तुमची साडी किती जरी सुंदर आणि देखणी असली तरी तिच्यामुळे तुमचा लूक (latest blouse designs) कसा बदलणार हे तुम्ही त्या साडीवर नेमकं कसं ब्लाउज घालताय, यावर खूप जास्त अवलंबून असतं. ब्लाउजची निवड किंवा ब्लाउजची फॅशन (fashion trends in blouse designs) चुकली तर अगदी भारीच्या साडीचाही सगळाच शो निघून जातो. त्याउलट एखादी साधी साडीही ट्रेण्डी ब्लाउजमुळे (trendy blouse) तुम्हाला अत्यंत ग्रेसफूल लूक देऊ शकते. त्यामुळेच तर साडीवर नेमकं कसं ब्लाउज घालायचं, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे.
त्यातही सध्या अनेक प्रकारचे ब्लाउज पॅटर्न इन आहेत. यात डीप व्ही शेप नेक असलेलं ब्लाउज तसेच गळाबंद ब्लाउज या दोघांचीही जबरदस्त क्रेझ आहे. त्यामुळेच तर सध्या अनेक बॉलीवूड अभिनेत्री या दोन्ही प्रकारच्या ब्लाउजमध्ये दिसत आहेत. साडीवर तर असे ब्लाउज छान दिसतातच, पण त्यासोबतच लेहेंग्यावरही अशा ब्लाउजमुळे खूपच आकर्षक लूक मिळू शकतो. म्हणूनच तर कोणत्या साडीवर कोणतं ब्लाउज अधिक चांगलं दिसेल, कोणत्या प्रसंगी कोणतं ब्लाउज घालावं, याच्या या काही टिप्स.
१. गळाबंद ब्लाउज कधी अधिक चांगलं दिसेल
- जर तुम्ही एखाद्या लग्न समारंभासाठी किंवा सणावाराच्या प्रसंगासाठी साडी नेसणार असाल तर अशावेळी गळाबंद ब्लाउज तुम्हाला अधिक चांगला लूक देऊ शकेल.
- गळाबंद ब्लाउजमध्येही बोट नेक, कॉलर नेक असे प्रकार आहेत. या कोणत्याही प्रकारासोबत पुर्ण हातभर लांब बाह्या शिवण्याची फॅशन आहे.
- साडी आणि ब्लाउजचा रंग जेव्हा एकमेकांशी कॉन्ट्रास्ट असेल, तेव्हा अशा पद्धतीचे ब्लाउज शिवण्यात खरी मजा आहे.
स्मार्ट, आकर्षक दिसण्यासाठी पैसेच लागतात असं नाही... 6 सोप्या ट्रिक्स आणि दिसा स्मार्ट- सुंदर
- सामान्यपणे साडीवरचं वर्क खूप हेवी नसेल किंवा प्लेन साडी आणि भरजरी काठ असतील, तर अशा साडीवरचं ब्लाउज एकदम हेवी वर्क असणारं असतं. अशा साडीच्या कॉम्बिनेशनवर तुम्ही गळाबंद लांब बाह्यांचं ब्लाउज घालू शकता.
- हातभर लांब बाह्यांचं गळाबंद ब्लाउज घालणार असाल तर साडीचा पदर प्लेट्स घेऊन व्यवस्थित पिनअप करा. अशा ब्लाउजवर फ्लोटिंग पदरापेक्षा पिनअप केलेला पदरच अधिक शोभून दिसतो.
२. व्ही नेक ब्लाउजची फॅशन
- व्ही नेक ब्लाउज सध्या अनेक सेलिब्रिटींच्या अंगावर दिसते. जर एखाद्या पार्टीसाठी साडी नेसणार असाल किंवा इंडोवेस्टर्न लूक करण्यास प्राधान्य देणार असाल तर अशा पद्धतीचं ब्लाउज घालू शकता.
- या ब्लाउजचा गळा खूप डिप असेल तर हेवी गळ्यातलं घालून तुम्ही तो कव्हर करू शकता.
- हेवी वर्क असणारी साडी आणि त्यावरचं सिंपल प्लेन ब्लाउज अशा पॅटर्नच्या साडीसाठी व्ही नेक ब्लाउज परफेक्ट ठरेल.
- व्ही नेक ब्लाउज घातल्यावर शक्यतो पदर फ्लोटींगच असावा.