अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) नेहमीच वेगवेगळ्या कामांमध्ये स्वत:ला गुंतवून घेत असते. तिला पुस्तके वाचण्याचा छंद तर आहेच, पण ती एक नावाजलेली लेखिका म्हणूनही ओळखली जाते. इंटेरियर डेकोरेशनचीही तिला आवड आहे. शिवाय मध्यंतरी ती तिच्या मुलीच्या मदतीने गिटारही शिकत होती. गार्डनिंगचीही तिला भारीच हौस आहे आणि झाडांची काळजी कशी घ्यायची, याविषयीही तिने काही फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत. एक महिन्यापुर्वीच ती इंग्लंडमधून उच्च शिक्षण घेऊन परतली आहे. आता नुकताच तिने आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये तिने जुन्या झालेल्या जीन्सवर ( Best reuse of old jeans by Twinkle Khanna) फॉईलिंग पद्धत (foiling work) वापरून एक छानसे डिझाईन तयार केले आहे. (how to do foiling work on fabric?)
जुन्या जीन्सवर ट्विंकलने केलं फॉईलिंग वर्क
जुन्या झालेल्या जीन्सचं काय करायचं, हा प्रश्न आपल्यालाही बऱ्याचदा पडतोच. मग आपण ती खालून कापून तिलाच थ्री- फोर्थ करतो किंवा मग आणखी कापून तिची शॉर्ट्स करतो. काही जणी वेगवेगळ्या पद्धतीने जीन्स कापून तिला आणखी स्टायलिश लूकही देतात.
मेंदू तल्लख राहण्यासाठी काजोल करते ब्रेन एक्सरसाईज, अनिल कपूरकडून गिरवले व्यायामाचे धडे
आता जुन्या जीन्ससोबत तुमचे असे सगळे प्रयोग करून झाले असतील तर आता ट्विंकलने सांगितलेला हा भन्नाट उपाय पाहा आणि फॉईलिंग पद्धत वापरून तुमच्याही जुन्या झालेल्या जीन्सचं रुपडं पालटून टाका. आता कपड्यावर हे फॉईलिंग वर्क कसं करायचं हे पाहूया....
कसं करायचं फॉईलिंग वर्क?
ट्विंकल खन्नाने फॉईलिंग वर्क करून तिच्या जीन्सच्या मागच्या खिशावर एका माणसाचं चित्र काढलं आहे. आता तुम्हाला जर असं काही करायचं असेल तर त्यासाठी फॉईल, फॉईलिंग पेपर आणि ग्लू असं साहित्य लागणार आहे.
'या' एका कारणासाठी आलियाने स्वत:च्या लग्नात नेसली होती साडी, तिला घागरा नको होता कारण.......
सगळ्यात आधी फॉईलिंग पेपरवर तुम्हाला जे हवं ते डिझाईन काढून घ्या. त्यावर ग्लू लावा. आता हा पेपर तुमच्या कपड्यावर चिटकवा. त्यानंतर त्यावर तुम्हाला आवडणाऱ्या रंगाची फॉईल ठेवा. फॉईलचा रंग वरच्या बाजूने असावा. त्यानंतर त्यावरून इस्त्री फिरवा. जेव्हा तो कागद थंड होईल, तेव्हा अलगदपणे फॉईल काढून टाका. तुम्ही कागदावर काढलेले डिझाईन कपड्यावर उमटलेले असेल. कपड्यावर फॉईलिंग कसं करायचं, याविषयीचा हा एक व्हिडिओही बघा.