आपण कित्येकदा टीव्हीवर फॅशन - शो मध्ये रॅम्पवर वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालून बिनधास्तपणे चालणाऱ्या मॉडेल्स पाहिल्या असतील. या मॉडेल्स कधीच हसत का नाहीत? त्या एवढ्या बारीक कशा असतात ? एवढ्या पटापट या कपडे कशा बदलत असतील? एवढ्या उंच हिल्स कशा घालत असतील? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या मॉडेल्सना बघून आपल्याला वाटत की यांच आयुष्य किती सोपं आहे. यांना फक्त नवीन उंची, महागडे कपडे घालून रॅम्पवर मिरवायचे असते. परंतु त्यांचं आयुष्य जस सोपं, झगमगीत व हाय प्रोफाइल दिसत तसं ते नसत. प्रत्येकवेळी आपण या मॉडेल्सवरून काहीना काही चर्चा करत असतो. परंतु त्यांच्याबद्दल अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अजून माहित नाही(People Don't Know These Things About Models).
१. मॉडेल्स रॅम्पवर कधीच हसत का नाहीत ?
स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारच्या मॉडेल्सना आपण बघतो. हे मॉडेल्स रॅम्पवर कधीच हसत नाही यामागेही एक खास कारण आहे. तुम्ही बऱ्याच फॅशन शो मध्ये पाहिलं असेल की, स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही प्रकारच्या मॉडेल्सना रॅम्पवर हसण्यास बंदी असते. Victoire Macon Dauxerre या फ्रान्सच्या एका सुपर मॉडेलने Never Skinny Enough: the Diary of a Top Model' या लिहिलेल्या पुस्तकांत मॉडेल्सच्या लाइफस्टाइल आणि जीवनाविषयीचे वर्णन केलेआहे. मॉडेल्स रॅम्पवर कधीच हसत नाहीत याचे उत्तर या पुस्तकात नमूद केले आहे. या पुस्तकात नमूद केल्यानुसार, मॉडेल्स जेव्हा रॅम्पवर येतात तेव्हा त्यांना एका विशिष्ट प्रकारच्या किलर लूकची गरज असते. आणि जर या मॉडेल्संनी आपला चेहेरा हसरा ठेवला तर त्यांचा हा किलर लूक भंग पावतो. या मॉडेल्सच्या हसण्याने त्यांच्या किलर लुकचा चार्म निघून जातो व त्यांचा लूक अपूर्ण वाटू शकतो त्यामुळे मॉडेल्स रॅम्पवर कधीच हसत नाहीत.
२. मॉडेल्स ब्रा घालत नाहीत का ?
कित्येकदा आपण त्यांच्या कपड्यांचे प्रकार बघून विचार करतो की, मोडेल्स ब्रा घालत असतील की नाही? मॉडेल्सना अगदी कमी वेळात भरपूर कपडे बदलून रॅम्प वॉक करायचा असतो. मॉडेल्सने प्रत्येक कपड्यात ब्रा घातलीच पाहिजे असे काही गरजेचे नसते. ब्रा घालायची का नाही किंवा कोणत्या प्रकारची ब्रा घालावी हे त्या मॉडेल्स कोणत्या प्रकारचे आऊटफिट्स घालत आहेत यावर अवलंबून असते. Victoire Macon Dauxerre या सुपर मॉडेलने लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी असे म्हटले आहे की, या मॉडेल्स आपले आऊटफिट्स घालण्या अगोदर स्किन कलरचे एकदम पातळ कापडाचे अंतर्वस्त्र घालतात त्याला (Thongs) थोंग्स असे म्हणतात ज्यामुळे त्यांचे संपूर्ण अंग झाकून जाते.
३. उंच हिल्स घालून कशा चालतात ?
उंच हिल्समुळे रॅम्पवर चालताना या मॉडेल्स कधी कधी धडपडतात. उंच हिल्समुळे रॅम्पवर चालताना मॉडेल्सना गडबडताना आपण कित्येकदा व्हायरल व्हिडीओमध्ये पाहिलं असेल. मॉडेल्सना शोच्या आधी ते कोणते आऊटफिट्स व कोणते हिल्स घालणार आहेत हे सांगितले जाते. तेव्हा या मॉडेल्स त्याच हिल्स घालून चालायची प्रॅक्टिस करतात. त्यामुळे प्रत्यक्ष शोच्यावेळी त्या हेच हिल्स घालून व्यवस्थित चालू शकतात.
४. मॉडेल्स रॅम्प वॉक करण्यासाठी सदैव तयार कशा असतात ?
मॉडेल्सना नेहमी रॅम्प वॉक करताना तयार राहावे लागते. त्या प्रत्येकवेळी रनवे रेडी असतात. या मॉडेल्सना रॅम्पवर चालण्याव्यतिरिक्त बॅकस्टेजपण फोटोशूट करावे लागते त्यामुळे त्या नेहमी रनवे रेडी असतात. कधी कधी या मॉडेल्सचे काही कँडिड पोझ मधील फोटो काढण्यासाठी हिडन कॅमेराद्वारे फोटोशूट केले जाते. त्यामुळे त्यांना कधी कोणत्या कॅमेरासमोर उभे राहून फोटोशूट करावे लागेल हे सांगता येत नाही म्हणून त्या नेहमी तयार असतात.