सध्या कस्टमाईज वस्तूंचा ट्रेण्ड आला आहे. काही सेलिब्रिटी मंडळी साडीही कस्टमाईज करून घेत असतात. आता अशीच एक विम्बल्डन कस्टमाईज साडी सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. विम्बल्डन आणि टेनिस संबंधी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन तयार करण्यात आलेली ही साडी खरोखरच खास आहे. वडोदरा शहरात राहणाऱ्या एका मॉडेलने ही साडी नेसून केलेले फोटोशूट सध्या खूप गाजत असून त्याविषयीचा व्हिडिओ wimbledon च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. (Viral Video Of Wimbledon Themed Saree)
या व्हिडिओमध्ये ती साडी कशा पद्धतीने तयार करण्यात आली आहे, याविषयीच्या खूप बारीक गोष्टी सांगितल्या आहेत. साडीच्या काठांवर नाजूक स्ट्रॉबेरी डिझाईन काढले असून हॅण्डपेंटिंगचा तो एक उत्तम नमूना आहे.
लालबुंद टोमॅटोंनी लदबदून जाईल रोप, बघा बाल्कनीतल्या कुंडीमध्ये टोमॅटाेचं रोप लावण्यासाठी ५ टिप्स
एवढंच नाही तर साडीवर बिम्बल्डन चषकाच्या काही प्रतिकृती काढल्या असून त्या वेगवेगळ्या रंगाचे स्टोन, सेक्विन वापरून अधिक आकर्षक केल्या आहेत. टेनिसचं प्रतिक असणाऱ्या अनेक छोट्या छोट्या रॅकेट्सही या साडीवर दिसतात. चंदेरी- सोनेरी धागे वापरून त्या रॅकेट्स विणल्या आहेत.
स्ट्राॅबेरी काठांच्या बाहेरच्या बाजुने आणखी एक हिरवी बाॅर्डर असून त्यावर टेनिस पटूंची नावं सोनेरी धाग्यांनी विणून चमकदार रंगात रंगवली आहेत. साडीच्या पदरावर विम्बल्डनचा दिमाखदार लोगो आहे.
भरभरून प्रोटीन्स देणारे ५ शाकाहारी पदार्थ, विकतचे प्रोटीन शेक पिण्यापेक्षा हे पदार्थ खा...
अशी टेनिस, विम्बल्डनची झलक दाखविणारी मोतिया रंगाची ही आकर्षक साडी एकदा नक्कीच पाहायला हवी. टेनिस किंवा कोणताही मैदानी खेळ म्हटला की तिथे महिला खेळाडूंनी साडी नेसून जमत नाही. पण त्याच साडीची मदत घेऊन विम्बल्डनने भारतीय हातमाग कारागिरांशी टाय अप केले असून या देखण्या साडीची निर्मिती केली आहे.