'ब्रेसियर' ही महिलांच्या रोजच्या वापरण्यातील एक महत्वाची गोष्ट आहे. 'ब्रेसियर' हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच आहे, असे म्हणावे लागेल. आजकाल 'ब्रेसियरचे' अनेक प्रकार बाजारांत सहज उपलब्ध होतात. काहीजणी तर प्रत्येक आऊटफिटवर सूट होणारी एका वेगळ्या पॅटर्नची 'ब्रेसियरची' घालणे पसंत करतात. पुशअप - ब्रा, पॅडेड ब्रा, टी - शर्ट ब्रा, फुल कव्हरेज ब्रा, स्पोर्ट्स ब्रा अशा अनेक प्रकारच्या 'ब्रेसियर' आजकाल बाजारांत सहज विकत मिळतात(What to look for when buying a sports bra).
आजकालच्या बदलत्या जीवनशैली आणि स्टाईलमुळे नेहमीच्या वापरातील साध्या ब्रा सोबतच स्पोर्ट्स ब्रा ( Things You Must Know Before Buying a Sports Bra) ची खरेदी करणंही महत्त्वाचं मानलं जात. व्यायाम, योगा किंवा विविध मैदानी खेळ खेळण्यासाठी मुलींना स्पोर्ट्स ब्रा (Here's How to Choose the Perfect Sports Bra) वापरावी लागते. कारण एकाच प्रकारची ब्रा अॅक्टिव्हिटीज किंवा वर्कआउट करताना वापरणं कठिण होत. जर व्यायाम करताना चुकीच्या साईजची स्पोर्ट्स ब्रा वापरली तर त्याचा आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. चुकीच्या साईजची स्पोर्ट्स ब्रा (Things To Know Before Buying A Sports Bra) घातल्यानंतर आपल्याला काहीवेळा अस्वस्थ तर वाटतंच शिवाय आपण वर्कआउटवर देखील लक्ष केंद्रित करु शकत नाही. यासाठीच चांगली आणि योग्य ब्रा ची खरेदी करणं आवश्यक आहे. यासाठीच जर आपण स्पोर्ट्स ब्रा विकत घेत असाल तर त्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे असते(5 things you must keep in mind while choosing a sports bra for yourself).
स्पोर्ट्स ब्रा नेमकी कशासाठी वापरतात ?
फिट राहण्यासाठी आपण बऱ्याचदा जिम आणि योगा क्लासला जातो यासोबतच मॉर्निंग वॉक वा जॉगिंगदेखील करतो. या अशा अॅक्टिव्हिटीज करण्यासाठी आपलं शरीर रिलॅक्स राहणं अत्यंत गरजेचं असत. अशावेळी आपल्याला स्पोर्ट्स ब्रा (Sport Bra) अत्यंत रिलॅक्स करण्यास मदत करते. अशातऱ्हेच्या कोणत्याही अॅक्टिव्हिटज जर आपण करत असाल किंवा आपण खेळाडू असल्यास, आपल्यासाठी स्पोर्ट्स ब्रा वापरणे हा चांगला पर्याय आहे.
पोटाची ढेरी वाढल्याने नेहमीच्या जीन्सचे बटण लागत नाही ? घ्या १ सोपा उपाय, जीन्स बसेल अगदी परफेक्ट...
दीर्घकाळ स्पोर्ट्स ब्रा वापरल्याने पाठदुखीची समस्या होऊ शकते का ? एक्स्पर्ट सांगतात खरे कारण...
स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी...
१. परफेक्ट फिटिंग :- स्पोर्ट्स ब्रा ही नेहमीच परफेक्ट फिटिंग असणारी पाहिजे. ती खरेदी करताना आपण आपले अंडरआर्म्स, शोल्डर स्ट्रॅपची त्वचा ही आवळली जाणार नाही याची काळजी घ्यावी. आपली स्पोर्ट्स ब्रा घातल्यानंतर ती ब्रेस्टला सपोर्ट करतेय की नाही हे सुद्धा पाहणे तितकेच महत्वाचे ठरते.
२. बॉडी पोश्चर :- स्पोर्टस ब्रा घातल्यानंतर आपले बॉडी पोश्चर योग्य स्थितीत आहे की नाही हे एकदा तपासून पहावे. स्पोर्ट्स ब्रा घातल्यानंतर बॉडी पोश्चर योग्य नसेल तर काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच वर्कआउट पूर्वी योग्य साईजची स्पोर्ट्स ब्रा घालणे गरजेचे असते. नाहीतर हेवी वर्कआउटच्या कारणांमुळे आपल्या ब्रेस्टची साईज बिघडू शकते. ब्रेस्टला योग्य सपोर्ट मिळाल्यास पाठीचा कणासुद्धा ताठ राहण्यास मदत होते.
साडी नेसल्यावर खूप जाड दिसता ? ५ टिप्स, साडी नेसल्यावर दिसाल स्लिम - सुंदर - आकर्षक...
हेव्ही ब्रेस्ट - जाड दंड - ब्लाऊजचे फिटिंग कायम चुकते ? ४ सोप्या टिप्स, शिवा परफेक्ट ब्लाऊज...
३. स्पोर्ट्स पॅडेड ब्रा :- आजकाल मार्केटमध्ये विविध प्रकारच्या ब्रा अगदी सहज उपलब्ध होतात. त्यामुळे कळत नाही नक्की कोणती खरेदी करावी. जर आपण हाय इंटेंसिटी वर्कआउट करत असाल तर अशी स्पोर्ट्स ब्रा खरेदी करा जी पॅडेड असेल. यामुळे ब्रेस्टला एक्स्ट्रा सपोर्ट मिळतो.
४. योग्य साइज निवडा :- जर आपण योग्य साइजची स्पोर्ट्स ब्रा खरेदी केली तर वर्कआउट करतांना याचा अधिक फायदा होईल. स्पोर्ट्स ब्रा खरेदी करण्यासाठी आपण आपल्या छातीच्या खालील भागाची साइज मोजा. त्यानुसार आपला बँन्ड साइज असला पाहिजे. त्यानंतर आपली ब्रेस्ट साइज किती आहे ते मोजा. रिबकेज साइज आणि बस्ट साइज मधील अंतर आपल्याला कप साइज ए, बी, सी ला डिफाइन करेल.
५. आपल्या वर्कआउट नुसार खरेदी करा :- स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताना आपण कोणत्या पद्धतीचा वर्कआउट करणार आहात हे आधी ठरवा. जसे की, योगा, कार्डिओ. त्यानुसारच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करावी. ही ब्रा खरेदी करताना त्यावर कोणत्या वर्कआउटसाठी ती आहे हे सुद्धा काहीवेळेस लिहिलेले असते, ते एकदा तपासून घ्यावे.