Join us  

प्रियांका चोप्रापासून अनन्या पांडेपर्यंत बॉलिवूड अभिनेत्रींना केशरी पँटची भुरळ; पाहा काय आहे हा नवा ट्रेंड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2023 5:01 PM

Trend Of Orange color Pant in Bollywood Actress : गर्दीत वेगळे तितकेच डिसेंट दिसण्यासाठी हा रंग सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कायमच काही ना काही हटके फॅशन घेऊन येत असतात. एरवी आपण जे कपडे वापरण्याचा विचारही करणार नाही अशा फॅशनचे आणि रंगांचे कपडे या अभिनेत्री अतिशय मस्त कॅरी करतात. त्यांच्यावर हे कपडे खुलूनही दिसतात. नुकतीच अशाच एक केशरी रंगाच्या पँटची फॅशन बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आली असून बऱ्याच अभिनेत्री अशाप्रकारची पँट ट्राय करताना दिसत आहेत. एरवी फार भडक वाटणारा केशरी रंग आपण पँटमध्ये घेण्याचा कदाचित विचारही करणार नाही. पण या रंगातील मोठ्या बॉटमच्या पँट अभिनेत्रींना मात्र आकर्षित करत आहेत. केशरी रंग हा फॅशनच्या  जगतात आगळ्या वेगळ्या शैलीत दिसतो. एक अविस्मरणीय लूक आणि स्टाईल स्टेटमेंटसाठी गडद केशरी रंगाच्या कपड्यांची निवड सेलिब्रिटींकडून केली जाते आहे. हा रंग उत्साह, उत्कटता आणि सर्जनशीलता दर्शवतो. गर्दीत वेगळे तितकेच डिसेंट दिसण्यासाठी हा रंग सध्या चर्चेत आहे. कियारा अडवाणीपासून ते अनन्या पांडेपर्यंत- सेलिब्रिटींनी पॉप ऑफ कलरसाठी वारंवार हा केशरी टोनचा पर्याय निवडलेला दिसून येतो (Trend Of Orange color Pant in Bollywood Actress).  

- कियारा अडवाणीने चमकदार केशरी पँटसूट घालणे निवडले. जे फॉर्मल आणि तितकेच कॅज्युअल वाटते. तिने तिच्या पोशाखात साध्या आणि नाजूक दागिन्यांचा समावेश केला आणि मेकअप टोन साधा ठेवला होता. तिच्यावर हा केशरी रंग अतिशय खुलून दिसत होता.  

-  अनन्या पांडेनेही केशरी लाईन्स असलेल्या पांढऱ्या टॉपवर केशरी पँटची निवड केली. ही केशरी पँट हायवेस्ट ट्राऊजर पॅटर्नची होती आणि त्याचा बॉटमही खूप मोठा होता. रेड पर्स आणि हाय हिल्समध्ये अन्यथा उठून दिसत होती. 

- दीपिका पदुकोण तिच्या कॅज्युअल फॉर्मल पोशाखांमुळे कायम चर्चेत असते.  तिने लूज केशरी शर्ट आणि त्याच रंगाची पँट निवडली होती. त्यावर मोठे सनग्लासेस घातल्याने हा लूक बोल्ड झाला होता. कमीत कमी अक्सेसरीजमध्ये तिने हा सिंपल लूक कॅरी केला होता. पांढरे शूज, ब्लॅक सनग्लासेस आणि केशरी ड्रेसचे कॉम्बिनेशन छान जुळून आले होते.

- मॅनहॅटनच्या रस्त्यावर, प्रियांका चोप्रा साध्या काळ्या टॉपसह केशरी पँटमध्ये स्टाईल केलेली दिसून आली होती. अतिशय कम्फर्टेबल अशा केशरी रंगाची कॉटन पँट आणि त्यावर काळे लेदरचे जॅकेट, गॉगल यामध्ये प्रियांका अतिशय आकर्षक दिसत होती. 

याशिवाय इतरही अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्समध्ये सध्या या केशरी रंगाच्या पँटचा ट्रेंड असल्याचे पाहायला मिळते. 

टॅग्स :फॅशनबॉलिवूडअनन्या पांडेकियारा अडवाणीप्रियंका चोप्रादीपिका पादुकोण