Join us  

उंच दिसण्यासाठी हिल्सची गरज नाही, फॉलो करा ४ टिप्स, दिसाल उंच - स्टायलिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2022 7:43 PM

Tips for Short Heighted Girl कमी उंचीच्या मुलींना आता हिल्सचा आधार घेण्याची गरज नाही, पोशाखात करा काही बदल, दिसाल उंच - सुंदर

आपला संपूर्ण लूक पूर्ण करण्यासाठी फुटवेयर मदतगार ठरतात. मुलींसाठी प्रत्येक ड्रेसवर शोभणारे फुटवेयर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. चप्पल, बूट, हिल्स अशा व अनेक प्रकारचे फूटवेयर मार्केटमध्ये सहज उपलब्ध आहेत. याने लूक तर पूर्ण होतोच यासह महिला स्टायलिश आणि कॉन्फिडन्ट दिसतात. कमी उंचीच्या मुली अधिकतर हिल्सचा वापर करतात. परंतु, गरजेचं नाही की हिल्सने आपली उंची दिसून येईल. जर आपल्याला उंच आणि कॉन्फिडन्ट दिसायचं असेल, तर काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा.

रंगाकडे लक्ष द्या

जर उंची कमी आणि वजन जास्त असेल तर, तुम्ही काळ्या रंगाचा पोशाख घालू शकता. गडद निळा, मरून फॅब्रिक, किंवा इतर गडद रंग निवडून तुम्ही उंच दिसू शकता. याने आपण सुंदर आणि उठून दिसाल.

पूर्ण बाह्यांचे ड्रेस

उंच दिसण्यासाठी, पूर्ण बाह्यांचे ड्रेस परिधान करा. कमी उंचीच्या मुलींनी लांब बाही अथवा अर्ध बाही असलेले कपडे परिधान करावे. मात्र, पफ स्लीव्हज असलेले कपडे घालणे टाळा.

योग्य प्रिंटचे कपडे निवडणे

मोठ्या किंवा आडव्या प्रिंट असलेले कपडे घातले तर उंची कमी दिसते. उंच दिसण्यासाठी, लांब पट्टेदार प्रिंट असलेले पोशाख परिधान करा. जर तुम्ही सूट घालत असाल तर प्रिंटेड कुर्ता किंवा कमीजसोबत साधी पँट घालू शकता. याने तुमची कमी उंची दिसून नाही येणार.

फॅब्रिकची लांबी

उंच दिसण्यासाठी कपड्यांची लांबीही महत्त्वाची असते. जर तुमची उंची कमी असेल, तर कुर्त्याची लांबी गुडघ्यापासून थोडी खाली असावी. जर गुडघ्याच्या वर असेल तर, उंची कमी दिसते.

टॅग्स :महिलाफॅशन