठी अशा स्टायलिश पद्धतीने  शाल कॅरी (How to carry shawl easily?) करून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 03:52 PM2022-11-16T15:52:55+5:302022-11-16T15:53:41+5:30

Fashion Tips For Winter: हिवाळ्यात नेहमीच जॅकेट, स्वेटशर्ट घालून कंटाळा येतो.. म्हणूनच कधी कधी वेगळा लूक येण्यासाठी अशा स्टायलिश पद्धतीने  शाल कॅरी (How to carry shawl easily?) करून बघा..

Stylish method of carrying shawl in winter, How to carry shawl easily? hands free way to carry shawl | थंडीच्या दिवसांत स्वेटरला हटके पर्याय, शाल कॅरी करण्याची एक खास पद्धत.. दिसा फॅशनेबल 

थंडीच्या दिवसांत स्वेटरला हटके पर्याय, शाल कॅरी करण्याची एक खास पद्धत.. दिसा फॅशनेबल 

Highlightsही शाल तुम्हाला वारंवार सांभाळत बसावी लागत नाही. दोन्ही हात अगदी मोकळे राहतात, त्यामुळे ती कॅरी करणं मुळीच अवघड नाही.

थंडीचे दिवस सुरू झाले की बाजारात जॅकेट, स्वेटशर्ट, शाल यांचे अनेक वेगवेगळे प्रकार दिसून येतात. स्वेटर, जॅकेट, स्वेटशर्ट आपण नेहमीच वापरतो. पण कधी कधी बदल म्हणून किंवा मग कधी तरी काही तरी वेगळं म्हणून एखादी सुंदर शालही कॅरी (Stylish method of carrying shawl in winter) करावी वाटते. पण शाल घ्यायची म्हणजे एक तर ती अंगावर लपेटून घ्यावी लागते. शिवाय ती सारखी सारखी सावरत बसावी लागते. एक हात तर तिच्यातच अडकून पडतो. त्यामुळे मग अनेक जणी आवडत असूनही हिवाळ्यात शाल घेणं टाळतात.

 

तुम्हालाही शाल घेणं आवडत असेल, पण फक्त ती कॅरी करणं अवघड वाटतं म्हणून तुम्ही टाळत असाल तर हा एक छान व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या.

विविध आजारांवर गुणकारी ठरतो फळांचा रस! कोणत्या आजारासाठी कशाचा रस प्यावा? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

आकर्षक, स्टायलिश पद्धतीने शाल कशी घ्यायची याची एक साेपी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. कुर्ता, जीन्स- टीशर्ट असा कोणताही पेहराव असला तरी तुम्ही त्यावर अशा पद्धतीने शाल घेऊ शकता. शिवाय आणखी एक मोठा फायदा म्हणजे ही शाल तुम्हाला वारंवार सांभाळत बसावी लागत नाही. दोन्ही हात अगदी मोकळे राहतात, त्यामुळे ती कॅरी करणं मुळीच अवघड नाही. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या tanisthabasu या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

थंडीमध्ये शाल कॅरी करण्याची स्टायलिश पद्धत
१. शाल तुमच्या कंबरेभाेवती लपेटून घ्या. दोन्ही बाजूने शाल सारखीच आहे, याचा अंदाज घेऊन त्याची कंबरेवर समोरच्या बाजूने गाठ मारा.

ऑफिसमध्ये बसल्या- बसल्याच करता येतील असे ५ मिनिटांचे ५ व्यायाम, ताण होईल कमी- व्हाल रिलॅक्स

२. आता शालीची जी टोके आहेत, त्यांचीही गाठ मारून घ्या.

३. आता तुमच्या कंबरेच्या जवळ शालीला मारलेली गाठ आणि शालीच्या टोकांना असलेली दुसरी गाठ यांच्या मधला जो गॅप आहे, तो वर उचलून डोक्यावरून मागे टाकून द्या आणि शाल थोडीशी सेट करा. झाला तुमचा फॅशनेबल लूक तयार. 

 

Web Title: Stylish method of carrying shawl in winter, How to carry shawl easily? hands free way to carry shawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.