Join us  

कोणत्या रंगाच्या कपड्यांवर कोणत्या शेडची लिपस्टीक जास्त खुलून दिसते? ५ टिप्स - निवडा परफेक्ट लिपस्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 1:15 PM

Know How to Match Perfect Lipstick Color with different color cloths : सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर कलर कॉम्बिनेशन्स समजून घ्यायला हवीत....

आपण ऑफीसला, एखाद्या कार्यक्रमाला किंवा अगदी बाहेर फिरायला जाताना स्वत:चे आवरतो. यामध्ये बाकी काही मेकअप केला नाही तरी आपण किमान काजळ आणि लिपस्टीक तरी लावतोच. आपल्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या आणि ब्रँडच्या बऱ्याच लिपस्टीकचे कलेक्शन असते. यातल्या सगळ्याच लिपस्टीक आपण वापरतो असे नाही. तर आपल्याला आवडणाऱ्या १ किंवा २ शेड आपण सारख्या लावतो. यात साधारणपणे गुलाबी, लाल किंवा मरुन रंगाचा समावेश असतो. कपड्यांचा रंग आणि त्यानुसार लिपस्टीकचा रंग यांचा आपण म्हणावा तितका विचारच करत नाही (Know How to Match Perfect Lipstick Color with different color cloths). 

पण टीव्हीमध्ये किंवा चित्रपटात अभिनेत्रींनी मात्र लिपस्टीक लावली की आपल्याला त्या किती सुंदर दिसतात असं वाटतं. पण आपल्याकडे पण त्याच रंगाच्या तशाच लिपस्टीक असूनही आपण त्या योग्य पद्धतीने कॅरी करु शकत नाही. यामागे १ महत्त्वाचे कारण असते ते म्हणजे आपल्याला कलर कॉम्बिनेशनचे विशेष ज्ञान नसल्याने आपण कोणत्याही रंगाच्या कपड्यांवर कोणत्याही रंगाची लिपस्टीक लावतो. पण तुम्हाला खरंच सुंदर दिसायचं असेल आणि सगळ्यांमध्ये उठून दिसायचं असेल तर कलर कॉम्बिनेशन्स समजून घ्यायला हवीत...

१. पांढऱ्या रंगाचे कपडे

आपण बरेचदा पांढरा शर्ट, कुर्ता घालतो, पांढरी साडीही नेसतो. या रंगावर कोणत्याही रंगाची लिपस्टीक लावली तरी चालते असा आपला समज असतो मात्र तसे नसून पांढऱ्या रंगावर शक्यतो लाल आणि गुलाबी रंगाच्या शेडमधली कोणतीही लिपस्टीक लावल्यास ती जास्त खुलून दिसते. 

२. लाल रंगाचे कपडे

आपण एखाद्या पार्टीला जायचे असेल की थोडे गडद रंगाचे कपडे घालतो. हे कपडे लाल रंगाचे किंवा त्या शेडमधील असतील तर फिकट लाल रंगाची किंवा डार्क ब्राऊन रंगाची लिपस्टीक फार छान दिसते. त्यामुळे कपडे गडद आहेत म्हणून लिपस्टीक खूप फिक्या रंगाची लावली अशी चूक अजिबात करु नका. 

३. केशरी कपडे

केशरी किंवा त्याच्या आसपासच्या रंगाच्या शेडचा ड्रेस घातला असेल तर ब्राऊन, ऑरेंज किंवा पिंच रंगाची लिपस्टीक लावायला हवी. त्यामुळे तुमचे कपडे आणि एकूण लूक नकळत खुलून येण्यास मदत होते.

४. गुलाबी कपडे

आपल्याकडे बहुतांशवेळा गुलाबी रंगाच्या शेडमधले कपडे असतातच. हे कपडे घातल्यावर इतर कोणत्याही शेडचा विचार न करता केवळ गुलाबी रंगाच्या शेडस लावायला हव्यात. त्यामुळे दोन्हीचे एकमेकांवर चांगले रिफ्लेक्शन येते आणि आपण छान दिसण्यास त्याची मदत होते. 

५. हिरव्या रंगाचे कपडे

हिरव्या शेडमधले कपडे घालणार असू तर त्यावर लाल किंवा मरुन रंगाची लिपस्टीक चांगली दिसते. त्यामुळे कपड्याचा रंग आणि लिपस्टीकची शेड आवर्जून मॅच करायला हवी. त्यामुळे नकळत आपल्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडण्यास नक्कीच मदत होते. 

टॅग्स :फॅशनब्यूटी टिप्सओठांची काळजी