Join us

स्टोन - धागा वर्क असणारे महागडे ब्लाऊज घरीच धुण्याची नवी ट्रिक - ड्रायक्लिनिंगची गरज नाही, पैशांची बचत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2025 19:33 IST

Tips & Tricks To Wash Stone Work & Thread Work Blouse At Home : How To Wash Fancy Blouse At Home : Blouse Cleaning Process : महागडे ब्लाऊज धुण्यासाठी प्रत्येकवेळी ड्रायक्लिनिंगची गरज नाही, वापरा ही ब्लाऊज धुण्याची व्हायरल पद्धत...

प्रत्येक साडीवर आपण ट्रेंडी आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज मोठ्या हौसेने शिवतो. साडीला मॅचिंग आणि शोभून दिसेल असे सुंदर ब्लाऊज ही प्रत्येक महिलेची पहिली पसंती असते. स्टोन वर्क, हेव्ही धागा वर्क, मोती किंवा टिकल्यांचे नाजूक नक्षीकाम किंवा हॅण्डमेड (Blouse Cleaning Process) जरी वर्क अशा वेगवेगळ्या प्रकारांतील सुंदर - आकर्षक (How To Wash Fancy Blouse At Home) ब्लाऊज प्रत्येकीच्या कपाटात असतातच. हे महागडे ब्लाऊज शिवण्यासाठी आपण तितकेच पैसे देखील मोजतो. अशा हेव्ही आणि नाजूक वर्क असणाऱ्या महागड्या ब्लाऊजची तितकीच काळजी देखील घेतली पाहिजे(Tips & Tricks To Wash Stone Work & Thread Work Blouse At Home).

अशा महागड्या ब्लाऊजची वेळोवेळी स्वच्छता देखील करणे गरजेचे असते, इतकेच नव्हे तर ते कपाटांत व्यवस्थित स्टोअर देखील केले पाहिजेत. अशा महागड्या आणि नाजूक वर्क असणाऱ्या ब्लाऊजच्या स्वच्छतेचा विषय जेव्हा येतो तेव्हा आपण सरळ ते बाहेर ड्रायक्लिनिंगला देतो. परंतु वारंवार असे महागडे ब्लाऊज ड्रायक्लिनिंग केल्याने खराब होण्याची शक्यता असते. याचबरोबर, प्रत्येकवेळी असे महागडे ड्रायक्लिनिंग खिशाला देखील परवडणारे नसते. अशावेळी घरच्याघरीच हे ब्लाऊज कसे धुवावेत याबद्दल काही टिप्स पाहूयात. 

महागडे ब्लाऊज ड्रायक्लिनिंग न करता कसे स्वच्छ करावेत? 

महागडे ब्लाऊज ड्रायक्लिनिंग न करता घरच्या घरीच धुण्याची एक सोपी ट्रिक पाहूयात. इंस्टाग्राम वरील mamtaworldin's  या अकाऊंटवरुन घरच्याघरीच महागडे हेव्ही वर्क असणारे ब्लाऊज वॉशिंग मशीनमध्ये कसे धुवायचे याची सोपी ट्रिक सांगितली आहे.

Women's Day 2025 : महिला दिनाच्या पार्टीसाठी ऑफिसमध्ये साडी नेसून जायचंय? पाहा ८ पर्याय, दिसा स्टायलिश...

शक्यतो आपण स्टोन वर्क, नाजूक धागा वर्क किंवा टिकल्यांचे वर्क असणारे ब्लाऊज त्यावरील नक्षीकाम खराब होईल म्हणून वॉशिंग मशीनमध्ये धुणे टाळतो. परंतु आता आपण ही एक सोपी ट्रिक वापरून अगदी सहजपणे वॉशिंग मशीनमध्ये हे हेव्ही वर्क असणारे ब्लाऊज सहज धुवू शकतो. 

बॉडी शेपनुसार करा कुर्त्यांची निवड! दिसाल सुंदर, स्मार्ट आणि आकर्षक-पाहा तुम्हाला कोणता कुर्ता छान दिसेल...

यासाठी आपल्याला एक उशी कव्हर, फॅब्रिक सॉफ्टनर आणि सौम्य डिटर्जंटची गरज लागणार आहे. एका उशी कव्हरमध्ये आपल्याला जे ब्लाऊज धुवायचे आहे ते टाका. त्यानंतर धाग्याने या उशी कव्हरचे तोंड बांधून घ्या. त्यानंतर मशीनमध्ये फॅब्रिक सॉफ्टनर आणि सौम्य डिटर्जंट घाला. मग हे उशी कव्हर मशीनमध्ये टाका आणि जेंटल वॉश म्हणून नाजूक वर्क असणारे कपडे धुण्यासाठी मशीनमध्ये एक मोड असतो . तो सिलेक्ट करा आणि तुमचे हेव्ही - नाजूक वर्क असणारे महागडे ब्लाऊज धुवून घ्या. हे ब्लाऊज धुवून झाल्यानंतर सावलीत वाळत घालायला ठेवा आणि संपूर्णपणे वाळवून घ्या. अशाप्रकारे आपले हेव्ही - नाजूक वर्क असणारे महागडे ब्लाऊज धुवून स्वच्छ होईल. यासाठी आपल्याला ड्रायक्लिनिंग करण्याची गरज भासणार नाही.    

लक्षात ठेवा... 

१. प्रत्येक वेगळ्या ब्लाऊजसाठी वेगळे उशी कव्हर वापरा. 

२. गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करू नका. 

३. ब्लाऊज धुतल्यावर पिळू नका किंवा ड्रायरमध्ये वाळवू नका. 

४. थेट सूर्यप्रकाशात वाळवू नका. सावलीत वाळवून संपूर्णपणे सुकू द्यावे. 

५. ब्लाऊज धुताना ते उलटे करून धुवावे म्हणजे आतील बाजू बाहेर करा.  

६. जास्तीचे पाणी शोषून घेण्यासाठी टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा.

 

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्सस्वच्छता टिप्स