Join us  

लेगिन्स थोड्याच दिवसात सैलसर-लुळ्या-गबाळ्या दिसतात? फक्त ३ गोष्टी करा, लेगिन्स राहतील उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2023 6:47 PM

Best Way To Wash Leggings: लेगिन्स अधिककाळ टिकावी, तिचा कपडा चांगला रहावा यासाठी या काही गोष्टी करून बघा..

ठळक मुद्देअगदी ६- ७ महिन्यांतच तिचा कपडा सैलसर पडतो आणि मग ती व्यवस्थित फिटिंगची वाटत नाही. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर......

लेगिन्स आणि कुर्ता हा पोशाख आजकाल जवळपास सगळ्याच जणी वापरतात. अगदी कॉलेजपासून ऑफिसपर्यंत सगळीकडे लेगिन्स घातली जाते. शिवाय तिचा वापर अतिशय आरामदायी असल्याने हल्ली अनेकजणी प्रवासातही जीन्सऐवजी लेगिन्स वापरण्यास प्राधान्य देतात. पण लेगिन्स खूप काळ टिकत नाही. अगदी ६- ७ महिन्यांतच तिचा कपडा सैलसर पडतो आणि मग ती व्यवस्थित फिटिंगची वाटत नाही. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर लेगिन्स धुताना (Washing tips for leggings) किंवा वापरताना या काही गोष्टींची काळजी घ्या..(how to take care of leggings?)

लेगिन्सची लवकर खराब होऊ नये म्हणून...१. वारंवार धुवू नकाप्रत्येकवेळी घातल्यानंतर आपण जीन्स धूत नाही. ४ ते ५ वेळा घातल्यानंतर साधारणपणे एकदा जीन्स धुतली जाते.

तेल लावल्यावर केस जास्तच गळतात? एकदा बघा तेल लावताना तुम्हीही या ५ चुका करताय का

तसंच काहीसं लेगिन्स बाबतीतही करा. प्रत्येकवेळी लेगिन्स धुणं टाळा. यामुळे तिचा कपडा सैलसर पडणार नाही आणि फिटिंग बिघडणार नाही.

 

२. कशी धुवायची लेगिन्स?लेगिन्सला दगडावर आपटून किंवा ब्रशने घासून अजिबात धुवू नका. ती स्ट्रेचेबल प्रकारातली असली तरी अशा पद्धतीने धुणे टाळा.

 

सरसोंका साग- मक्के की रोटी! थंडीमध्ये व्हायलाच हवा अनुष्का शर्माचा हा फेव्हरेट मेन्यू- बघा चमचमीत रेसिपी

हाताने धुणार असाल तर वॉशिंग पावडरचं पाणी करून त्यात थोडा वेळ भिजत ठेवा आणि नंतर हलक्या हाताने घासा. मशिनमध्ये धुणार असाल तर मशिनचा सॉफ्ट मोड ऑन करून धुवा. हार्ड वॉश करणे टाळा.

 

३. खूप जास्त पिळू नकालेगिन्स धुतल्यानंतर ती कॉटनचे कपडे जसे खूप घट्ट पिळले जातात, त्या पद्धतीने मुळीच पिळू नका.

मराठवाडा स्पेशल लसणाचा तिखट खुडा कसा करतात? ५ मिनिटांत होणारा झणझणीत पारंपरिक पदार्थ, तोंडाला चवच येईल

यामुळे तिचा कपडा गरजेपेक्षा जास्त ताणला जातो आणि लवकर सैल पडायला सुरुवात होते. मशिनचा वापर करत असल्यास त्यातला टायमरही अर्ध्या मिनिटांपेक्षा जास्त लावू नका. 

 

टॅग्स :फॅशनस्वच्छता टिप्स