Join us  

बिकिनी हा पोषाख पहिल्यांदा घातला कुणी? डिझाइन कुणी केला? ती बंडखोरी होती की निव्वळ फॅशन?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 5:34 PM

Who first wore a bikini : बिकिनी हा पोषाख एका बंडखोर फॅशन प्रवासाचीच रंजक गोष्ट आहे.

पठाण (Pathaan) चित्रपटातील 'बेशरम रंग' (Besharam Rang) गाण्यातील दीपीकाचा बिकिनी लूक ट्रोल होत असून सोशल मीडियावर बिकिनीची जोरदार चर्चा आहे. बिकिनी घालणं एकेकाळी बंडखोरी असली तरी आता मॉडेल्सपासून अगदी सामान्य तरुणींपर्यंत कुणीही बिकिनी घालते. त्यासह फोटोशूट करणाऱ्याही अनेक आहेत. मात्र ही बिकिनी आली कुठून? नेमका कधी हा पोशाख वापरात आला? गुगल करुन पाहिले तरी विविध साईट्सवर यासंदर्भात रंजक माहिती मिळते. त्याच माहितीचे हे संकलन. (What is the origin of bikini)

५ जुलै १९४६ रोजी पहिल्यांदा बिकिनी डिजाईन करण्यात आली होती. ही कोणत्याही फॅशन डिझायनरने डिझाइन केली नाही तर एका इंजिनिअरनं तयार केली. लुई लेयार्ड या फ्रेंच इंजिनिअरने बिकिनी डिझाइन केली होती. बिकिनी हा जगभरातील सर्वात सेक्सी ड्रेस मानला जातो. (Who was the first woman to wear a bikini)

बिकिनी हे नाव कसं पडलं?

यामागे एक रंजक कथा आहे. वास्तविक, जिथे पहिल्यांदा बिकिनी बनवली गेली ती जागा बिकिनी एटोल होती. हे ठिकाण पॅसिफिक महासागरात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी बिकिनी एटॉल अणू आणि शस्त्रास्त्र चाचणीची जागा होती. 'लुई रीअर्ड' यांचा हा शोध बॉम्बपेक्षा कमी मानला जात नव्हता.

आजच्या काळात बिकिनी हे स्टाईल स्टेटमेंट झाले असले तरी. पण त्याचा शोध लागल्यानंतर कोणत्याही मॉडेलला ते घालायचे नव्हते. इतकेच नाही तर ती कोणत्याही जाहिरातीसाठी तयार होत नव्हती. पण काही काळानंतर १९ वर्षीय डान्सर मिशेलिनने त्याची जाहिरात करण्यास होकार दिला. बिकिनी परिधान करून ती स्विमिंग पूलमध्ये सार्वजनिकपणे दिसली तेव्हा एकच खळबळ उडाली.

छापून आल्यावर तर फारच कहर झाला. तिने हातात माचिसची पेटी घेऊन बिकिनी घालून पोजही दिली, ज्याचा अर्थ असा होता की ही बिकिनी इतकी लहान आहे की ती माचिसमध्येही बसू शकते. असे म्हणतात की मिशेलिनने बिकिनी परिधान करताच ती तुफान प्रसिद्ध झाली. तिच्या चाहत्यांकडून ५० हजारांहून अधिक पत्रे मिळाली.

आज जगभरातील मुली बिकिनी घालतात. पण एक काळ असा होता की इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये यावर बंदी घालण्यात आली होती. पण नंतर त्यांना बंदी काढावी लागली. अवघ्या ४ वर्षात बिकिनीने जगभरातील बाजारपेठेत आपला ठसा उमटवला होता. १९५० मध्ये, बिकिनीच्या विक्रीने येथील बाजारपेठांमध्ये रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली. मग हळूहळू त्याचा ट्रेंड अमेरिकेबरोबरच इतर देशांमध्येही सुरू झाला. आज भारतातही बिकनी फोटोशूटची प्रचंड क्रेझ भारतीय अभिनेत्रींमध्ये आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाफॅशन