Join us  

पाठ- मान- कंबरदुखीने त्रस्त आहात? फक्त १ मिनिटासाठी 'हे' स्ट्रेचिंग करा, चटकन आराम मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2024 11:53 AM

1 Minute Stretching For Reducing Shoulder Pain, Back Pain: मान, पाठ किंवा कंबरदुखीने वैतागला असाल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेले हे सोपे स्ट्रेचिंग करून पाहा...(how to get relief from neck pain?)

ठळक मुद्देहा व्यायाम करताना कंबर आणि ओटीपोटाचे स्नायूसुद्धा एका ठराविक पद्धतीने ताणले जातात. त्यामुळे त्या भागालाही आराम मिळतो आणि तेथील चरबी कमी होण्यास मदत होते.

हल्ली लॅपटॉप, कम्प्युटरवर सतत काही तास सलग बसून काम केल्यामुळे अनेक जणांना मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी असा त्रास होतो. अनेक महिलांना बाळंतपणानंतर कंबरदुखी सुरू होते. ज्या लोकांचं दुचाकी चालविण्याचं प्रमाण अधिक आहे, त्यांचेही मान, पाठ, कंबर, खांदे आखडून जातात, खूप दुखतात (1 minute stretching for reducing shoulder pain, back pain). तुम्हालाही मान, पाठ, कंबर, खांदे दुखणं असा त्रास होत असेल (how to get relief from neck pain?) तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी सांगितलेले हे खास प्रकारचे स्ट्रेचिंग करून पाहा. फक्त एखाद्या मिनिटाचा हा व्यायाम तुम्हाला खूप आराम देऊन जाईल.

 

मान- पाठ- खांदेदुखीसाठी व्यायाम(how to do Broken Wing Pose?)

मान, पाठ, खांदे, कंबर आखडून गेली असेल तर त्यासाठी Broken Wing Pose हा व्यायाम करा असा सल्ला अंशुका परवानी यांनी दिला आहे. हा व्यायाम कसा करायचा ते आता पाहूया...(benefits of Broken Wing Pose)

ब्रोकन विंग पोझ करण्यासाठी सगळ्यात आधी पोटावर झोपा. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर दोन्ही बाजुंना पसरवून ठेवा.

लेटेस्ट फॅशनच्या ऑक्सिडाईज मंगळसूत्रांचे सुंदर डिझाईन्स, रोजच्या वापरासाठी असं एखादं तरी असावंच...

यानंतर उजवा पाय उचलून उजवा तळपाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या किंवा मांडीच्या शेजारी येईल अशा पद्धतीने ठेवा. यानंतर उजवा हातदेखील मागच्या बाजुला घ्या आणि दोन्ही तळहात एकमेकांमध्ये गुंफून हात मागच्या बाजुने ताणून घ्या. साधारण ३० सेकंदासाठी तरी ही अवस्था टिकविण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर अशाच पद्धतीने डावा पाय उचलून ३० सेकंदांसाठी तसाच व्यायाम करा...

 

ब्रोकन विंग पोझ केल्यामुळे होणारे फायदे 

१. ब्रोकन विंग पोझ केल्यामुळे पाठीच्या कण्याचे व्यवस्थित स्ट्रेचिंग होते. यामुळे पाठदुखीचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

२. हा व्यायाम केल्यामुळे खांद्यांनाही खूप आराम मिळतो. त्यामुळे खांदेदुखीचा त्रास होत असेल तर हा व्यायाम करा..

कोणाला मिळाला बंगला तर कोणाला मिळाली गाडी- बघा मुलांना महागडे गिफ्ट्स देणारे सेलिब्रिटी...

३. हा व्यायाम करताना कंबर आणि ओटीपोटाचे स्नायूसुद्धा एका ठराविक पद्धतीने ताणले जातात. त्यामुळे त्या भागालाही आराम मिळतो आणि तेथील चरबी कमी होण्यास मदत होते.

४. मानेचं दुखणं कमी करण्यासाठीही ब्रोकन विंग पोझ उपयुक्त ठरते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामपाठीचे दुखणे उपाय