Join us  

थ्री- डी साडी म्हणजे काय? साडीच्या जगात चर्चेत असलेला हा ट्रेण्ड नक्की काय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 6:01 PM

3-D Saree साडींच्या जगातला हा नवा फॅशनेबल ट्रेण्ड. थ्री डी साडी. आकर्षक आणि मोहक साड्यांची खास नवी चर्चा.

मासूम मिनावाला नावाची एक फॅशन ब्लाॅगर आहे. नुकतेच तिचे डोहाळेजेवण झाले. त्या कार्यक्रमासाठी तिनं एक खास साडी नेसली होती. ३- डी साडी. त्या साडीची सोशल मीडियात बरीच चर्चा झाली. पण प्रश्न असा आहे की  ३- डी साडीचा हा ट्रेण्ड काय आहे. सध्या त्या साडीची फॅशन जगात चर्चा आहे. या साडीला सध्या मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे. पण ३- डी साडी म्हणजे काय? काय तिची खासियत.

३- डी साडी म्हणजे काय ?

३- डी साडीचा सध्या मार्केटमध्ये ट्रेण्ड सुरू आहे. या साड्या नवीनतम डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने या सुंदर साड्यांचे डिझाइन तयार केले गेले आहेत. या साड्यांचे रंग आकर्षक असतात. या साड्यांचे डिझाइन डिजिटल पॅटर्न असतात. रेशम, क्रेप आणि इतर काही विशिष्ट कपड्यांवर छापून तयार केले जाते. या साड्यांचे डिझाईन आणि वर्क हे पूर्णतः वेगळे असते. आकर्षक रंगावर आणि कापडांवर ही साडी तयार केली जाते. ही साडी ब्राइट, सिंपल, ग्लोइंग, एलिगेंट लूक देते. पाहताक्षणी या साड्या कोणालाही आवडतील.

३- डी साडी किती शैलींमध्ये नेसली जाऊ शकते

३- डी साडी अनेक वेगवेगळ्या शैलींमध्ये नेसली जाऊ शकते. जर, साडीला पुढच्या बाजूला ड्रेप करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही हेवी एम्ब्रॉयडरी बॉर्डर असलेली ३- डी साडी परिधान करावी. किंवा सहावारी ज्याप्रमाणे नेसतात त्याप्रमाणे देखील तुम्ही साडी नेसू शकतात. बंगाली साडीप्रमाणे देखील तुम्ही नेसू शकता. कारण या साडींवर पूर्णतः वर्क केले जाते. त्यामुळे ही साधी कोणत्याही शैलीत नेसलीत तरी देखील ती उत्तम दिसेल.

प्रसिद्ध फैशन इन्फ्लुएंसर मासूम मीनावालाची ३- डी साडी चर्चेत

प्रसिद्ध फैशन इन्फ्लुएंसर मासूम मीनावालाने नुकतंच आपले बेबी शॉवर सेलिब्रेशनचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसते. तिच्या साडीपासून ते तिच्या अनोख्या दागिन्यांपर्यंत, मासूम  3-डी फ्लोरल एम्ब्रॉयडरी पेस्टल ग्रीन साडीमध्ये  सुंदर दिसत होती.

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशन