Lokmat Sakhi >Fashion > हुमा आणि सोनाक्षीची प्लस साईज स्टाईल, वजन वाढले म्हणून फॅशनेबल राहायचे नाही हे कुणी ठरवलं?

हुमा आणि सोनाक्षीची प्लस साईज स्टाईल, वजन वाढले म्हणून फॅशनेबल राहायचे नाही हे कुणी ठरवलं?

Huma and Sonakshi's plus size Fashionable Style प्लस साईज आहात म्हणून काय झालं, हे ड्रेस ट्राय तर करा दिसाल परफेक्ट आणि हटके..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2023 10:03 PM2023-02-08T22:03:27+5:302023-02-08T22:04:29+5:30

Huma and Sonakshi's plus size Fashionable Style प्लस साईज आहात म्हणून काय झालं, हे ड्रेस ट्राय तर करा दिसाल परफेक्ट आणि हटके..

Who decided that Huma and Sonakshi's plus size style is not fashionable because of weight gain? | हुमा आणि सोनाक्षीची प्लस साईज स्टाईल, वजन वाढले म्हणून फॅशनेबल राहायचे नाही हे कुणी ठरवलं?

हुमा आणि सोनाक्षीची प्लस साईज स्टाईल, वजन वाढले म्हणून फॅशनेबल राहायचे नाही हे कुणी ठरवलं?

लोकांमध्ये स्लिम आणि फिट राहण्याचा जणू ट्रेण्ड सुरु आहे. आजूबाजूला जर कोणी लट्ठ किंवा ओवर साईज व्यक्ती दिसला की, त्या व्यक्तीला वजनावरून चिडवायला सुरुवात होते. बॉडी शेमिंग हा प्रकार सध्या वाढत चालला आहे. मात्र, या बॉडी शेमिंगवर मात देत अनेक महिला प्रत्येक क्षेत्रात नाव गाजवत आहेत.

नुकतंच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीचा प्रदर्शित झालेला डबल साईज हा चित्रपट प्रचंड गाजला. वजन या विषयाला छेद देत त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. वजनदार व्यक्तीला त्याच्या वजनावरून, कपड्यावरून आणि खाण्यावरून खूप ट्रोल केले जाते. मात्र, आपण वजनदार आहात म्हणून स्टायलिश कपडे घालण्याचे सोडून देऊ नका. वजनदार व्यक्ती देखील तितकेच सुंदर दिसतात. यासाठी आपण सोनाक्षी आणि हुमा यांच्याकडून स्टायलिंग टिप्स घेऊ शकता.

सोनाक्षीचा वेस्टर्न वेअर

जर आपण आपल्या प्लस साईज फिगरमुळे लाजिरवाणे वाटून घेत असाल तर, असे करू नका. आपण सोनाक्षीचा हा लूक फॉलो करू शकता. तिने एका कार्यक्रमात एनिमल प्रिंट ट्रांसपेरेंट क्रोप टॉपसह वाईड लेग ब्लॅक पँट परिधान केला आहे. हा क्रोप टॉप तिच्यावर सुरेख दिसत आहे. आपल्याला देखील पार्टी अथवा फंगशनसाठी बाहेर जायचं असेल तर, हा लूक आपण कॅरी करू शकता.

फिगर फिटिंग मिडीसह ब्लेजर उठून दिसेल

सध्या ब्लेजर ट्रेण्डवर आहे. आपण प्लस साईज असाल तर, फिगर फिटिंग मिडीसह ब्लेजर कॅरी करू शकता. यात आपली कर्वी फिगर जबरदस्त दिसेल. सोनाक्षी या लुकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. ब्लेजरमुळे एक स्टॅंडर्ड लूक मिळतो.

हुमा कुरेशीचा एथनिक लूकला करा फॉलो

आपल्याला जर ट्रेडीशनल लूक आवडत असेल तर, हुमाचा हा साडी लूक पाहा. यात तिने साडीवर पफ ब्लाउज कॅरी केला आहे. जो तिच्यावर सुरेख दिसत आहे. पार्टीसाठी हा परफेक्ट पोशाख आहे.

व्हाईट कुर्तावर फ्लोरल प्रिंट

आपल्याला जर फिट आणि सुरेख दिसायचं असेल तर, कुर्ता परिधान करा. कुर्तावर प्रत्येक मुलगी सुरेख दिसते. हुमाने यात व्हाईट कुर्तावर ओढणी घेतली आहे. या ड्रेसवर फ्लोरल प्रिंट अतिशय मोहक दिसत आहे. आपण देखील हा लूक कोणत्याही स्पेशल डे साठी कॅरी करू शकता.

Web Title: Who decided that Huma and Sonakshi's plus size style is not fashionable because of weight gain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.