Lokmat Sakhi >Fashion > महागडे-फॅशनेबल ब्लाऊज काखेत फाटतात-घामाचे डागही पडतात? २ सोप्या ट्रिक्स- ब्लाऊज टिकतील अनेक वर्ष...

महागडे-फॅशनेबल ब्लाऊज काखेत फाटतात-घामाचे डागही पडतात? २ सोप्या ट्रिक्स- ब्लाऊज टिकतील अनेक वर्ष...

Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse : Tips On How To Stop Sweat Patches On Your Blouse : 2 Simple Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse : ब्लाऊज वापरुन फक्त काखेतून फाटतात आणि धुतल्यावरही घामाची दुर्गंधी जात नाही यासाठी खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2025 08:18 IST2025-02-12T08:02:21+5:302025-02-12T08:18:02+5:30

Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse : Tips On How To Stop Sweat Patches On Your Blouse : 2 Simple Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse : ब्लाऊज वापरुन फक्त काखेतून फाटतात आणि धुतल्यावरही घामाची दुर्गंधी जात नाही यासाठी खास टिप्स...

Tips To Avoid Sweat Patches On Your Blous Tips On How To Stop Sweat Patches On Your Blous 2 Simple Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse | महागडे-फॅशनेबल ब्लाऊज काखेत फाटतात-घामाचे डागही पडतात? २ सोप्या ट्रिक्स- ब्लाऊज टिकतील अनेक वर्ष...

महागडे-फॅशनेबल ब्लाऊज काखेत फाटतात-घामाचे डागही पडतात? २ सोप्या ट्रिक्स- ब्लाऊज टिकतील अनेक वर्ष...

प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज आपण शिवतोच. इतकेच नव्हे तर हे ब्लाऊज आपण वेगवेगळ्या ट्रेंडी पॅटर्नमध्ये शिवण्यासाठी भरपूर पैसे खर्च करतो. महागामोलाच्या साडीवर तितकेच महागडे ब्लाऊज (Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse) आपण मोठ्या हौसेने शिवतो. या ब्लाऊजच्या स्वच्छतेची देखील आपल्याला विशेष काळजी (Tips On How To Stop Sweat Patches On Your Blouse) घ्यावी लागते. असे महागडे ब्लाऊज वर्षानुवर्षे वापरल्यानंतर फक्त काखेतूनच फाटतात. बरेचदा आपण पाहिले असेल की आपले ब्लाऊज हे सतत वापरुन काखेत बाह्यांच्या  ठिकाणचे कापड अगदी जीर्ण होऊन झिरते(2 Simple Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse).

एवढंच नाही तर काहीवेळा आपल्या अंगाला येणाऱ्या घामाची दुर्गंधी या संपूर्ण ब्लाऊजला देखील येते. अशावेळी आपण हे महागडे ब्लाऊज एकतर ड्रायक्लिनिंग करतो किंवा व्यवस्थित कडक ऊन्हांत वाळवतो. परंतु या महागड्या ब्लाऊजची विशेष काळजी घेण्यासाठी आपण काही टिप्स पाहूयात. या साध्यासोप्या फक्त २ टिप्स वापरुन आपण ब्लाऊजला येणारी घामाची दुर्गंधी तसेच काखेत झिरणारे कापड या दोन्ही समस्या दूर करुन ब्लाऊज वर्षानुवर्षे आहे तसाच नव्यासारखा ठेवू शकतो. 

ब्लाऊजला येणारी घामाची दुर्गंधी कमी करुन ब्लाऊज वर्षानुवर्षे चांगला टिकण्यासाठी... 

१. आपल्या अंगाला घाम येऊ नये तसेच आलाच तर घामाची दुर्गंधी कपड्यांना लागून कपडे खराब होऊ नयेत यासाठी आपण डिओड्रंट, सेंट किंवा परफ्युमचा वापर करतो. परंतु शक्यतो आपण कोणत्याही प्रकारचे कपडे घातल्यावर या कपड्यांच्या बाहेरच्या बाजूने स्प्रे करतो. असे न करता कपडे घालण्याआधी ते उलटे करुन घ्यावेत, म्हणजेच आतील बाजू बाहेर काढून मग त्यावर स्प्रे करावा. जेणेकरुन कपड्यांच्या बाहेरील भागावरील धागे लवकर खराब होऊन ब्लाऊज लगेच फाटत नाही. डिओड्रंट, सेंट किंवा परफ्युममधील केमिकल्सयुक्त घटक या कपड्यांचे धागे कमकुवत करतात परिणामी लवकर ब्लाऊज फाटतात. 

'अंगरखा' ब्लाऊजचा स्टायलिश ट्रेंड! बघा अंगरखा ब्लाऊजचे ९ सुंदर पॅटर्न्स - साडीवर दिसेल शोभून...

२. एका मोठ्या बाऊलमध्ये दिड कप पाणी घेऊन त्यात १ टेबलस्पून खायचा सोडा घाला त्याचबरोबर कोणत्याही शाम्पूचे एक छोटे पाकीट फोडून यात घाला. त्यानंतर, हे सगळे जिन्नस चमच्याने हलवून एकजीव करुन घ्यावेत. मग एक थोडे खरखरीत किंवा जाड कापडाचे छोटेसे टॉवेल किंवा रुमाल घेऊन या तयार द्रावणात बुडवून घ्यावा. या ओल्या कापडाने ब्लाऊजवरील काखेतील घामाचे डाग हलकेच घासून पुसून काढावेत. ब्लाऊज आतून बाहेरुन अशा दोन्ही बाजुंनी स्वच्छ पुसून घ्यावा. त्यानंतर ब्लाऊज मोकळ्या हवेत किंवा ऊन्हांत वाळवून घ्यावा. मग या ब्लाऊजला इस्त्री करून व्यवस्थित कपाटात स्टोअर करुन ठेवू शकता. या साध्या - सोप्या टिप्स फॉलो केल्याने आपले ब्लाऊज काखेत न फाटता तसेच घामाची दुर्गंधी न येता वर्षानुवर्षे नव्यासारखा चांगला टिकून राहील.   

ये लाल इश्क! 'व्हॅलेंटाईन्स डे' साठी ड्रेसचे अनोखे ९ पॅटर्न, प्रेमाचा दिवस होईल खास...


Web Title: Tips To Avoid Sweat Patches On Your Blous Tips On How To Stop Sweat Patches On Your Blous 2 Simple Tips To Avoid Sweat Patches On Your Blouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.