वयोमानानुसार, किंवा अकाली केस पांढरे होण्याची समस्या बहुतेकांना सतावते. आपले केस पांढरे झालेले कुणालाही आवडत नाही. पांढरे केस लपवण्यासाठी आपल्यापैकी बहुतेकजण केसांना (3 Hot Colours that make you look younger with Grey Hair) हेअर डाय लावून केस काळे करतात. परंतु कितीही केस काळे ( Best Colors To Wear With Grey Hair) केले तरीही ते ठराविक काळानंतर पुन्हा पांढरे होतातच. अशावेळी या पांढऱ्या केसांमुळे आपण फारच वयस्कर झालो आहोत का असे आपल्याला वाटते(What Colors Look Best with Gray Hair).
एवढेच नव्हे तर आपल्यापैकी काहीजण असे देखील असतात की जे पांढरे केस कलर किंवा डाय न लावता आहे तसेच ठेवतात. परंतु काहीवेळा या केसांमुळे आपल्याला कोणत्या पॅटर्नचे कपडे शोभून दिसतील, किंवा कोणते रंग चांगले दिसतील की ज्यामुळे आपल्या पांढऱ्या केसांकडे लक्ष जाणार नाही, असे वाटते. जर तुमचे देखील केस पांढरे असतील आणि तुम्हाला ते डाय करुन रंगवायला आवडत नसतील तर तुमच्या केसांकडे लक्ष जाऊ नये म्हणून कोणत्या रंगाचे कपडे घालावे, ते पाहूयात.
तुमच्या पांढऱ्या केसांकडे लक्ष जाऊ नये म्हणून कोणत्या रंगाचे कपडे घालावे..
१. गुलाबी :- पिंक हा एक 'गर्लिश' रंग म्हणून ओळखला जातो. तसेच हा रंग अगदी यंग आणि ग्लोइंग आहे. जेव्हा आपण पिंक रंगाचे कपडे घालतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा ग्लो येते, यामुळे आपला चेहरा उजळतो. चेहऱ्याचा रंग उजळल्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल चांगले वाटते. तसेच आपला कॉन्फिडन्स देखील वाढतो. आपले व्यक्तिमत्व या रंगात अधिक आकर्षक दिसते.
२. लाल :- लाल रंग हा सगळ्या रंगामध्ये उठावदार रंग आहे. लाल रंग हे शक्तीचे प्रतीक आहे, जेव्हा आपण लाल रंगाचे कपडे घालतो तेव्हा आपल्यातला आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. याचबरोबर, जेव्हा आपण इतरांशी संवाद साधतो तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्यातले आत्मविश्वासू व्यक्तिमत्व पाहतात आणि ते केसांच्या रंगाला जास्त महत्त्व देत नाहीत, किंवा यामुळे त्यांचे तुमच्या केसांच्या पांढऱ्या रंगाकडे लक्ष जात नाही.
पारंपरिक पैठणीचा मॉडर्न थाट ! आता फ्रॉक - जंपसूट आणि को - ऑर्ड सेटपण पैठणीचे...
३. जांभळा :- जर तुमचे केस पांढरे असतील तर जांभळा हा आणखी एक रंग आहे जो तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला हवा. जांभळा रंग हा रॉयल, शाही रंगाचे प्रतीक असल्याने तो तुम्हाला देखील रॉयल लूक देईल. यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसेल, परिणामी तुमच्या पांढऱ्या केसांकडे लक्ष जाणार नाही.
बॅकलेस ब्लाऊज घालताय? ५ टिप्स, बोल्ड -स्टायलिश लूक मिळेल-दिसेलही सुंदर आणि ग्लॅमरस...
आपण अशा प्रकारे गुलाबी, लाल, जांभळा या तीन रंगाचे कपडे घातल्यास आपल्या पांढऱ्या केसांकडे लक्ष जाणार नाही.