'साडी' ही प्रत्येक भारतीय महिलेची पहिली पसंती असते. 'साडी' हा महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय आहे. कोणताही खास प्रसंग, सण, समारंभ असला की आवर्जून साडी नेसली जातेच. 'साडी' ही सगळ्याचजणींची आवडती असली तरीही काहीवेळा ती व्यवस्थित नेसता येत नाही म्हणून या एका कारणासाठी अनेकजणी साडीला (Trending Zip and Go saree) नकोच म्हणतात. साडी नेसल्यावर जितकी सुंदर, आकर्षक दिसते तितकीच ती नेसणे (Trending Zip and Go Saree Ready to Wear Saree) म्हणजे महाकठीण काम असते, असे अनेकजणींना वाटते. काहीवेळा साडी नेसताना ती फुलते, तर कधी निऱ्या व्यवस्थित येत नाहीत, याचबरोबर कधी पदर नीट लावता येत नाही अशा एक ना अनेक भानगडींमुळे काहीजणींना साडी नेसणे म्हणजे नको वाटते(Zip Sari Is Also Available In The Market Women Will Get Ready Instantly Without Any Hassle).
काहीजणींना साडी नेसायची हौस तर असते पण साडी नेसून इतर काम करणे किंवा वावरणे त्यांना अवघड होऊन जाते. याचबरोबर साडी नेसल्यावर चालताना ती सुटेल की काय अशी भीती देखील अनेकींना असतेच. अशावेळी रेडिमेड शिवलेली साडी नेसणे हाच एक सगळ्यात बेस्ट पर्याय असतो. आजकाल बाजारांत अशा 'रेडी टू वेअर' घालता येतील अशा बऱ्याच साड्या अगदी सहज विकत मिळतात.
अशाच एका 'रेडी टू वेअर' साडीचा नवा प्रकार सध्या इंस्टाग्रामवर फार मोठ्या प्रमाणांत व्हायरल होत आहे. बघूयात नेमक काय आहे?
साडी न नेसता ड्रेससारखी घालू शकता...
आता साडी नेसायची, पदर पिनअप करायची , निऱ्या काढायची झंझटच विसरा कारण आता आपण चक्क ड्रेस सारखी अगदी २ मिनिटांत साडी घालून रेडी होऊ शकतो. 'रेडी टू वेअर' साडी प्रकारांमधील 'झिप अँड गो साडी' हा आता एक नवीन प्रकार आला आहे. या प्रकारामध्ये तुम्हाला साडी नेसायची गरजच भासत नाही. एवढंच नाही तर आपण ड्रेस घालतो तशी ही शिवलेली साडी ड्रेस किंवा एखाद्या जॅकेटप्रमाणेच परिधान करायची आहे. साडीचा ना नवा प्रकार सध्या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये खूपच व्हायरल होताना दिसत आहे. 'झिप अँड गो साडी'ची अशी हटके झलक तुम्हाला इंस्टाग्रामवरील gehani.heena या अकाऊंटवर पाहायला मिळणार आहे.
काही केल्या केसांची वाढच होत नाही? वापरा चमचाभर 'ही' आयुर्वेदिक पावडर, केस होतील लांबसडक-दाट...
कॉमेडियन भारती सिंह सांगते, केस काळे करण्याचा सुपरहिट फॉर्म्युला, पांढऱ्या केसांची चिंताच सोडा....
'झिप अँड गो' या साडी प्रकारात तुम्हाला साडी नेसण्यासाठी ना परकरची गरज लागत, ना पदर लावण्यासाठी पिनची. ही साडी नेसावी लागत नाही, सोबतच यात निऱ्या किंवा पदर व्यवस्थित लावण्याची झंझटच नसते. एवढंच काय तर वेगळा ब्लाऊज देखील घालावा लागत नाही. याच साडीला चक्क ब्लाऊज देखील अटॅच केलेला असतो, आहे की नाही एकदम भारी आणि हटके जुगाड.
'झिप अँड गो' साडी प्रकारात आपल्या साडीच्या ब्लाऊजलाच साडी अटॅच केलेली असते, यामुळे तुम्हाला वेगळे असे ब्लाऊज घालण्याची गरजच पडत नाही. आपण एखादे जॅकेट किंवा ड्रेस घालतो त्याच पद्धतीने ही साडी घालायची आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या बटणाच्या जागी चेन लावलेली असते. ब्लाऊज घातल्यानंतर या साडीचा जो भाग कमरेजवळ येतो तिथे परकरला जशी गाठ मारतो तशीच गाठ मारायची आहे. त्यानंतर त्यावरून साडी कव्हर करून ब्लाऊजची चैन लावून घ्यायची. मग पदर आपल्याभोवती एकदा गोल गुंडाळून डाव्या खांद्यावर आणून सोडायचा.
अशा साध्या - सोप्या फक्त ३ स्टेप्समध्ये साडी घालून तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी तयार होऊ शकता. आहे की नाही ही भन्नाट आयडिया, त्यामुळे आता साडी आवडत असेल पण नेसता येत नसेल किंवा साडी नेसणे कठीण वाटत असेल तर तुम्ही हा 'झिप अँड गो' साडीचा नवा प्रकार नक्की ट्राय करून पाहू शकता. आता साडी नेसायची झंझटच विसरा, साडी नेसू नका तर चक्क २ मिनिटांत ड्रेस सारखी परिधान करा.
लो बहन, अब zip वाली साड़ी भी आ गई मार्केट में
— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) December 3, 2024
😜😜😜😜😜😜 pic.twitter.com/K87GmzJqhU