Join us  

बॅग आहे की पेटारा! जबरदस्त ट्रोल होतेय सब्यासाची कलेक्शनची नवी हॅण्डबॅग, ती पाहूनच नेटिझन्स म्हणाले... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 4:34 PM

Sabyasachi's THE INDIA TOTE collection: तुम्ही पाहिली का ही सध्या खूपच ट्रोल होत असलेली सब्यासाची कलेक्शनची हॅण्डबॅग?

ठळक मुद्देबॅगचा आकार पाहून अनेक जणांनी खूपच गमतीशीर कमेंट केल्या आहेत. कुणी म्हणत आहे की बाळांना त्यांच्या सामानासकट या बॅगमध्ये ठेवता येऊ शकते.

फॅशन जगतामध्ये सब्यासाची कलेक्शनचं (Sabyasachi) नाव अतिशय मोठं आहे. कपड्यांपासून ते ज्वेलरी आणि इतर ॲक्सेसरीज डिझाईन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पण असं असलं तरी नामवंत डिझायनर्सलाही कधी कधी ट्रोलिंगचा सामना करावा लागतोच. कारण त्यांनी डिझाईन केलेली प्रत्येक गोष्ट लोकांच्या पचनी पडेलच असे नाही. सध्या अशीच काहीशी परिस्थिती सब्यासाची कलेक्शनची झाली असून त्यांनी नुकतीच लॉन्च केलेली एक हॅण्डबॅग ('THE INDIA TOTE'- New handbag collection from Sabyasachi) सध्या सोशल मिडियावर चांगलीच ट्रोल होते आहे. 

THE INDIA TOTE असं नाव त्यांनी या बॅगला दिलं असून त्याविषयीची माहिती नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

ख्रिसमस पार्टीसाठी सॅलेड डोकोरेशन करण्याच्या एक से एक आयडिया, पाहूनच सगळे होतील खुश..

भारताच्या परंपरांचा वारसा, हस्तकला आणि कापडाच्या अविश्वसनीय वारसाला आदरांजली म्हणून 'इंडिया टोटे' या नव्या कलेक्शनची निर्मिती केली असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या आकाराने मोठ्या असणाऱ्या हॅण्डबॅगची क्रेझ आहेच. पण या हॅण्डबॅग जरा जास्तच मोठ्या असल्याने त्या ट्रोलर्सच्या रडारवर आल्या आहेत. बॅगचा कपडा अतिशय देखणा- आकर्षक आहे. पण त्यांचा अतिमोठा आकार मात्र अनेकांना आवडलेला नाही.

 

बॅगचा आकार पाहून अनेक जणांनी खूपच गमतीशीर कमेंट केल्या आहेत. कुणी म्हणत आहे की ही हॅण्डबॅग बाजारातून भरपूर भाज्या आणायच्या असल्यास आणि खासकरून शेवग्याच्या शेंगा आणायच्या असल्यास अतिशय उपुयक्त ठरणारी आहे.

ऑफिसला जाण्यासाठी झटपट हेअरस्टाईल करायची? पोनीटेल घालण्याच्या २ खास पद्धती, दिसाल स्टायलिश

कुणी म्हणत आहे की बाळांना त्यांच्या सामानासकट या बॅगमध्ये ठेवता येऊ शकते. तर कुणी असंही म्हणत आहे की बायको माहेराहून आल्यावर तिच्याकडची बॅग जेवढी मोठी असते, तशीच काहीशी ही बॅग आहे. एका जणाने तर या बॅगमध्ये  मी स्वत:ही जाऊन बसू शकतो, अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्याने ही बॅग ब्लँकेट ठेवायला चांगली उपयोगी पडू शकते, असं सुचवलं आहे. 

 

टॅग्स :फॅशनसब्यसाची