Lokmat Sakhi >Fashion > भारत-न्यूझीलंड मॅच पाहायला आलेल्या अनुष्का शर्माने घातलेला फुलाफुलांचा शर्ट पाहिला? त्या शर्टची किंमत होती.....

भारत-न्यूझीलंड मॅच पाहायला आलेल्या अनुष्का शर्माने घातलेला फुलाफुलांचा शर्ट पाहिला? त्या शर्टची किंमत होती.....

Anushka Sharma's Oversized Flower Print Shirt: भारत- न्यूझीलंड (Cricket world cup) मॅचदरम्यान अनुष्का शर्माने घातलेल्या ओव्हरसाईज शर्टची आणि त्या शर्टच्या किमतीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होत आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 04:20 PM2023-11-16T16:20:05+5:302023-11-16T16:21:31+5:30

Anushka Sharma's Oversized Flower Print Shirt: भारत- न्यूझीलंड (Cricket world cup) मॅचदरम्यान अनुष्का शर्माने घातलेल्या ओव्हरसाईज शर्टची आणि त्या शर्टच्या किमतीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होत आहे. 

The oversized flower print shirt Anushka Sharma wore during India vs New Zealand World Cup match costs Rs... | भारत-न्यूझीलंड मॅच पाहायला आलेल्या अनुष्का शर्माने घातलेला फुलाफुलांचा शर्ट पाहिला? त्या शर्टची किंमत होती.....

भारत-न्यूझीलंड मॅच पाहायला आलेल्या अनुष्का शर्माने घातलेला फुलाफुलांचा शर्ट पाहिला? त्या शर्टची किंमत होती.....

Highlightsअनुष्का शर्माने घातलेल्या ओव्हरसाईज शर्टची आणि त्या शर्टच्या किमतीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होत आहे. 

क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान बुधवारी भारत- न्यूझीलंड सामना मुंबई येथे पार पडला... यावेळी क्रिकेटर विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही देखील उपस्थित होती. सामन्यादरम्यान तिचे विराट कोहलीला आणि भारतीय क्रिकेट टीमला चिअरअप करणे सगळ्यांनीच पाहिले. त्यानंतर विराट कोहलीने जेव्हा शतक केले आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला तेव्हा तर अनुष्काचा आनंदाने फुलून आलेला चेहरा पाहण्यासारखाच होता. तिच्या त्या आनंदाची, उत्साहाची जशी  चर्चा होत आहे, तशीच चर्चा सामन्यादरम्यान तिने घातलेल्या हिरव्या- पोपटी फुलाफुलांच्या ड्रेसची (oversized flower print shirt) आणि त्याच्या किमतीचीही होत आहे (Anushka Sharma's Oversized Flower Print Shirt worth Rs....).

 

अनुष्काने सामन्यादरम्यान ओव्हरसाईज शर्ट आणि त्याखाली तशाच प्रिंटची को- ऑर्ड प्रकारातली शॉर्ट घातली होती.

ओठांचा काळपटपणा जाईल आणि ओठ होतील गुलाबी, करा १ सोपा उपाय- विकतचे लिपबाम विसराल

तिचा तो लूक अतिशय स्टायलिश- फॅशनेबल वाटत होता. तसेच तो खूप कम्फर्टेबलही दिसत होता. हा ड्रेस फॅशन डिझायनर ध्रुव कपूर यांच्या कलेक्शनमधला असून त्या शर्टची किंमत १९, ५०० रुपये एवढी आहे. शर्टसोबतच जर त्याची को- ऑर्ड शॉर्ट घेतली तर शर्ट आणि शॉर्ट असा हा संपूर्ण को- ऑर्ड सेट २७ हजार रुपये किमतीचा आहे. 

 

आपल्याला माहितीच आहे की सध्या अनुष्का शर्माच्या सेकंड प्रेग्नन्सीची चर्चा सुरू आहे. ती दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची दाट शक्यता तिच्या आणि विराटच्या चाहत्यांना येतेय. पण त्यांना त्याबाबतची पक्की माहिती अजूनही मिळालेली नाही.

मिस इंडिया’ झाल्यावरही प्रियांका स्वत:ला सुंदर समजत नव्हती! प्रियांका चोप्राची आई सांगते कारण..

अनुष्काच्या या ओव्हरसाईज ड्रेसने पुन्हा एकदा त्या चर्चांना उधाण आणलंय. बेबी बंप दिसू नयेत, म्हणून अनुष्काने मुद्दामच असा ओव्हरसाईज ड्रेस घातला असावा, अशी दाट शक्यता तिच्या चाहत्यांना वाटते आहे. 
 

Web Title: The oversized flower print shirt Anushka Sharma wore during India vs New Zealand World Cup match costs Rs...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.