Lokmat Sakhi >Fashion > मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त...

मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त...

How to wear large earrings without hurting your earlobes : Wear heavy earrings without pain : Use This Trick For Wearing Heavy Earrings Without Pain : कान दुखू नये, कानाचे छिद्र मोठे होऊ नये म्हणून उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 06:22 PM2024-10-10T18:22:38+5:302024-10-10T18:42:13+5:30

How to wear large earrings without hurting your earlobes : Wear heavy earrings without pain : Use This Trick For Wearing Heavy Earrings Without Pain : कान दुखू नये, कानाचे छिद्र मोठे होऊ नये म्हणून उपाय...

Use This Trick For Wearing Heavy Earrings Without Pain How to wear large earrings without hurting your earlobes Wear heavy earrings without pain | मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त...

मोठमोठे कानातले सणावाराला घालून कान दुखतात? खरेदी करा या २ वस्तू, घाला हेवी कानातले बिंधास्त...

सध्या सणावाराचे दिवस सुरु आहेत. नवरात्र, दसरा, दिवाळी असे लागोपाठ येणाऱ्या सणांनिमित्त आपण भरजरी कपड्यांसोबत मॅच करतील, असे मोठे झुमके घालणे पसंत करतो. लग्नसोहळे, सणसमारंभ, कार्यक्रम असेल की आपण शक्यतो हेव्ही झुमके आणि कानातले घालतो. बाजारांत विकत मिळणारे असे मोठे हेव्ही कानातले - झुमके घेण्याचा मोह आवरत नाही. आपण खास प्रसंगी छान नटून - थटून तयार होतो अशावेळी भरजरी कपडे घातले की त्याला शोभणारे सुंदर  कानातले असायला हवेत, असे वाटते. या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स, पॅटर्न असणारे कानातले आपल्याला मस्त फेस्टिव्ह लूक देतात( Use This Trick For Wearing Heavy Earrings Without Pain).

हे हेव्ही कानातले दिसायला सुंदर तर दिसतात पण तितकेच ते घालणे म्हणजे त्रासदायक वाटते. असे हेव्ही कानातले घातले की आपले कान, कानाची पाळी (Wear heavy earrings without pain) फार दुखते. कोणत्याही कार्यक्रमापुरते आपण हे कानातले घालतो खरे, पण मग पुढचे २ ते ३ दिवस मात्र कान खूप दुखतात. याचबरोबर खूप खाज येते आणि काही वेळा तर कानाच्या छिद्रातून पस, पाणी आणि रक्तही येतं. पण आता असा त्रास सहन करण्याची काही गरज नाही. बाजारांत विकत मिळणाऱ्या या दोन वस्तूंचा वापर करून आपण सणासुदीला असे हेव्ही कानातले अगदी बिंधास्तपणे घालून मिरवू शकता. या दोन वस्तूंचा वापर केल्याने आपण मोठे कानातलेही आरामात घालू शकतो आणि यामुळे कानदेखील दुखणार नाही(How to wear large earrings without hurting your earlobes).

हेव्ही कानातले किंवा झुमके घालण्यापूर्वी वापरा या २ गोष्टी... 

१. ट्रान्सपरंट रबर चैन :- हेव्ही कानातले किंवा झुमके घालण्यापूर्वी आपण या रबर चैनचा वापर करू शकता. ही रबर चैन आपल्याला अगदी सहजपणे बाजारांत किंवा ऑनलाईन देखील विकत मिळू शकते. ही रबर चैन प्लॅस्टिकच्या पारदर्शक धाग्याने तयार केलेली असते. या चैनीच्या दोन्ही टोकाला दोन लहान गोलाकार आकाराचे हुक असतात. यातील एक हुक आपण आपल्या कानातल्यात अडकवून मग कानातले घालावे. त्यानंतर कानात जसा वेल घालतो त्याचप्रमाणे कानाच्या पुढच्या भागापासून सुरू होऊन मग वर जाऊन कानाच्या मागच्या भागात अडकतात. यामुळे कानातल्यांचा भार या रबर चैनवर जातो आणि तो छिद्रांवर येण्याऐवजी कानाच्या वरच्या भागावर पडतो. यामुळे आपले कान दुखत नाहीत तसेच कानाचे छिद्र देखील मोठे होत नाहीत. ही रबर चैन आपल्याला २५० ते ३०० रुपयांपर्यंत विकत मिळू शकते. 

ट्रान्सपरंट रबर चैन खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

https://amzn.to/3Y0K2sD

गरबा खेळताना मोबाइल कुठं ठेवायचा? पाहा ६ सोपे स्टायलिश पर्याय-मोबाइल हरवण्याची-पडण्याची भीती नाही...

गरबा खेळताना घाला ट्रॅडिशनल पण हटके ‘असे’ स्टायलिश शूज, पायही दुखणारही नाहीत आणि दिसालही ट्रेंडी !

२. एअर लॉब टेप :- खूप हेव्ही कानातले घालून कानाचे छिद्र मोठे होऊ नयेत म्हणून आपण एअर लॉब टेप वापरु शकता. ही टेप तुम्हाला अगदी सहज बाजारांत किंवा ऑनलाईन देखील विकत मिळू शकते. ही टेप आपल्या चिकटपट्टी प्रमाणेच असते. छोट्या - छोट्या गोलाकार किंवा अंडाकृती आकारात या एअर लॉब टेप विकत मिळतात. कानात हेव्ही कानातले घालण्यापूर्वी एअर लॉब टेप घेऊन ती कानाच्या पाळीला मागच्या बाजूने चिटकवून घ्यावी. एअर लॉब टेप चिटकवल्यानंतर आपण कानातले घालू शकता. यामुळे हेव्ही कानातले कानाच्या छिद्रांत अगदी व्यवस्थित फिट बसतात. याचप्रमाणे कानांच्या छिद्रांचा आकार मोठा होत नाही. ही एअर लॉब टेप आपल्याला अगदी ९५ रुपयांपासून २१९ रुपयांपर्यंत सहज विकत मिळू शकते. 

एअर लॉब टेप खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

https://amzn.to/4gWHqVh

दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय? ‘या’ ७ रंगांचे कपडे घ्या, दिवाळीत तुमच्यावरुन नजर हटणार नाही...

अशाप्रकारे आपण रबर चैन व एअर लॉब टेप या दोन गोष्टींचा वापर करून कितीही हेव्ही कानातले किंवा झुमके अगदी सहजपणे कॅरी करु शकता. आपल्यासाठी हे दोन स्वस्तात मस्त उपाय फायदेशीर ठरु शकतील.


Web Title: Use This Trick For Wearing Heavy Earrings Without Pain How to wear large earrings without hurting your earlobes Wear heavy earrings without pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.