Lokmat Sakhi >Fashion > घरात घालण्यासाठी योग्य कपडे कसे निवडाल? ३ टिप्स, निवडा स्टायलिश-स्वस्त आणि कम्फर्टेबल कपडे

घरात घालण्यासाठी योग्य कपडे कसे निवडाल? ३ टिप्स, निवडा स्टायलिश-स्वस्त आणि कम्फर्टेबल कपडे

What To Wear At Home To Look Stylish: तुमचा घरातला लूक थोडा बदलून घरातही स्टायलिश राहावं असं वाटत असेल तर कपड्यांच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करा....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2024 05:06 PM2024-05-09T17:06:45+5:302024-05-09T18:10:17+5:30

What To Wear At Home To Look Stylish: तुमचा घरातला लूक थोडा बदलून घरातही स्टायलिश राहावं असं वाटत असेल तर कपड्यांच्या पद्धतीमध्ये थोडा बदल करा....

What to wear at home to look stylish, how to choose stylish and comfortable clothes to wear at home | घरात घालण्यासाठी योग्य कपडे कसे निवडाल? ३ टिप्स, निवडा स्टायलिश-स्वस्त आणि कम्फर्टेबल कपडे

घरात घालण्यासाठी योग्य कपडे कसे निवडाल? ३ टिप्स, निवडा स्टायलिश-स्वस्त आणि कम्फर्टेबल कपडे

Highlightsघरातला लूकही थोडा स्टायलिश आणि आरामदायी असावा, यासाठी तुम्ही पुढील प्रकारचे कपडे घरात घालण्यासाठी घेऊ शकता...

एक नूर आदमी, दस नूर कपडा अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, ती काही उगाच नाही. तुमचे कपडे कसे असतात, यावरून बाहेरचे लाेक तुमची परीक्षा करतात. त्यामुळे तुम्ही घराबाहेर जेव्हा पडता, तेव्हा तुमचे कपडे अगदी टापटीप असणं गरजेचंच आहे. पण हल्ली घरातही आपण व्यवस्थित राहाणं गरजेचं झालं आहे. बऱ्याच जणांच्या घरी असं असतं की कधी कोण येईल, याचा काही नेमच नसतो. त्यामुळे अशावेळी तुमचे कपडे अगदी गबाळे असून उपयोगाचं नसतं. बाहेरचं कोणी येणारं नसेल तरी आपल्या स्वत:साठी घरातल्या लोकांसाठी आपण छान दिसणं, व्यवस्थित असणं गरजेचं आहेच की (What to wear at home to look stylish).. म्हणूनच घरातला लूकही थोडा स्टायलिश आणि आरामदायी असावा, यासाठी तुम्ही पुढील प्रकारचे कपडे घरात घालण्यासाठी घेऊ शकता... (how to choose stylish and comfortable clothes to wear at home)

घरात स्टायलिश लूक देणारे आरामदायी कपडे

 

१. को- ऑर्ड सेट

सध्या को- ऑर्ड सेटची फॅशन खूप ट्रेण्डींग आहे. हे कपडे सैलसर असल्याने घरात घालायला अतिशय आरामदायी असतात. शिवाय त्यात अनेक वेगवेगळे पॅटर्नही उपलब्ध आहेत.

बघा फळं- भाज्या चिरण्याची योग्य पद्धत! त्यांच्यातला पौष्टिकपणा घालविणाऱ्या 'या' ५ चुका टाळा

तुम्हाला स्टायलिश लूक देण्यासाठी को- ऑर्ड सेटची नक्कीच मदत होऊ शकते. अगदी ५००- ६०० रुपयांपासून ते उपलब्ध आहेत.

 

२. डिव्हायडेड स्कर्ट

हा स्कर्टचा असा पॅटर्न असतो जो पॅण्टसारखाच घालायचा असतो.

उन्हामुळे मुलं गळून गेली- जेवणही जात नाही? ३ उपाय करून पाहा, उन्हाळा होईल सुसह्य...

पण त्याच्या घेर एवढा मोठा असतो की तो एखाद्या स्कर्टप्रमाणे वाटतो. घरात घालण्यासाठी हा स्कर्ट आणि टॉप हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सैलसर असल्याने तो आरामदायीही वाटतो.

 

३. फ्रॉक किंवा वन पीस

हल्ली वेगवेगळे आकर्षक फ्रॉक बाजारात मिळतात. प्रत्येकाची स्टाईलही खूपच छान असते.

बाहेरून पिवळाधमक असणारा आंबा चवीला आंबट निघतो? गोड आंबा ओळखण्यासाठी ४ टिप्स

त्यामुळे गुडघ्याच्या खाली पोटरीपर्यंत येणारे फ्रॉक किंवा वन पीस तुम्ही घरात घालण्यासाठी घेऊ शकता. यामुळे तुमचा लूक नक्कीच स्टायलिश वाटेल. 

 

Web Title: What to wear at home to look stylish, how to choose stylish and comfortable clothes to wear at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.