पूर्वीच्या काळी रोजच नऊवारीचा वापर केला जायचा. बऱ्याच घरांमध्ये आजी आजही नऊवारी रोज नेसतात. मग त्याला पातळ म्हणा किंवा काष्टी म्हणा. (Use Saree Shaper It Gives You Pretty Look)अगदी पाच मिनिटात आजीची नऊवारी नेसून होते. वजनालाही हलकी असते. त्यानंतर पद्धत आली सहावार साडीची. जिला आपण गोल साडी असं ही म्हणतो. अनेक महिला रोजच्या वापरासाठी अशी सहावार वापरतात. शिक्षिका , सरकारी नोकर्या करणाऱ्या महिला आदी. (Use Saree Shaper It Gives You Pretty Look)रोजच साड्या नेसतात. ज्या रोज नेसत नाहीत अशा महिला सणासुदीला नक्कीच साडी नेसतात. साडी फक्त पेहराव नाही तर साडी हे प्रेम आहे.
साडी मस्त चापून नेसली तरी, थोड्यावेळाने विस्कटून जाते. हलकी साडी असेल तर वावरायला छान वाटते मात्र, त्यातूनही हवा आरपार झाली की तिचा आकारच बदलून जातो. कंबरेच्या जवळ साडी बरेचदा फुगते. मग भला मोठा भपका येतो, तो फारच घाण दिसतो. खरं तर साडीत महिलांचे रुप फारच आखीव दिसते. पण काही साड्यांमधून अंगाचा आकार जरा विचित्रच दिसतो. तुमच्याबरोबरही असं होतं का?
साडी नेसायची म्हटलं की साडी तर महत्त्वाची आहेच. पण मग चांगला ब्लाऊज हवा. चांगला परकर किंवा पेटिकोट हवा. त्याशिवाय थोडीच साडी नेसता येते? चालताना परकर सारखा पायांच्या मध्ये जातो. त्यामुळे नुसता वैताग येतो. तसेच परकर वर-वर जातो मग तो सारखा खाली ओढावा लागतो. परकरला फुगा येतो. मग साडी फुगलेली दिसते. या सगळ्या गोष्टींना तुम्हीही वैतागला आहात का? मग परकर राहू द्या आणि साडी शेपर वापरून बघा.
साडी शेपरमुळे साडी फुगत नाही. ते अगदी घट्ट वगैरे बसत नाही. अगदी कम्फर्टेबल असतं. परकरसारखी फ्रिल शेपरला नसते. त्यामुळे शेपर उडत नाही. साडी शेपर मऊ-मऊ अशा होजिअरी कापडापासून तयार केला जातो. त्यामुळे तो त्वचेसाठीही चांगलाच आहे. पायापाशी शेपरला कट असतो. त्यामुळे साडी नेसून खाली बसताना, चालताना काही अडचण येत नाही. हालचाल बिंधास्त करता येते. परकर प्रमाणेच शेपरही विविध रंगात मिळतात. दिसायलाही तो फार सुंदर दिसतो. तसेच परकरमुळे शरीराची मागची बाजू उगाच साडीत जाड दिसते. तसा काही प्रकार साडी शेपरमधून घडत नाही.