लिनन हा मानवाने वापरलेला सर्वात पहिला तंतू असावा असे मानले जाते. लिनन हे कपडे विणण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात जुने तंतू. फ्लॅक्सच्या तंतूंपासून बनविण्यात येणारे कापड व धागा यांना लिनन म्हणतात. लिनन हे जगातील सर्वात मजबूत नैसर्गिक फायबर मानले जाते. तलमपणा आणि घट्ट वीण ही लिनन कापडाची वैशिष्ट्य. उन्हाळ्यात लिननचे कपडे वापरणे अत्यंत सोयीचे आणि आरामदायी असते कारण या कपड्यांत हवा खेळती राहते. उकडणे, घाम येणे याचा त्रास कमी होतो. त्यामुळे लिनन हे उन्हाळ्यात वापरण्यासाठी अत्यंत आदर्श फॅब्रिक आहे.
फ्रान्सच्या नॉर्मंडी प्रदेशात उगवलेल्या पटसनपासून (Flax) विणलेल्या आणि जगातील सर्वोत्तम दर्जाच्या पटसनपैकी (Flax) एक असलेल्या लिननचाच वापर झोडियाक करते. या प्रदेशाची अनोखी माती आणि हवामान, स्थानिक शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांची पटसनची (Flax) कौशल्य हे सारं एकत्र करण्याचा उत्तम परिणाम म्हणजे खूप उच्च दर्जाचे लिननचे कापड तयार होते.
लिनन शर्ट प्रत्येक वॉश आणि परिधान करताना अधिक आरामदायक होतात आणि त्यांच्या सुंदर, नैसर्गिक सुरकुत्या तुमच्या उन्हाळ्याच्या लूकमध्ये नक्कीच भर घालतात. या नव्या कलेक्शनमधले रंग इटालियन रिवेराच्या अमल्फी किनाऱ्यावरील पॉसिटानो या शहराचे मोहक दृश्य टिपतात.
ज्यामध्ये बेज, गुलाबी, पिवळा आणि टेरा कोटा घरे -टेकड्यांपासून निळ्या आणि स्वच्छ भूमध्यसागरीय पाण्यापर्यंत खाली उतरलेली आहेत. सॉलिड्स, पट्टे आणि चेक्सच्या विस्तृत श्रेणीमध्ये छोट्या आणि लांब बाह्यांमध्ये उपलब्ध आहेत. झोडियाक लिनन जॅकेट, ट्राउझर्स आणि टर्टलनेकसह एकत्रित केले जाऊ शकतात आणि एक उत्तम जोडी तयार होऊ शकते.
या कलेक्शनच्या लॉन्च प्रसंगी बोलताना ZCCLव्हाईस चेअरमन आणि एमडी सलमान नुरानी सांगतात, “आम्ही जवळजवळ दोन दशकांपासून भारतातील पुरुषांसाठी रेडी-टू-वेअर लिननचे सर्वोत्तम कलेक्शन सादर केले आहे. दरवर्षी आमचे ग्राहक भारतातल्या उन्हाळ्यात आपल्यासाठी उत्तम कपडे निवडतात आणि लिनन हा त्यातला अत्यंत आदर्श पर्याय आहे. ’
झोडियाकचे 2023 पोसिटानो कलेक्शन इथे पाहता येईल..
ऑनलाइन: https://www.zodiaconline.com/shirts/linen-shirts
इन स्टोअरमध्ये: स्टोअर लोकेटर: https://www.zodiaconline.com/storelocator