Join us  

वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साडी नेसणार? पाहा एकापेक्षा एक पारंपरिक, मराठमोळे साडी लूक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 11:43 AM

Vat Savitri 2023 Vat Purnima 2023 : महिला हौशीनं नटून-थटून वडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. (Saree dressing idea for vat savitri for vat purnima)

वटपौर्णिमा (Vat Purnima 2023) सण प्रत्येक विवाहित महिलेसाठी खास असतो.  जेष्ठ महिन्याच्या पोर्णिमेला वटपौर्णिमेला असं म्हणतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात आणि वडाची पूजा करतात.  यादिवशी महिला हौशीनं नटून-थटून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. (Saree dressing idea for vat savitri for vat purnima)

पारंपारीक मराठमोळ्या लूकमध्ये महिला हा सण साजरा करतात.  कोणती साडी नेसली तर आपण पारंपारीक तितकंच डिसेंट कसं दिसू  हाच विचार प्रत्येकजण करतो. वट पौर्णिमेला ट्राय करता येतील असे मराठमोळे लूक्स पाहूया. (Vat Purmina Marathi Look) यानिमित्तानं तुम्ही लग्नात नेसलेल्या किंवा आधी एखाद्या कार्यक्रमात घातलेल्या नव्या साडीची घडी मोडू शकता. 

वटपोर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या?

लाल,  हिरवा, पिवळा, जांभळा, गुलाबी अशा कोणत्याही कलरफूल साड्या तुम्ही नेसू शकता. फक्त पूर्ण पांढरी आणि काळी साडी नेसणं टाळा. काठ पदराच्या साड्या वटपोर्णिमेला नेसण्यासाठी उत्तम पर्याय असतो. यावर्षी पावसाला अजून  सुरूवात न झाल्यानं साड्या खराब होण्याचा तितकाचा प्रश्न असणार नाही.

नववारीवर मोत्याचे दागिने किंवा गोल्ड प्लेटेट ज्वेलरी वेअर करू शकता. कपाळावर चंद्रकोर आणि नथ घातल्यास तुमचा लूक अजूनच खुलून दिसेल. तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पारंपारीक नऊवारी साडी नेसू शकता.  तुम्हाला हव्या त्या रंगाची नऊवारी साडी तुम्ही वटपौर्णिमेला नेसा.  

केस मोकळे सोडल्यास तुम्हाला जास्त घाम येऊन चिडचिड होऊ शकते. म्हणून केसांचा बन बांधून छान हेअर स्टाईल करा. जेणेकरून केस  सुंदर छान दिसतील. या बनभोवती आर्टिफिशिल फुलं, वेण्या, ब्रॉच किंवा गजरा लावून केसांचे सौंदर्य खुलवू शकता.

तुम्ही केसांचा बन बांधत असाल तर जास्त वर बांधू नका यामुळे तुमचा लूक बिघडू शकतो. मध्ये किंवा खाली बन बांधून त्याभोवती गजरा गुंडाळा. काठाच्या किंवा सिल्कसाठी सिंपल लूक हवा असेल तर तुम्ही स्लिव्हजलेस ब्लाऊज ट्राय करू शकता.

जर तुमचे दंड खूपच जाड असतील तर थ्री-फोर स्लिव्ह्जचं ब्लाऊज शिवा.  बाजारात नथींचे एकापेक्षा एक प्रकार उपलब्ध आहेत. तुम्हाला खूपच सिंपल मराठी लूक हवा असेल तर तुम्ही साडीवर मंगळसुत्र त्यावर साजेसे कानातले आणि नख घालून पूर्ण लूक मिळवू शकता. 

टॅग्स :फॅशनभारतीय उत्सव-सण