Lokmat Sakhi >Fashion > कांजीवरम आणि कांचीपुरम साडीमधला फरक माहिती आहे? साडी खरेदीपुर्वी ही माहिती असायलाच हवी...

कांजीवरम आणि कांचीपुरम साडीमधला फरक माहिती आहे? साडी खरेदीपुर्वी ही माहिती असायलाच हवी...

Saree Shopping Tips: सध्या लग्नसराई जाेरात सुरू आहे. त्यामुळे मग काठपदराच्या प्युअर सिल्क साड्यांची खरेदी ओघाने आलीच.. म्हणूनच कांजीवरम आणि कांचीपुरम साड्यांची ही खास बात..(what is the difference between kanjivaram saree and kanchipuram saree?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2025 17:25 IST2025-01-21T16:52:16+5:302025-01-21T17:25:36+5:30

Saree Shopping Tips: सध्या लग्नसराई जाेरात सुरू आहे. त्यामुळे मग काठपदराच्या प्युअर सिल्क साड्यांची खरेदी ओघाने आलीच.. म्हणूनच कांजीवरम आणि कांचीपुरम साड्यांची ही खास बात..(what is the difference between kanjivaram saree and kanchipuram saree?)

what is the difference between kanjivaram saree and kanchipuram saree | कांजीवरम आणि कांचीपुरम साडीमधला फरक माहिती आहे? साडी खरेदीपुर्वी ही माहिती असायलाच हवी...

कांजीवरम आणि कांचीपुरम साडीमधला फरक माहिती आहे? साडी खरेदीपुर्वी ही माहिती असायलाच हवी...

Highlightsया साडीची आणखी एक खासियत म्हणजे ही साडी जेव्हा विणायला घेतली जाते तेव्हा साडीचा मधला भाग, काठ आणि पदर हे तिन्ही वेगवेगळे विणले जातात आणि नंतर ते एकसंध जोडले जातात.

एरवी बऱ्याच जणी ड्रेस, जीन्स अशा कपड्यांमध्ये वावरतात. पण लग्नसमारंभ असले की हमखास साड्यांची खरेदी केली जाते आणि आवर्जून साड्याच नेसल्या जातात. आता अगदी जवळचं लग्न असेल तर मग त्या लग्नांमध्ये तर काठपदराच्या प्युअर सिल्क साड्या नेसण्यालाच जास्त प्राधान्य दिलं जातं. त्यातही पैठणी, बनारसी, गढवाल, पटोला, कांजीवरम अशा साड्यांना खूप मागणी असते. आता साड्या खरेदी करायला गेल्यावर कांजीवरम आणि कांचीपुरम अशी दोन नावं उच्चारली जातात. या दोन साड्यांमध्ये काही फरक आहे का, जर असेल तर तो नेमका काय याविषयीची ही खास माहिती लग्नसराईच्या साडी खरेदी निमित्ताने तुम्हाला असायलाच हवी..(what is the difference between kanjivaram saree and kanchipuram saree?)

 

कांजीवरम आणि कांचीपुरम साडीमध्ये काय फरक?

सगळ्यात आधी ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की नावांमध्ये असलेल्या वेगळेपणामुळे गोंधळून जाऊ नका. कांजीवरम आणि कांचीपुरम ही दोन्ही एकाच प्रकारच्या साडीची वेगवेगळी नावं आहेत. याच साडीला काही भागात कांची पट्टू साडी म्हणूनही ओळखले जाते.

नाश्त्यामध्ये चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका! पौष्टिक वाटत असले तरी पोटासाठी आहेत अतिशय घातक

ही साडी तामिळनाडूची ओळख असून तिच्यावरील सुबक नक्षीकाम ही तिची खासियत. पुर्वीच्या काळी तामिळनाडूच्या कांचीपुरम भागातच ही साडी तयार व्हायची. त्यामुळे गावावरून काही जण तिला कांचीपुरम म्हणतात. काळानुसार कांचीपुरमचा अपभ्रंश होत गेला आणि आता बऱ्याच प्रांतात त्या साडीचा उल्लेख कांजीवरम असा केला जातो. 

 

आता या साडीला काही भागात कांची पट्टू असे का म्हटले जाते ते पाहूया.. कांचीपुरममधील कांची हा पहिला शब्द. तर पट्टू या तामिळी शब्दाचा अर्थ आहे उच्च दर्जाचे सिल्क. त्यामुळे कांची पट्टू अशीही तिची ओळख आहे.

फक्त १९९ रुपयांत ५ बटण, ना सुई ना धागा-न शिवताच जीन्स होईल परफेक्ट फिटींगची

म्हणूनच आता साडी खरेदी करण्यासाठी गेल्यावर दुकानदाराने या तिन्ही नावांपैकी कोणतेही नाव उच्चारले तरी गोंधळून जाऊ नका. या साडीची आणखी एक खासियत म्हणजे ही साडी जेव्हा विणायला घेतली जाते तेव्हा साडीचा मधला भाग, काठ आणि पदर हे तिन्ही वेगवेगळे विणले जातात आणि नंतर ते एकसंध जोडले जातात. ते एवढ्या नजाकतीने जोडलेले असतात की निरखून पाहिलं तरीही त्यांच्यातला जोड कुठे दिसत नाही. भारतीय कलाकुसरीचा समृद्ध वारसा म्हणून या साडीला खूप महत्त्व आहे. 

 

Web Title: what is the difference between kanjivaram saree and kanchipuram saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.