सारा अली खान आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor and Sara Ali Khan) या दोघी स्टार किड्स एकमेकींच्या अगदी घट्ट मैत्रिणी आहेत. कधी दोघी सोबत एखाद्या सहलीला जातात तर कधी दोघी सोबतच जीममध्ये वर्कआऊट करताना दिसतात. दोघींचं बॉलीवूडमधलं (bollywood actress) करिअरही जवळपास एकाच टप्प्यावर सुरू झालेलं आणि दोघींनीही आपापल्या कामाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतंत्र स्थानही निर्माण केलं आहे. दोघींच्या करिअरची, त्यांच्या मैत्रीची चर्चा तर सोशल मिडियावर (social media) नेहमीच रंगलेली असते. पण आता मात्र त्या दोघींबाबत आणखी एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे.
या दोघींचे काही फोटो नुकतेच व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंमधला दोघींचाही लूक आणि विशेष म्हणजे त्यांनी जे जॅकेट घातलं आहे, ते जॅकेट सध्या चांगलंच चर्चेत आहे. खरेतर दोन्ही जॅकेट वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. एकीचं जॅकेट ट्रॅडिशनल वेअर प्रकारातलं आहे, तर दुसरीचं जॅकेट वेस्टर्न वेअरवर फिट ठरणारं आहे. एकीने ते परदेश दौऱ्यावर असताना घातलंय तर दुसरीने ते भारतातच एका फोटोशूटसाठी घातलं आहे. जान्हवी आणि सारा... या दोघींचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. त्यामुळेच तर त्यांच्या आऊटफिट्सची, त्यांच्या ज्वेलरी सिलेक्शनची आणि इतर ॲक्सेसरीजची नेहमीच चर्चा होत असते. असा दोघींनीही त्यांचा तोच फॅशन सेन्स पुन्हा एकदा दाखवला असून दोघीही आपापाल्या ड्रेसिंगमध्ये कमालीच्या ट्रेण्डी दिसत आहेत.
कसं आहे जान्हवी कपूरचं जॅकेट?
Traditional jacket of Janhvi Kapoor
Good Luck Jerry या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सध्या जान्हवी बिझी आहे. यादरम्यानच्या एका इव्हेंटमध्ये तिने फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केलेला जांभळ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता. क्रॉप टॉप, शरारा आणि त्यावर लाँग जॅकेट असा तिचा ड्रेस खूपच कॅची दिसत होता. जॅकेटवर पुर्णपणे पांढऱ्या धाग्याने थ्रेडवर्क करण्यात आलं आहे. तिच्या या ड्रेसची खासियत म्हणजे हा ड्रेस cellulosic या इकोफ्रेंडली फायबरपासून बनविलेला आहे. तिच्या या जॅकेटची किंमत ३५ हजार रुपये आहे.
सारा अली खानच्या जॅकेटचे वैशिष्ट्य
Sara Ali Khan's trendy look jacket
सारा अली खानचं जॅकेट पुर्णपणे वेगळं आहे. तुर्की ट्रीपवर असताना तिने नुकतंच ते जॅकेट घातलं होतं. ऑलिव्ह ग्रीन रंगाचं ब्रालेट, हाय वेस्ट बॅगी डेनिम जीन्स आणि त्यावर लाँग जॅकेट असा साराचा लूक सुपरकूल होता. तिच्या या जॅकेटवर वेगवेगळ्या रंगांनी पॅचवर्क केलेलं होतं. पायापर्यंत लांब असणारं हे जॅकेट सेलिब्रिटी फॅशन डिझायनर वरूण बहल यांच्या कलेक्शनमधलं होतं. The vintage upcycled embroidered long jacket अशा शब्दांत तिच्या या जॅकेटचं वर्णन करण्यात आलं आहे. या अतिशय देखण्या जॅकेटची किंमत तब्बल सव्वातीन लाखांच्या घरात आहे.