Join us  

दांडिया- गरबा खेळण्यासाठी ओढणी पिनअप करण्याच्या ३ सुंदर स्टाईल, दिसाल मस्त- खेळा बिंधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 12:27 PM

Dupatta Styling Tips For Garba- Dandiya: दांडिया- गरबा खेळताना ओढणी सारखी मधे येऊन पायात अडकू नये, खेळण्यात अडथळा येऊ नये म्हणून या खास स्टाईलने ओढणी पिनअप करा...(trending dupatta draping styles for navratri 2024)

ठळक मुद्दे या स्टाईलने ओढणी पिनअप केल्यास तुम्ही नक्कीच आणखी आकर्षक दिसाल शिवाय ओढणी सारखी पायात, हातात अडकून तुम्हाला खेळण्यास अडथळाही नाही येणार...

दांडिया- गरबा खेळायला जाण्याची तयारी आता घरोघरी सुरू झालेली आहे. मित्रमैत्रिणींसमवेत बिंधास्त नृत्य करण्याची संधी यानिमित्ताने मिळते. त्यामुळे नवरात्रीसाठी तरुणाई अतिशय उत्सूक असते. दांडिया किंवा गरबा खेळताना खास पारंपरिक वेशभुषा करायची असेल तर अशावेळी ओढणी कशी पिनअप करावी, असा प्रश्न अनेक तरुणींना पडतो. ओढणी अशा पद्धतीने पिनअप करायची असते की ती दिसायला स्टायलिशही असली पाहिजे आणि खेळताना आपल्याला तिची अडचणही नाही झाली पाहिजे ( how to drape dupatta for dandiya and garba?). म्हणूनच या काही खास टिप्स पाहा. या स्टाईलने ओढणी पिनअप केल्यास तुम्ही नक्कीच आणखी आकर्षक दिसाल (trending dupatta draping styles for navratri 2024). शिवाय ओढणी सारखी पायात, हातात अडकून तुम्हाला खेळण्यास अडथळाही नाही येणार...(Dupatta Styling Tips For Garba- Dandiya)

दांडिया- गरबा खेळण्यासाठी ओढणी ड्रेपिंगच्या ३ खास टिप्स

 

१. पहिली पद्धत

यासाठी ओढणीचे एका बाजुचे टोक एका हातात घ्या. त्यानंतर त्या टोकाच्या डायगोनल जे दुसरे टोक आहे ते एका हातात घ्या. हे दोन्ही टोक जोडून पिनअप करून टाका आणि ते डाव्या खांद्यावर घेऊन तिथे ब्लाऊजला पिनअप

सलवार- कुर्ता घातल्यावर उंची आणखीनच कमी दिसते? लक्षात ठेवा ५ टिप्स- दिसाल उंच- स्मार्ट 

करून टाका. बाकी ओढणी तुमच्या उजव्या बाजुला कंबरेच्या खाली येईल, अशा पद्धतीने घ्या.. आता एक छानसा कंबरपट्टा लावून टाका. ओढणी अजिबात मध्येमध्ये येणार नाही. 

 

२. दुसरी पद्धत 

या पद्धतीनुसार ओढणीच्या बारीक निऱ्या घालून ती तुमच्या उजव्या खांद्यावर घ्या आणि डाव्या बाजुने कंबरेच्याजवळ खोचा. त्यानंतर आता मागच्या बाजुला जी ओढणी आहे,

कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने खरंच पोटावरची चरबी कमी होते? तज्ज्ञ सांगतात वजन घटविण्यासाठी....

तिचे वरचे टोक उचला आणि डाव्या बाजुला कंबरेजवळ जिथे ओढणी खोचली आहे, तिथे खोचून टाका. खांद्यावर आणि कंबरेजवळ ओढणी पिनअप करून टाका आणि एखादा छानसा बेल्ट लावा. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/817243313817363/}}}}

 

३. तिसरी पद्धत

ओढणीचे एका बाजुचे टोक कंबरेच्या डाव्या बाजुला तुमच्या घागऱ्यामध्ये खोचा. त्यानंतर बाकीची ओढणी मागच्या बाजुने ओढून उजव्या खांद्यावरून पुढे घ्या.

दारासमोर रोज कशी रांगोळी काढावी सुचतच नाही? ७ सोप्या डिझाईन्स, २ मिनिटांत काढा सुंदर रांगोळी

तिथे तुम्ही ओढणी प्लेट्स घालून मोकळीही सोडू शकता किंवा मग डाव्या बाजुला कंबरेजवळ खोचूही शकता. यावरही छानसा कंबरपट्टा लावा. ओढणी एकदम पॅक होऊन जाईल.  

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४फॅशननवरात्री गरबा २०२४दांडियास्टायलिंग टिप्स