Join us  

गरबा खेळताना माथापट्टी तिरकी होते-बिंदी पडून जाते? २ सोप्या युक्त्या-फोटोही येतील एकदम परफेक्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 5:36 PM

Tricks & Hacks To Wear bindiya, 1 simple trick - the Mathapatti will fit perfectly : आता कितीही जोरदार गरबा खेळा, कपाळावरील बिंदी, माथापट्टी जागची हलणार नाही...

नवरात्र सुरु होण्यास आता फक्त एकच दिवस बाकी आहे. सगळीकडे नवरात्रीची अगदी जय्यत तयारी सुरु आहे. नवरात्रीत गरबा खेळायला जाणे अनेकांना खूप आवडते. गरबा खेळायला जायचं म्हटलं की आपण अगदी नटून - थटून व्यवस्थित आवरुन जातो. गरबा खेळायला जाताना आपण मोठमोठाले घेरदार घागरे, सुंदर मेकअप आणि त्यावर परफेक्ट मॅचिंग असे ऑक्सिडाईज दागिने घालतो. या दागिन्यांमध्ये हेव्ही नेकलेस, कानातले झुमके, बांगड्या, पायांतील पैंजण, डोक्यावर बिंदी (Bindiya) किंवा माथापट्टी असे अनेक दागिने आवडीने घालतो. स्त्रियांच्या साजश्रुंगारामध्ये, कपाळावर शोभून दिसणाऱ्या बिंदीला आणि माथापट्टीला फार महत्व असते.

आपले सौंदर्य अधिक खुलून यावे यासाठी काहीजणी कपाळावर शोभेल अशी बिंदी किंवा माथापट्टी अवश्य लावतात. कपाळावर अगदी हौसेने लावलेली बिंदी किंवा माथापट्टी गरबा खेळताना पडते, असा अनुभव अनेकींना नक्कीच आला असेल. वेगवेगळ्या डिझाईन्स किंवा आकाराच्या  बिंदी, माथापट्टी लावून आपण सुंदर तर दिसतो, पण गरबा खेळताना त्या आहेत तशाच कपाळावर टिकवून ठेवणे हे मोठे कठीण काम असते. कपाळावर बिंदी, माथापट्टी लावताना ती व्यवस्थित फिट बसवावी लागते. नाहीतर ही बिंदी, माथापट्टी डोक्यावरून घसरून खाली पडण्याची शक्यता असते. अशावेळी बिंदी, माथापट्टी (Mathapatti) डोक्यावरून घसरून खाली येऊ नये व डोक्यावर फिट बसावी यासाठी एक सोपा उपाय पाहूयात(Tricks & Hacks To Wear bindiya, 1 simple trick - the Mathapatti will fit perfectly). 

१. कपाळावर बिंदी फिट बसावी यासाठी काय करावे ? 

कपाळावर बिंदी एकदा लावल्यानंतर ती घसरुन पडू नये किंवा ती फिट बसावी यासाठी एक सोपा ब्यूटी हॅक्स वापरु शकतो. यासाठी आपण सगळ्यात आधी केसांचा बरोबर मधोमध भांग पाडून घ्यावा. भांग पाडून घेतल्यानंतर उजव्या बाजूच्या केसांच्या पार्टीशन मधील एक छोटीशी बट घेऊन या केसांच्या बटमध्ये बिंदीचे चे हुक ओवून घ्यावे. आता बिंदीचा भाग व्यवस्थित कपाळाच्या पुढच्या बाजूला आणून बिंदी कपाळावर सेट करून घ्यावी. त्यानंतर या मागच्या भागातील थोडे केस आणि बिंदीचे मागचे टोक एकत्रित घेऊन त्यांना एक हेअर पिन लावून घ्यावी. आता केसांच्या दोन्ही पार्टीशन मधील अनुक्रमे एक एक बट घेऊन ती बिंदीच्या वर ओव्हरलॅप करत केसांची वेणी घालून घ्यावी. (ज्याप्रमाणे आपण सागरवेणी घालतो तशीच केसांची वेणी घालूंन घ्यावी). यामुळे या वेणीच्या आत आपली बिंदी अगदी व्यवस्थित फिट बसेल. यामुळे आपण कितीही धमाल, मस्ती करत गरबा खेळलात तरीही कपाळावरील बिंदी आहे तशीच जागच्या जागी राहील. यामुळे तुम्हांला सतत बिंदी पडण्याचे किंवा सारखे हलण्याचे टेंन्शनचं राहणार नाही.  

कापूस आणि चमचाभर जिरे वापरुन घरीच तयार करा वॉटरप्रूफ आयलायनर, नवरात्रीत डोळ्यांना द्या परफेक्ट लूक...

लग्न ठरलंय-चेहऱ्यावर हवा सिलेब्रिटींसारखा ग्लो? वापरा 'हा' खास फेसमास्क, ब्रायडल ग्लो येईल...

२. कपाळावर माथापट्टी फिट बसावी यासाठी काय करावे ?     

सर्वप्रथम आपल्या आवडीची एक माथापट्टी निवडा. आता एक काळ्या रंगाचा इलॅस्टीक बँड घेऊन आपण जिथे माथापट्टी लावणार आहात त्या भागाचा अंदाज घेऊन तेवढ्या मापाचा इलॅस्टीक बँड कापून घ्यावा. जिथे माथापट्टी लावणार आहात त्या भागाचा अंदाज घेतल्यानंतर त्या आलेल्या मापापेक्षा आकाराने थोडा छोटाच इलॅस्टीक बँड कापा. जेणेकरून, इलॅस्टीक बँड छोटा कापल्याने तो व्यवस्थित ताणून बसेल. पण जर आपण जास्त मापाचा मोठा इलॅस्टीक बँड घेतला तर इलॅस्टीक बँड ताणला न जाऊन लूज पडू शकतो. आता माथापट्टीच्या दोन्ही हुकांना इलॅस्टीक बँडची दोन्ही टोक बांधून घ्या. इलॅस्टीक बँडने हुकांना गाठ मारताना लूज गाठ मारु नका, नाहीतर माथापट्टी आपल्या माथ्यावर नीट बसणार नाही. आता एखाद्या नेकल्सप्रमाणे माथापट्टी आधी गळ्यात घालून घ्या. त्यानंतर आपण केसांना ज्या पद्धतीने हेअर बँड लावतो, त्याच पद्धतीने गळ्यांतील माथापट्टी हलकेच डोक्यावर बसवून घ्या. असे केल्याने आपली माथापट्टी व्यवस्थित डोक्यावर आपल्याला हवी तशी फिट बसेल. माथापट्टी डोक्यावर फिट बसावी म्हणून त्याला दोन्ही बाजुंनी बरेच पीन लावून सेट करण्यापेक्षा हा उपाय केव्हाही सोपा ठरेल. यामुळे वारंवार पीन लूज झाली म्हणून माथापट्टी फिट बसली नाही, बरेच पीन लावल्याने केसांचा गुंता झाला, यांसारख्या समस्यांपासून दूर राहता येईल.

गरबा खेळून घाम येतो - मेकअप पसरू नये म्हणून 'असा ' करा वॉटरप्रूफ मेकअपबेस...

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४फॅशननवरात्री