ब्रेसियर हे स्त्रियांचा एक महत्वाचे वस्त्र आहे. परंतु ही ब्रेसियर घालणे म्हणजे एक मोठा टास्कच असतो. आपण प्रत्येक कपड्यांनुसार वेगवेगळया साइजच्या, आकाराच्या, रंगांच्या ब्रेसियर घेतो. या ब्रेसियर खरेदी केल्यानंतर त्या वापरत असताना कधी कधी काही अडचणी येतात. काहीवेळा साइज चुकते, कधी ती फारच मोठी होते, किंवा कधी ब्रेसियरच्या पट्ट्यांबाबतसुद्धा आपल्याला अनेक समस्या उद्भवतात. मात्र आता त्यासाठी अनेक प्रकारच्या ब्रेसियर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत. ते नक्की काय असतं आणि वापरण्याचे आरोग्यदायी फायदे काय ते पाहू?(Bra Accessories For Comfort).
ब्रेसियर ॲक्सेसरीजचे प्रकार कोणते?
१. लो बॅक कनव्हर्टर - जर बॅकलेस ड्रेस घालायचा असेल आणि तुमचा ड्रेस पॅडेड नसेल तर लो बॅक कनव्हर्टरचा वापर करू शकता. लो बॅक कनव्हर्टर ब्रेसियरला मागच्या बाजूने २ एक्स्ट्रा पट्ट्या ऍड करून ब्रेसियरची मागची बाजू हवी तशी सेट करू शकता. ब्रेसियरला लो बॅक कनव्हर्टर लावून ती लो बॅक ब्रेसियरमध्ये कन्व्हर्ट करता येते.
२. डबल साइडेड टेप - ब्रेसियरची पट्टी सारखी खांद्यावरून घसरून ड्रेसच्या स्लीव्जमधून बाहेर डोकावत असेल तर डबल साइडेड टेपचा वापर करू शकता. डबल साइडेड टेपचा वापर करून ब्रेसियरची पट्टी ड्रेसच्या स्लीव्जला चिटकवू शकता.
३. रेसर ब्रा कन्व्हर्टर - रेसर ब्रा कन्व्हर्टर वापरल्याने नेहमीच्या ब्राला हटके व स्टायलिश बॅक देऊ शकता. जर ब्रा स्ट्रीप खांद्यावरून सारखी खाली घसरत असेल तर ते ही बंद होईल.
४. ब्रा स्ट्रिप एक्सटेंडर - जर कधी चुकीच्या साइजची ब्रेसियर विकत घेतली किंवा ब्रेसियरची साइज लहान झाली तर ब्रा स्ट्रिप एक्सटेंडर वापरून ब्रेसियरची साइज वाढवता येते.